Breaking News

Yearly Archives: 2020

विद्यार्थ्यांची अग्निपरीक्षा

पदवीच्या अंतिम परीक्षा प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात चालू असून तीन दिवसांनी त्याचा सोक्षमोक्ष लागेल असे दिसते. विद्यार्थ्यांच्या हिताचा सर्वंकष विचार करून सर्वोंच्च न्यायालय योग्य निर्णय देईल यात शंका नाही. तथापि, गेले जवळपास निम्मे वर्ष विद्यार्थ्यांच्या करिअरचे जे नुकसान झाले त्याचे काय हा खरा प्रश्न आहे. काही राजकीय पक्षांनी सत्तेचा दुरुपयोग …

Read More »

डॉ. संजय मुखर्जी सडकोचे नवे एमडी

नवी मुंबई : बातमीदार सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) लोकेश चंद्र यांची बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी डॉ. संजय मुखर्जी यांची सिडकोच्या उपाध्यक्ष व एमडीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या सेवा विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी चंद्रा यांच्या बदलीचे आदेश काढले तसेच डॉ. मुखर्जी यांना तत्काळ रूजू होण्याचे …

Read More »

एक्स्प्रेस वेवर अपघात; चालकासह दोघांचा मृत्यू

खोपोली : प्रतिनिधी पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर भाताण बोगद्याजवळ पंक्चर काढण्यासाठी उभ्या असलेल्या एका ट्रेलरला दुधाच्या टँकरने दिलेल्या धडकेत टँकरचालकासह दोघांचा मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी (दि. 18) दुपारी पावणेतीनच्या सुमारास झाला. मिळालेल्या माहितीनुसार एक्स्प्रेस वेवरील मुंबई लेनवर उभा असलेल्या ट्रेलर (आरजे 02-जेबी 2043)चे पंक्चर काढण्याचे काम सुरू असताना पाठीमागून भरधाव …

Read More »

वादळग्रस्तांना तातडीने मदत वाटप करा; भाजपचे निवेदन

अलिबाग : प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना मदतीचे तातडीने वाटप करा, अशी मागणी अलिबाग तालुका भारतीय जनता पक्षाने तहसीलदारांकडे केली आहे. या संदर्भात निवेदन देण्यात आले. भाजप शिष्टमंडळाने मंगळवारी (दि. 18) अलिबागचे तहसीलदार सचिन शेजाळ यांची भेट घेऊन चर्चा केली व निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी केली. भाजप …

Read More »

महाड शहरातील कोविड सेंटर सुरू करा; भाजप मागणीवर ठाम

महाड : प्रतिनिधी महाड औद्योगिक क्षेत्रातील एमएमए कोविड सेंटर अद्ययावत करा, पण त्याचबरोबर शहरातील ट्रामा केअर सेंटरमधील कोविड सेंटर पुन्हा सुरू करण्याची मागणी भाजपने मंगळवारी (दि. 18) पत्रकार परिषदेत केली. उपचार होऊ न शकल्याने अशोक सावंत यांच्या मृत्यूला जबाबदार कोण, असा सवाल भाजपचे जिल्हा सरचिटणीस बिपीन महामुणकर यांनी या वेळी …

Read More »

कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी भाजप आक्रमक; धाटाव एमआयडीसीतील एलपी कंपनीच्या गेटवर आज मोर्चा

रोहा, धाटाव : प्रतिनिधी धाटाव औद्योगिक क्षेत्रातील कारखानदार व व्यवस्थापन समितीकडून कामगारांना कामावरून तडकाफडकी काढून टाकणे, कोरोना काळात त्रास देणे यांसह होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात भाजप बुधवारी (दि. 19) सकाळी 11 वाजता एल. पी. कंपनीच्या गेटसमोर प्रतीकात्मक आंदोलन करणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर करणार …

Read More »

देशात कोरोना चाचण्यांचा विक्रम; एका दिवसात तब्बल नऊ लाख 99 हजार 864 टेस्ट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. देशात दररोज 50 ते 60 हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहेत. कोरोना चाचणीचे प्रमाण वाढल्यामुळे रुग्णांची संख्याही वाढल्याचे समोर आले आहे. देशात सध्या तीन कोटींपेक्षा जास्त कोरोना चाचण्या झाल्या आहेत. भारताने एका दिवसात नऊ लाख 99 हजार 864 कोरोना चाचण्या …

Read More »

रायगडात 15 रुग्णांचा मृत्यू; 359 नवे पॉझिटिव्ह

पनवेल : रायगड जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या वाढत चालली असून, 15 रुग्णांच्या मृत्यूची नोंद मंगळवारी (दि. 18) झाली, तर 359 नवे पॉझिटिव्ह आढळले आहेत. दुसरीकडे दिवसभरात 389 रुग्ण बरे झाले आहेत. मृत रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील आठ, उरण तीन, श्रीवर्धन दोन आणि खालापूर व महाड तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे, तर …

Read More »

कोरोनाच्या सावटाखाली गणेशोत्सवाची लगबग

कर्जत ः प्रतिनिधी  जगभर कोरोनाचे संकट आल्याने गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करावा यासाठी शासनाने अनेक नियम तयार केले आहेत. दरवर्षी तयार सजावटीची अनेक दुकाने कर्जत तालुक्यात असतात. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी दुकाने आहेत. बांबूपासून तयार केलेल्या सजावटीला विशेष मागणी आहे. गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट असले तरी बाजारपेठा फुलल्या आहेत. गणेशोत्सव …

Read More »

पतीसह दोन अपत्यांची हत्या करून डॉक्टर पत्नीची आत्महत्या

नागपूर ः प्रतिनिधी प्राध्यापक पती, मुलगा व मुलीला इंजेक्शन देऊन ठार मारल्यानंतर डॉक्टर पत्नीने स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली. ही थरारक घटना कोराडीतील ओमनगर येथील जगनाडे ले-आऊट येथे मंगळवारी (दि. 18) दुपारी उघडकीस आली. एकाच कुटुंबातील चौघांच्या मृत्यूने उपराजधानी नागपूरमध्ये खळबळ उडाली आहे. धीरज डिंगाबर राणे (42), त्यांच्या पत्नी डॉ. …

Read More »