नागोठणे ः प्रतिनिधी कोरोनाचा संसर्ग वाढू नये यादृष्टीने जिल्हा परिषद सदस्य किशोर जैन यांच्या सूचनेनुसार येथील ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामपंचायत हद्दीतील सर्व नागरिकांची ऑक्सिमीटरद्वारे तपासणी करण्याच्या मोहिमेस मंगळवारपासून प्रारंभ करण्यात आला. किशोर जैन, सरपंच डॉ. मिलिंद धात्रक, ग्रामविकास अधिकारी मोहन दिवकर यांच्या प्रमुख उपस्थितीत याची सुरुवात करण्यात आला. ही मोहीम शहरातील …
Read More »Yearly Archives: 2020
लोधिवली ग्रामपंचायतीला संतप्त ग्रामस्थांनी ठोकले टाळे
मोहोपाडा ः प्रतिनिधी चौक ग्रामपंचायतीचे विभाजन होऊन वासांबे मोहोपाडा जिल्हा परिषद हद्दीत लोधिवली ग्रामपंचायत अस्तित्वात आली. सदर ग्रामपंचायतीला पाच वर्षेही पूर्ण झाली नाही तोच लोधिवली ग्रामपंचायतीचे नाव तालुक्यात चांगलेच चर्चेत आहे. या ग्रामपंचायतीकडून आदिवासी बांधवांना दोन वर्षे 15 टक्के आदिवासी निधी न मिळाल्याने संतापलेल्या ग्रामस्थांसह आदिवासी बांधवांनी मंगळवारी (दि. 18) …
Read More »विजेच्या लपंडावाने त्रस्त नागरिकांचा जनआक्रोश आंदोलनाचा इशारा
पनवेल ः प्रतिनिधी उरण पूर्व विभागात गेले काही दिवस विजेचा लपंडाव सुरू असून दोन-दोन दिवस वीज गायब होणे, अचानक वीजपुरवठा खंडित होण्याच्या प्रकारांत वाढ झाली आहे. त्यात सर्वांच्या लाडक्या बाप्पाचा उत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. तरीही वीज महावितरण कंपनी कोणत्याही उपाययोजना करीत नाही. कोरोनाच्या महामारीत ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वीज …
Read More »पनवेलमध्ये 176 कोरोनाबाधित
आठ जणांचा मृत्यू; 198 रुग्णांची कोरोनावर मात पनवेल ः प्रतिनिधी पनवेल तालुक्यात मंगळवारी (दि. 18) कोरोनाचे 176 नवीन रुग्ण आढळले असून आठ जणांचा मृत्यू झाला आहे, तर 198 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 139 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून सात जणांचा मृत्यू झाला, तर 150 …
Read More »मोदक बनविणार्या महिलांची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल
पनवेल ः बातमीदार गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने सर्वत्र बाप्पाच्या स्वागताची लगबग सुरू आहे. यंदा कोरोनाच्या संकटामुळे गणेशोत्सव साधेपणाने साजरा होणार असला तरी भाविकांचा उत्साह तसूभरही कमी झालेला नाही. घरोघरी बाप्पाच्या सेवेसाठी कामांची विभागणी झाली असून यात महिलावर्ग आघाडीवर आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही बाप्पाच्या नैवेद्याचा भार खांद्यावर घेत त्यासाठी त्यांनी …
Read More »शिवकर येथे आंतरजातीय विवाहसोहळा संपन्न
पनवेल ः बातमीदार शिवकर ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने सुरज ढवळे आणि सुश्मिता जाधव यांचा आंतरजातीय विवाहसोहळा रविवारी (दि. 16) ग्रामपंचायतीच्या सभागृहात पार पडला. या आंतरजातीय विवाह सोहळ्यामध्ये शिवकर गावातील तसेच ढवळे परिवारातील मोजकेच सदस्य उपस्थित होते. हा सोहळा वैदिक पद्धतीने दोन्ही कुटुंबांच्या आईवडिलांच्या परवानगीने संपन्न झाला. उच्चशिक्षित मुलगी आणि व्यावसायिक मुलगा हे …
Read More »श्री गणेश मित्रमंडळाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने; बैठकीत निर्णय
पनवेल ः प्रतिनिधी कामोठ्यातील श्री गणेश मित्रमंडळाचा गणेशोत्सव सेक्टर 34चा राजा म्हणून ओळखला जातो. संपूर्ण जगभर सध्या कोरोनाच्या साथीमुळे महामारीची परिस्थिती उद्भवली आहे. या परिस्थितीत देशभर लॉकडाऊन सुरू असताना गणेशोत्सव कसा साजरा करावा याविषयी विचारविनिमय करण्यासाठी श्री गणेश मित्रमंडळाची बैठक झाली. या बैठकीत साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करणे तसेच इतर …
Read More »हुतात्मा हिरवे गुरुजी समाजभूषण पुरस्कार वितरण समारंभ
पनवेल ः बातमीदार नामदेव शिंपी समाज युवक संघातर्फे दिला जाणारा शिंपी समाजात प्रतिष्ठेचा समजला जाणारा हुतात्मा हिरवे गुरुजी समाजभूषण पुरस्कार वितरण समारंभ ऑनलाइन पद्धतीने संपन्न झाला. 15 ऑगस्ट रोजी पनवेलचे सुपुत्र हिरवे गुरुजी हे गोवा मुक्तिसंग्रामात भारतीय स्वातंत्र्यलढ्यात शहीद झाले होते. त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी नामदेव शिंपी समाज …
Read More »सायन-पनवेल महामार्गावर वाहतुकीची कोंडी
नवी मुंबई ः प्रतिनिधी सायन-पनवेल महामार्गावर सोमवारी सकाळी टॅक्सी व कारचा अपघात झाला. यानंतर कारचालकाने टॅक्सीची चावी खेचून तेथून पळ काढला. त्यामुळे अर्धा तास टोल नाक्याजवळ चक्काजाम झाला होता. वाशी प्लाझापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. नवी मुंबई, पनवेलवरून रोज हजारो नागरिक मोटरसायकल व कारनेच मुंबईत कामाच्या ठिकाणी जात आहेत. त्यामुळे …
Read More »खारघरमध्ये चेन स्नॅचर सक्रिय
तीन महिलांचे मंगळसूत्र लंपास पनवेल ः प्रतिनिधी कोरोना प्रादुर्भावाच्या काळात नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली असताना दुसरीकडे चोरटे मात्र पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. रविवारी (दि. 16) तीन ज्येष्ठ नागरिक महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र बाइकस्वारांनी लंपास केले. भाजी खरेदीसाठी बाहेर पडणार्या या महिलांना दुचाकीस्वारांनी आपले शिकार बनविले आहे. पहिली घटना सेक्टर 19 …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper