Breaking News

Yearly Archives: 2020

भाजपतर्फे कोरोना योद्ध्यांना हेल्थ पॉलिसीचे वितरण

नवी मुंबई : बातमीदार भारतीय जनता पक्ष, ऐरोली, प्रभाग क्र 22मध्ये समाजसेवक राजेश मढवी व समाजसेविका रेश्मा मढवी यांच्या वतीने दिवा गावातील 20 कोरोना योद्ध्यांना कोरोना आरोग्य विम्याचे वितरण करण्यात आले. सामाजिक स्तरावर ही प्रथमच कोरोना आरोग्य विमा देण्यात आला आहे. या उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे. सध्या कोरोनाच्या संकटकाळात …

Read More »

म्हात्रे बंधू ठरले प्लाझ्मा डोनेट करणारे नवी मुंबईतील पहिले भूमिपुत्र

नवी मुंबई : बातमीदार संपूर्ण जगात सध्या कोरोनाने थैमान घातले आहे. अद्यापही कोरोनावरील लस उपलब्ध नसल्याने संकटात सापडलेल्या अवघ्या विश्वाला ’प्लाझा थेरपीने’ आशेचा किरण निर्माण केला आहे. अशातच आता नवी मुंबईत देखील प्लाझ्मा डोनेशनला सुरुवात झाली असून त्यानुसार या आगरी कोळ्यांच्या शहरात प्लाझ्मा डोनेट करणारे पाहिले भूमिपुत्र म्हणून नेरुळ गावातील …

Read More »

आमदार मंदा म्हात्रे यांच्या निवासस्थानी श्रीराम मंदिराच्या भूमिपूजनानिमित्त पूजा

नवी मुंबई : बातमीदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्या येथे श्रीराम जन्मस्थानी भव्य मंदिराचा पायाभरणी समारंभ बुधवारी झाला. अयोध्येत राम जन्मस्थानी मंदिर व्हावे, या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार म्हणून बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या गौरव निवासस्थानी प्रभू श्री रामचंद्र यांच्या पूजेचे आयोजन करण्यात आले होते. तो ऐतिहासिक क्षण …

Read More »

भाजपच्या कार्यकर्त्यांची तत्परता

नवी मुंबई : बातमीदार बुधवारी झालेल्या जोरदार पाऊस व वार्‍यामुळे नेरुळ प्रभाग क्रमांक-96 मध्ये अनेक ठिकाणी झाडे व झाडांच्या फांद्या पदपथावर व रस्त्यावर पडल्या. रस्त्यांवर उभ्या असलेल्या गाड्यांवरदेखील झाडांच्या फांद्या पडल्या होत्या. ही बाब कळताच स्थानिक माजी नगरसेविका रुपाली भगत यांनी तातडीने फायर ब्रिगेडला संपर्क केला असता ते इतर ठिकाणी …

Read More »

निसर्ग चक्रीवादळाची पुनरावृत्ती

शहरात ठिकठिकाणी नुकसान पनवेल : बातमीदार जूनमध्ये निसर्ग चक्रीवादळात झालेल्या हानीची पुनरावृत्ती बुधवारी (दि. 5) नवी मुंबईत पाहायला मिळाली. दुपारी वादळी वार्‍यासह सुरू झालेल्या पावसात शहरात ठिकठिकाणी सुमारे 200 झाडे कोसळली. तर अनेक ठिकाणी इमारती आणि घरांवरील पत्रे उडून गेले. वादळात वृक्ष विद्युत तारांवर उन्मळून पडल्याने नवी मुंबई, पनवेल आणि …

Read More »

पनवेल तालुक्यात 221 नवे कोरोना रुग्ण

एकाचा मृत्यू; 174 जणांना डिस्चार्ज पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात गुरुवारी (दि. 6) कोरोनाचे 221 नवीन रुग्ण आढळले असून एकाचा मृत्यू झाला आहे तर 174 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 179 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे तर 151 रुग्ण बरे …

Read More »

नेहमीचेच रडगाणे

मंगळवारपासून मुंबई आणि आसपासच्या परिसराला वादळी वार्‍यांसह जोरदार पावसाने झोडपले असून मुंबईत तर अनेकांना 26 जुलैची आठवण व्हावी अशी परिस्थिती दिसून आली. गेली कित्येक वर्षे महापालिकेत सत्ता असूनही शिवसेनेला देशाच्या आर्थिक राजधानीला प्रतिवर्षी तुंबई होण्यापासून वाचवण्यावर उपाययोजना करता आलेली नाही. राज्यात अन्यत्र पूरस्थिती निर्माण झाल्यास हे गोंधळलेले सरकार काय करणार …

Read More »

रायगडात 379 नवे रुग्ण; सहा जणांचा मृत्यू

पनवेल : रायगड जिल्ह्यात 379 कोरोना रुग्णांची गुरुवारी (दि. 6) नोंद झाली असून, सहा जणांचा मृत्यू झाला आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (महापालिका 179, ग्रामीण 42) तालुक्यात 221, अलिबाग 28, खालापूर 26, रोहा 25, महाड 24, पेण 23, उरण 17, माणगाव नऊ, कर्जत पाच आणि सुधागड तालुक्यातील एकाचा समावेश आहे, …

Read More »

50 मुस्लीम कुटुंबांनी स्वीकारला हिंदू धर्म

राम मंदिर भूमिपूजनाचे औचित्य जयपूर : वृत्तसंस्थाअयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा बुधवारी (दि. 5) झाला. याचदरम्यान राजस्थानमधील बारमेर जिल्ह्यातील पायला कल्ला पंचायत समितीच्या मोतीसरा गावात राहणार्‍या 50 मुस्लीम कुटुंबीयांनी हिंदू धर्म स्वीकारला. हिंदू धर्म स्वीकारणार्‍या कुटुंबातील वयस्कर लोकांचे म्हणणे आहे की, त्यांचे पूर्वज हिंदू होते. इतिहासाचे ज्ञान असल्यामुळे त्यांनी कोणत्याही …

Read More »

‘देशाची अर्थव्यवस्था सुधारतेय’

नवी दिल्ली : वृत्तसंस्थादेशाच्या अर्थव्यवस्थेत एप्रिल महिन्याच्या तुलनेत सुधारणा होत असल्याचे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी म्हटले आहे. आरबीआयच्या द्विमासिक पतधोरण आढाव्याबाबतची तीन दिवसीय बैठक गुरुवारी (दि. 6) संपली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत दास यांनी विविध निर्णयांची माहिती दिली. रिझर्व्ह बँकेच्या रेपो आणि रिव्हर्स रेपो दरात कोणताही बदल करण्यात …

Read More »