पनवेल : वार्ताहर ढोलताशा पथकामध्ये काम देण्याच्या बहाण्याने एका भामट्याने कळंबोली भागात राहणार्या महाविद्यालयीन विद्यार्थ्याची दिशाभूल करून त्याच्याजवळची 30 हजार रुपये किमतीची सोन्याची चेन लुबाडून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. कळंबोली पोलिसांनी या भामट्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणात फसवणूक झालेला 17 वर्षीय …
Read More »Yearly Archives: 2019
टेम्पोची स्वीफ्ट गाडीला धडक; दोन जखमी
पनवेल : वार्ताहर पनवेलजवळील पुणे-मुंबई एक्स्प्रेस महामार्गावरील किमी नं. 8/800 मार्गावरून जाणार्या भरधाव कोंबड्याच्या टेम्पोने त्याच्या पुढे जाणार्या स्वीफ्ट गाडीला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात स्वीफ्ट गाडीतील दोघे जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. पुणे-मुंबई एक्स्प्रेस महामार्गावरील किमी नं. 8/800 वरून कोंबड्यांचा टेम्पो चालला असताना त्याने पुढे चाललेल्या स्वीफ्ट गाडीस …
Read More »उपमहापौर विक्रांत पाटील यांनी केले प्रभागातील विविध विकास कामांची पाहणी
पनवेल : वार्ताहर पनवेल महानगरपालिकेचे उपमहापौर विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी आज प्रभागातील विविध विकासकामांची पाहणी करून आवश्यक त्या सूचना संबंधित ठेकेदाराला दिल्या. उपमहापौर विक्रांत बाळासाहेब पाटील यांच्या प्रभागात मोठ्या प्रमाणात रस्ते, नाले, गटार दुरुस्तीची कामे, डागडुजीची कामे, सिमेंटचे रस्ते, डांबरीकरण आदींची कामे पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू आहेत. या संदर्भात आज …
Read More »चिरनेर येथे जिल्हाधिकार्यांच्या हस्ते शेतकर्यांना काजू कलमांचे वाटप
चिरनेर ः प्रतिनिधी कृषी विभाग महाराष्ट्र शासन आणि तेल व नैसर्गिक वायू कार्पोरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकर्यांना काजू कलमे वाटपाचा शुभारंभ व्यावसायिक सामाजिक जबाबदारी निधीमार्फत डॉ. विजय सूर्यवंशी जिल्हाधिकारी रायगड यांचे हस्ते व नरेंद्र असीजा, ईडी प्लांट मॅनेजर आणि जॉर्ज विल्यम केरकट्टा मॅनेजर एचआर यांच्या उपस्थितीत झाला. कोकणातील निसर्गसंपन्न साधनसामग्रीचा …
Read More »उरण येथे रक्तदान शिबिर, 136 रक्तदात्यांनी केले रक्तदान
उरण ः वार्ताहर श्री अनिरुद्ध अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटतर्फे उपासना केंद्र उरण व मुळेखंड ह्या उपासना केंद्रांनी रविवारी झालेल्या रक्तदान शिबिरास नागरिकांचा भरघोस प्रतिसाद लाभला. हे शिबिर उरणच्या केडीएस कॉलेजमध्ये आयोजित करण्यात आले होते. या वेळी 136 रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिबिराला नवी मुंबई येथील डी. वाय. पाटील रक्तपेढीच्या टीमने सहकार्य …
Read More »हॉटेल वेलवेट ट्रीटमध्ये पहाटेपर्यंत मद्यविक्री, लॉजिंगमध्ये चालतो देहव्यापार; कारवाईची मागणी
पनवेल ः वार्ताहर पनवेल-पुणे हायवेवरील हॉटेल वेलवेट ट्रीटमध्ये कायद्याचे उल्लंघन करून परवानगीपेक्षा अधिक वेळ म्हणजेच पहाटेपर्यंत हॉटेल्स सुरू ठेवले जाते. पहाटेपर्यंत हे हॉटेल चालू असल्याने या ठिकाणी अनेक गँगस्टर रात्री अपरात्री मद्य प्राशन करण्याकरिता येत असल्याने हे हॉटेल बहुचर्चित झाले आहे. तर या हॉटेलमधीलच लॉजिंगमध्येच देहव्यापार खुलेआम चालत असल्याने गावातील …
Read More »एमआयडीसीत आपत्ती व्यवस्थापन अनियोजित, तळोजातील कंपन्यांसह अधिकार्यांचे दुर्लक्ष
कळंबोली : वार्ताहर तळोजा एमआयडीसीत मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याच्या तक्रारी अनेकदा आल्या आहेत, तसेच या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापनाकरिता ज्या गोष्टींची गरज आहे, त्याकडे एमआयडीसीचे दुर्लक्ष होत असल्याचे बोलले जात आहे. आपत्ती आल्यानंतर त्वरित काय करायचे याविषय नियोजन नाही, तसेच शीघ्रकृती टीम नसल्याने अनेक अडचणी येऊ लागल्या आहेत. त्यामुळे एमआयडीसीची …
Read More »नवीन पनवेल येथे मधुमेह जनजागृती अभियान
पनवेल ः बातमीदार डॉ. कीर्ती समुद्र यांच्या वतीने सलग 22व्या वर्षी मधुमेह मोडेम या विषयावर जनजागृतीतून मधुमेह नियंत्रण हा कार्यक्रम दि. 1 डिसेंबर रोजी नवीन पनवेल सेक्टर 6 येथील फडके विद्यालयामध्ये आयोजित केला आहे. यामध्ये डॉ. अरविंद (बाळासाहेब) लिमये, डॉ. अमित लंगोटे, डॉ. संजीव कालकेकर, डॉ. निशिता मेश्राम या तज्ज्ञ …
Read More »राज्यात स्थिर सरकार देणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे ट्विट; पंतप्रधानांचे मानले आभार
मुंबई : प्रतिनिधी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांनी ट्विटरद्वारे पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. ‘आम्ही महाराष्ट्राला स्थिर सरकार देऊ, मोदीजी तुमचे खूप खूप आभार,’ असे ट्विट पवारांनी केले आहे. त्यांनी पंतप्रधान मोदींसह भाजपच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांचेही आभार मानले आहेत. त्यामुळे …
Read More »पनवेल : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस पुन्हा विराजमान झाले. त्याबद्दल भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या. या वेळी शहर सरचिटणीस नगरसेवक नितीन पाटील, माजी नगरसेवक डी. आर. भोईर, महेश सरदेसाई, युवा मोर्चा उपाध्यक्ष प्रीतम (पिंट्या) म्हात्रे, सोशल मीडिया सेलचे शहर सहसंयोजक रूपेश नागवेकर, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper