अकाली अस्तंगत झालेला बॉलीवूडचा सितारा सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूभोवताली दाटलेले संशयाचे धुके आतातरी निवळेल अशी अपेक्षा आहे. बरीच राजकीय चिखलफेक, आरोप-प्रत्यारोप, खालच्या स्तरावरील गावगप्पा, खर्याखोट्या अफवांचे पीक या गोष्टींमुळे गेले दोन महिने देशातील वातावरण गढूळ झाले होते. अखेर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचा सुस्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी बजावला. बॉलीवूड …
Read More »Yearly Archives: 2020
देशभक्तीपर गीतांची ऑनलाइन स्पर्धा
पनवेल : रामप्रहर वृत्त भारत विकास परिषदेच्या पनवेल शाखेने स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून देशभक्तीपर एकल गीत स्पर्धेचे आयोजन केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा ऑनलाइन स्वरुपात झाली. त्याला पनवेल परिसरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेमध्ये श्रीरंग केतकर याने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले. पद्मजा कुलकर्णी व केतकी ओक यांनी द्वितीय आणि आशा …
Read More »ग्रामीण भागात पिठोरी उत्साहात साजरी
उरण : प्रतिनिधी श्रावण सुरू होताच ग्रामीण भागातील कष्टकरी जनता आपले सण साजरे करण्यास प्राधान्य देत आहे. यामध्ये पिठोरी आमवस्येला पिठोरीची पूजा गावागावातील अनेक घरात केली जाते. पिठोरी पूजन हे व्रत असल्याने हे दरवर्षी नित्यनियमाने करण्यास प्राधान्य दिले जाते. श्रावणातील नागपंचमी, मंगळागौरी, यांच्या प्रमाणेच श्रावण आमवस्येला पिठोरी आमावस्या म्हणून त्या …
Read More »लाच स्वीकारताना दोघे ताब्यात
पनवेल : दिड लाखाची लाच मागून त्यातील 50 हजारांचा पहिला हफ्ता स्वीकारणार्या कामोठे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रोहित बंडगरसह एका खाजगी व्यक्तीला बुधवारी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. यातील तक्रारदार यांच्याविरूद्ध पोलीस उपनिरीक्षक रोहित बंडगर (30) यांच्याकडे फसवणुकीचा तक्रारी अर्ज चौकशीसाठी आला होता. त्या अर्जावर कोणतीही कारवाई न करण्यासाठी …
Read More »गणेशोत्सव काळात भाज्यांचे दर कमी?
पनवेल : बातमीदार वाशी येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील भाजी बाजारात गेले पाच महिने सुरू असलेली टोकन पद्धती बंद करण्यात आल्याने बाजारात नियमित आवक वाढणार आहे. त्यामुळे गणेशोत्सव काळात भाज्यांचे दर कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोमवारी भाजी बाजारात एकाच दिवशी 432, तर मंगळवारी 356 ट्रक टेम्पो भरून …
Read More »घरबसल्या वाढताहेत अन्य आजार
पनवेल : बातमीदार कोरोना संकटाला रोखण्यासाठी सरकारने जाहीर केलेल्या लॉकडाऊन, अनलॉकदरम्यान 24 तास घरात बसून अन्य आजारांना निमंत्रण मिळत आहे. विविध उपाययोजना राबवूनही दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असल्याने घराबाहेर पडण्याची सोयच नाही. डोकेदुखीबरोबरच आता पोटाचे विकारही नागरिकांना जडत आहेत. त्यातही अपचन, बद्धकोष्टता आणि मूळव्याधाच्या दुखण्याने डोकेवर काढले आहे. याशिवाय वर्क फ्रॉम …
Read More »रायगडात 10 कोरोना रुग्णांचा मृत्यू; 422 नवे पॉझिटिव्ह
पनवेल : रायगड जिल्ह्यात 10 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद बुधवारी (दि. 19) झाली असून, 422 नवे पॉझिटिव्ह आढळले आहेत. दुसरीकडे दिवसभरात 416 रुग्ण बरे झाले आहेत. मृत रुग्णांमध्ये अलिबाग तीन, पनवेल दोन, उरण, खालापूर, कर्जत, मुरूड व महाड तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे, तर पॉझिटिव्ह रुग्ण पनवेल 238, अलिबाग 35, …
Read More »पूर्वाश्रमीच्या ग्रामपंचायत कर्मचार्यांना मिळणार 18 हजार रुपये ठोक मानधन
पनवेल मनपा स्थायी समिती सभेत विविध विषयांना मंजुरी पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या बुधवारी (दि. 19) झालेल्या स्थायी समिती सभेत पूर्वाश्रमीच्या ग्रामपंचायत कर्मचार्यांना 18 हजार रुपये ठोक मानधन देण्यास मंजुरी देण्यात आली. त्याचप्रमाणे कोविड योद्धा बनून कार्यरत असणार्यांना 300 रुपये प्रतिदिन भत्ता देण्यास मान्यता दिली गेली. या वेळी कोरोना उपाययोजनांवर …
Read More »तांबडी बुद्रुक प्रकरणात पोलिसांनी आठ दिवसांत चार्जशीट दाखल करावी
आमदार विनायक मेटे यांची मागणी रोहे : प्रतिनिधीतांबडी बुद्रुक येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. यातील आरोपींना फाशीची शिक्षा कशी मिळेल यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावे. हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा व त्याकरिता सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांची नेमणूक करावी. मी यासंबंधी निकम यांच्याशीही चर्चा केली असून, …
Read More »कर्जतमध्ये शेतकर्यांचे उपोषण सुरू
रिलायन्स इथेन गॅस पाइपलाइनबाधितांना भाजपचा पाठिंबा कर्जत : बातमीदाररिलायन्स इथेन गॅस पाइपलाइनसाठी दिलेल्या जागेचा मोबदला अद्याप मिळाला नसल्याने कर्जत तालुक्यातील प्रकल्पग्रस्त शेतकर्यांना कंपनी आणि प्रशासनाविरुद्ध कर्जत तहसील कार्यालयाबाहेर बुधवारी (दि. 19)पासून उपोषण सुरू केले आहे. शेतकर्यांच्या या आंदोलनाला भारतीय जनता पक्षाने पाठिंबा दिला आहे.रिलायन्स कंपनीच्या दहेज ते नागोठणेदरम्यानच्या इथेन गॅस …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper