पनवेल : रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सहाव्या अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. नाट्य चळवळ वृद्धिंगत करण्यासाठी व नाट्यरसिकांना आपले नाट्याविष्कार प्रदर्शित करता यावे, त्यांना हक्काचे …
Read More »Yearly Archives: 2019
संपकरी डॉक्टरांचा संप अखेर मागे
अलिबाग : प्रतिनिधी ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय या ठिकाणी राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नेमण्यात आलेल्या तज्ज्ञांचे मानधन शासनाकडून वेळेत न दिल्याने डॉक्टरांनी संप पुकारला होता. जिल्हाधिकार्यांच्या आश्वासनानंतर हा संप मागे घेण्यात आला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. बैठकीत जिल्हा शल्यचिकित्सक …
Read More »उरणमध्ये बिबट्याची दहशत; लोक भयभीत
उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील चिर्ले गाव परिसरात एका बिबट्याचा वावर असल्याचे निदर्शनास आले आहे. बिबट्याच्या धास्तीने जनतेत भीतीचे वातावरण पसरले आहे. चिर्ले गावाच्या उत्तर दिशेला असणार्या जंगलात गेल्या काही महिन्यांपूर्वी बिबट्याचा वावर असल्याचे दिसून आले होते. एका व्यक्तीने बिबट्याला पाहिले होते, मात्र त्याच्या बोलण्यावर वनखात्याच्या कर्मचार्यांसह पोलीस यंत्रणेनेही विश्वास …
Read More »पनवेल मनपातर्फे संविधान दिन उत्साहात
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या वतीने येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात संविधान दिन मंगळवारी (दि. 26) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी संविधानाच्या उद्देशिकेचे सामुदायिक वाचन करण्यात आले. महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक, नगरसेविकांसह प्रमुख वक्ते …
Read More »संविधान आमच्यासाठी सर्वांत मोठा ग्रंथ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उद्गार
नवी दिल्ली : वृत्तसंस्था आजचा 26 नोव्हेंबरचा ऐतिहासिक दिवस आहे. 70 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी आपण विधिवत संविधान स्वीकारले होते. संविधान आमच्यासाठी सर्वांत मोठा ग्रंथ आहे, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (दि. 26) काढले. संविधान दिनानिमित्त ते संसदेमध्ये बोलत होते. पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, भारताचे संविधान आपल्याला नागरिकांना …
Read More »भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात भारताचा संविधान दिन साजरा
पनवेल : येथील भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात भारताचा संविधान दिन मंगळवारी साजरा करण्यात आला. त्यानिमित्त भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, राज्य परिषद सदस्य विनोद साबळे, शहर सरचिटणीस …
Read More »अमरदीप बालविकास फाऊंडेशनचा दीपोत्सव सोहळा
पनवेल : रामप्रहर वृत्त तारा येथील आदिवासी विद्यार्थ्यांसोबत राष्ट्रीय एकात्मतेवर आधारित दीपोत्सव 2019 या कार्यक्रमाचे आयोजन अमरदीप बालविकास फाऊंडेशन आणि युसूफ मेहेरअली सेंटर तारा यांच्या वतीने तारा तेथील भानूबेन प्रवीण शहा हायस्कूलच्या हॉलमध्ये रविवारी (दि. 24) करण्यात आले होते. या कार्यक्रमात गीत, संगीत आणि नृत्य यांचा अनोखा संगम असलेला ‘करू …
Read More »सीकेटी महाविद्यालयामध्ये संविधान दिन साजरा
पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात संविधान दिन मंगळवारी (दि. 26) उत्साहात साजरा करण्यात आला, तसेच 26 नोव्हेंबर 2008 रोजी शहीद झालेल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. महाविद्यालयाने आयोजित केलेल्या रॅलीमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदविला. रॅली नंतर महाविद्यालयामध्ये शहीद …
Read More »खांदा वसाहतीत आणखी एक उद्यान होणार
सभापती संजय भोपी यांचे सिडकोला मागणीचे पत्र पनवेल : प्रतिनिधी खांदा वसाहतीत काही उद्याने आहेत, मात्र ती अपुरी पडत आहेत. येथील रहिवाशांची गैरसोय दूर व्हावी याकरिता सेक्टर 8मधील उद्यानाकरिता राखीव असलेल्या भूखंडाचा विकास करावा, अशी मागणी प्रभाग समितीचे सभापती संजय भोपी यांनी सिडकोकडे केली आहे. त्यांनी याबाबत कार्यकारी अभियंत्याला निवेदन …
Read More »सिडको महागृहनिर्माण योजनेची सोडत
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको महागृहनिर्माण योजनेतील 9,249 आणि स्वप्नपूर्ती गृहनिर्माण योजनेतील उर्वरित 810 घरांसाठीची संगणकीय सोडत मंगळवारी (दि. 26) रोजी नेरूळ येथील आगरी कोळी भवन येथे सकाळी 11.00 वा. यशस्वीरीत्या झाली. सदर सोडतीच्या निकालाचे थेट प्रेक्षपण वेबकास्टिंगच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले होते. त्यामुळे अर्जदारांना घरबसल्या संपूर्ण सोडत …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper