कर्जत : बातमीदार : भाजपच्या कर्जत तालुका कार्यालयीन चिटणीसपदी कळंब भागातील कार्यकर्ते परशुराम म्हसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप अध्यक्ष माजी आमदार देवेंद्र साटम यांनी म्हसे यांना नियुक्तीपत्र दिले. भाजपच्या कर्जत मंडल कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला पक्षाचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष वसंत भोईर, जिल्हा सरचिटणीस दीपक …
Read More »Yearly Archives: 2019
उल्हास नदीचे प्रदूषण रोखणार
कर्जत नगर परिषद सांडपाण्यावर प्रक्रिया करणार कडाव : प्रतिनिधी : कर्जत शहरातील मुख्य नाल्याचे सर्व सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट उल्हास नदीत सोडण्यात येते आहे. त्यामुळे नदीचे प्रदूषण वाढत आहे, तसेच शहरातील मुख्य नाल्याचे पक्के बांधकाम सुरू असून, नदीत सोडण्यापूर्वी सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. यामुळे नदीत सोडल्या जाणार्या …
Read More »रस्त्यांची कामे करणार्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा
नेरळ ग्रामपंचायतीची मागणी कर्जत : बातमीदार : रायगड जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग नेरळ गावातील रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाची कामे करीत आहे. एमएमआरडीएच्या निधीमधून या रस्त्याची कामे करताना ग्रामस्थांची कामे अर्धवट ठेवली आहेत, ती कामे पूर्ण करावीत, यासाठी नेरळ ग्रामपंचायतने ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाने नेरळ …
Read More »मलेशिया ओपनसाठी किदाम्बी श्रीकांतकडून अपेक्षा
क्वालालंपूर : वृत्तसंस्था इंडिया ओपन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारणार्या भारताला किदाम्बी श्रीकांतकडून आजपासून (मंगळवार) सुरू होणार्या सात हजार डॉलर रकमेच्या मलेशिया ओपनकडून अधिक अपेक्षा आहेत. महिला एकेरीत पी. व्ही. सिंधू आणि साईना नेहवाल यांच्या कामगिरीकडेही सार्यांचे लक्ष असणार आहे. श्रीकांतने 2017मध्ये फ्रेंच ओपनचे विजेतेपद मिळवले होते. यानंतर त्याला इंडिया …
Read More »फेडररची 101व्या जेतेपदाला गवसणी
मयामी : वृत्तसंस्था स्वित्झर्लंडच्या 37 वर्षांच्या रॉजर फेडररने 1000 गुणांची मायामी टेनिस स्पर्धा जिंकून कारकिर्दीतील 101व्या जेतेपदाला गवसणी घातली. या महान टेनिसपटूने 1000 गुणांची टेनिस स्पर्धा कारकिर्दीत 28व्यांदा जिंकण्याचा पराक्रम केला. गेल्या आठवड्यात फेडररला इंडियन वेल्स स्पर्धा जिंकण्याचीही संधी होती; पण तिथे डॉमिनिक थीमने त्याला रोखले होते. मात्र मायामी स्पर्धेच्या …
Read More »‘विराटसेने’चा जय हो!
दुबई : वृत्तसंस्था विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने सलग तिसर्यांदा कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान कायम आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (आयसीसी) मानाची गदा मिळवली. या मानाच्या गदा पुरस्कारासोबतच टीम इंडियाला एक मिलियन डॉलरचे रोख रकमेचे बक्षीसही देण्यात आले. 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीत प्रत्येक संघाची कसोटी कामगिरी पाहून जो संघ …
Read More »धोनी अफलातून कर्णधार : इम्रान ताहिर
नवी दिल्ली : वृत्तसंस्था कर्णधार म्हणून महेंद्रसिंह धोनी हा अफलातून व्यक्ती आहे. खेळाडूंशी फारशी चर्चा न करतादेखील तो संघाच्या क्षमतांमध्ये वाढ करण्यात वाकबगार आहे, अशा शब्दांत चेन्नई सुपर किंग्जचा फिरकीपटू इम्रान ताहिर याने धोनीची स्तुती केली. 75 धावांची दमदार खेळी करतानाच कर्णधार म्हणून वेगळे डावपेच रचत धोनीने राजस्थान रॉयल्सविरुद्ध संघाला …
Read More »पंजाबचा दिल्लीवर विजय
मोहाली : वृत्तसंस्था डावखुरा वेगवान गोलंदाज सॅम करन याने साकारलेल्या हॅट्ट्रिकच्या बळावर पंजाबने दिल्लीवर 14 धावांनी विजय मिळवला. पंजाबने 20 षटकांत दिल्लीपुढे 167 धावांचे आव्हान ठेवले होते, मात्र हे आव्हान त्यांना पेलता आले नाही. दिल्लीचा डाव 152 धावांत आटोपला. करनने 14 चेंडूत 11 धावा देऊन 4 बळी टिपले. त्यालाच सामनावीर …
Read More »फणसवाडीतील डवरे आटले आदिवासींची पायपीट सुरू
कर्जत : बातमीदार तालुक्यातील मोग्रज ग्रामपंचायत हद्दीतील भगताचीवाडीच्या दोन लहान आदिवासी वाड्यांत असलेले पाणी साठे आटले आहेत. डवर्याचे पाणी पिणारे हे आदिवासी आता आश्रमशाळेच्या मागे असलेल्या नदीवर जाऊन पाणी आणत आहेत. मोग्रज ग्रामपंचायतीमध्ये शासनाची आदिवासी आश्रमशाळा असून, त्या अलीकडे फणसवाडी ही 20 घरांची वस्ती आहे. तेथे अद्याप कोणतीही पाणीपुरवठा योजना …
Read More »मालमत्ता कर थकवल्याने सदनिका, टॉवर सील
कर्जत नगर परिषदेची धडक कारवाई कर्जत : प्रतिनिधी नगर परिषद हद्दीतील थकीत मालमत्ता कर 31 मार्च अगोदर जमा करा अशी लेखी सूचना तसेच ध्वनिक्षेपकामार्फत जाहिरात करूनसुद्धा काही नागरिकांकडून प्रतिसाद न मिळाल्याने कर्जत नगर परिषदेच्या कर विभागाकडून धडक कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये तीन सदनिका व दोन मोबाईल टॉवर सील करण्यात …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper