नागोठणे : प्रतिनिधीयेथील रिलायन्स कंपनीसमोर 27 नोव्हेंबरपासून सुरू असलेल्या आंदोलनात सहभाग घेतलेल्या प्रकल्पग्रस्त तरुणाचा सोमवारी (दि. 21) अकाली मृत्यू झाला. त्यामुळे आंदोलनस्थळी हळहळ व्यक्त केली जात आहे.जगदिश किसन वारगुडे (वय 29) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव असून, तो पिगोंडे ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच सारिका वारगुडे यांचा पुत्र होता. आंदोलनात सहभागी झालेल्या …
Read More »Monthly Archives: December 2020
पनवेलमध्ये शेकापला गळती
उसर्ली बुद्रुक, उमरोलीतील कार्यकर्ते भाजपमध्ये पनवेल ः रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्षाच्या मतलबी कारभाराला कंटाळून पनवेल तालुक्यातील उसर्ली बुद्रुक व उमरोली येथील असंख्य कार्यकर्त्यांनी सोमवारी (दि. 21) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी नवागतांचे स्वागत केले. भाजपच्या पनवेल तालुका व शहर मध्यवर्ती …
Read More »शिवसेना प्रभू श्रीरामविरोधी भूमिका घेतेय : आमदार आशिष शेलार
मुंबई : अयोध्येतील भव्य राम मंदिर उभारणीत सर्वांचा हातभार लागावा यासाठी वर्गणी जमा केली जाणार आहे. विश्व हिंदू परिषद याकरिता एक मोहीम राबविणार आहे. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. त्याला भाजपने प्रत्युत्तर दिले आहे. अगोदर म्हणायचे पहिले मंदिर नंतर सरकार, मग सरकार आल्यावर मंदिर निर्मितीत अडथळा …
Read More »भाजपचा शिवसेनेला दे धक्का
माजी आमदार बाळासाहेब सानप यांचा पक्षप्रवेश मुंबई ः प्रतिनिधीशिवसेनेचे माजी आमदार बाळासाहेब सानप भाजपमध्ये परतले आहेत. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत सानप यांनी ‘कमळ’ हाती घेतले. महापालिका निवडणुका जवळ येत असताना माजी आमदार सानप यांनी भाजपमध्ये केलेला प्रवेश नाशिकमध्ये शिवसेनेला धक्का मानला जात …
Read More »महाराष्ट्रात आजपासून रात्रीची संचारबंदी
मुंबई : ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील महानगरपालिका क्षेत्रात मंगळवार (दि. 22)पासून रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. 22 डिसेंबर ते 5 जानेवारी या कालवाधीत रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत ही संचारबंदी लागू असणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी …
Read More »भाजपचे ‘मिशन बंगाल’
देशावर अनेक वर्षे सत्ता गाजविणारा काँग्रेस पक्ष अंतर्गत मतभेद आणि नेतृत्व निवडीच्या गर्तेत अडकला असताना दुसरीकडे भारतीय जनता पक्ष बिहारनंतर पश्चिम बंगाल जिंकण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी सज्ज होत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नुकताच केलेला बंगाल दौरा तेथील आगामी विधानसभा निवडणुकीची नांदी आहे. नव्या वर्षात पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणूक होत …
Read More »शेडुंग टोल नाक्यावर कर्जतच्या वाहनांना सूट
भाजपच्या प्रयत्नांना यश कर्जत : बातमीदार, प्रतिनिधीमुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील शेडुंग टोल नाका येथे कर्जत तालुक्यातील वाहनांना टोल भरावा लागत होता. त्याविरुद्ध भाजप किसान मोर्चाचे कोकण संघटक सुनील गोगटे यांनी आवाज उठविला होता. याबाबत त्यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर आयआरबी प्रशासन जागे झाले असून, त्यांनी कर्जतच्या वाहनांना टोलमध्ये सूट देण्याचा निर्णय …
Read More »खोपोलीत पाण्यासाठी संतप्त महिलांचा पालिकेवर धडक मोर्चा
खोपोली : प्रतिनिधी नगरपालिका हद्दीतील लौजी गावात गेल्या अनेक महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याच्या समस्येने त्रस्त असलेल्या महिलांनी सोमवारी (दि. 21) रिकाम्या भांड्यांसह नगरपालिका कार्यालयावर धडक दिल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली. विशेषत: नगरपालिकेच्या पाणीपुरवठा खात्याच्या गलथान कारभारामुळे आम्हाला पाणी मिळत नाही, असा संतप्त महिलांचा सूर होता. अपुरा पाणीपुरवठा, अनेकदा पाण्यामध्ये किडे सापडणे असे प्रकार …
Read More »खालापुरात चार टन गोमांस जप्त; त्रिकूट अटकेत
खालापूर : प्रतिनिधीगोवंशीय प्राण्याची कत्तल करून हे मांस विक्रीसाठी मुंबईत घेऊन जाणारा टेम्पो रविवारी (दि. 20) पहाटेच्या सुमारास खालापूर पोलिसांनी पकडला असून, तब्बल चार लाख रुपये किमतीचे चार टन मांस आणि त्याची वाहतूक करणारा टेम्पो असा एकूण साडेसात लाखांचा माल पोलिसांनी जप्त केला आहे.या प्रकरणी मुस्ताक मोहमद हनिफ सय्यद (28, …
Read More »वरसोली येथील मूकबधिर विद्यालयाचे काम रखडले
निधी उपलब्ध असूनही अलिबागमध्ये शासकीय अनास्था अलिबाग : प्रतिनिधीसामाजिक न्याय विभागाच्या आयुक्तांची परवानगी मिळत नसल्याने निधी उपलब्ध असूनही अलिबाग तालुक्यातील वरसोली येथील शासकीय मूकबधिर विद्यालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम रखडले आहे. सध्या ही शाळा भाड्याच्या जागेत चालविली जात आहे.रायगड जिल्ह्यातील मूकबधिर मुलांना शिक्षण घेता यावे यासाठी अलिबाग तालुक्यातील वरसोली ग्रामपंचायतीच्या हद्दीत …
Read More »