पनवेल ः बातमीदार मागील तीन-चार दिवस झालेल्या जोरदार वारा आणि पावसामुळे नवी मुंबईतील अनेक ठिकाणच्या निसर्गसंपदेचे नुकसान झाले आहे. नेरूळ आणि बेलापूरच्या सीमेवर असलेल्या निसर्गसंपन्न पारसिक हिल टेकडीलाही याचा फटका बसला आहे. येथील मोठमोठे वृक्ष मुळासह उन्मळून पडले आहेत. त्या अनुषंगाने झाडांचे संगोपन करणार्या रहिवाशांनी ही निसर्गसंपदा वाचविण्यासाठी पुढाकार घेतला …
Read More »Yearly Archives: 2020
जागतिक आदिवासी दिनानिमित्त क्रांतिकारकांना मानवंदना
पनवेल ः वार्ताहर सर्वत्र 9 ऑगस्ट हा दिवस आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो. रॅली, मिरवणूक, सभा, आंदोलन, मोर्चे, उपोषण यांसारखे अनेक उपक्रम या दिवशी आखले जातात, मात्र या वर्षी कोरोनाचे महासंकट व लॉकडाऊनमुळे सर्व ठिकाणी शासनाचे नियम पाळून आदिवासी कार्यकर्त्यांनी जागतिक आदिवासी दिन साध्या पध्दतीने साजरा केला. या वेळी …
Read More »शिक्षकांकडून विद्यार्थ्यांचे कौतुक
उरण : वार्ताहर दहावीच्या शालांत परीक्षेत उरण तालुक्यातील उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे कौतुक व अभिनंदन करण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच उरण तालुक्यातील शिक्षकांनी हाती घेतले होते. या वेळी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या डोळ्यांत आनंदाश्रू काढत शिक्षकांचे आभार व्यक्त केले. अतिदुर्गम अशा उरण तालुक्यातील गोवठणे गावातील मूळ रहिवासी असणार्या अंजनी …
Read More »फिरत्या चाचणी सुविधेला प्रारंभ; ‘मिशन झीरो’अंतर्गत रुग्णांचा शोध; 40 वाहने सज्ज
पनवेल ः बातमीदार नवी मुंबई शहरात ‘मिशन झीरो’अंतर्गत रुग्णांचा तातडीने शोध घेण्यासाठी पालिकेच्या वतीने भर दिला जात आहे. यासाठी भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून गृहसंस्था आणि वसाहतींमध्ये फिरती चाचणी सुविधा करण्यात आली आहे. यात प्रतिजन चाचण्या केल्या जाणार आहेत. या उपक्रमांतर्गत कोरोनावर मात करण्यासाठी ‘मिशन झीरो’ मोहीम सुरू करण्यात आली आहे. …
Read More »जिम सुरू करण्याची मागणी
खारघर : प्रतिनिधी देशात जिमला परवानगी देण्यात आली असून राज्यात मात्र जिम सुरू करण्यास अद्याप परवानगी मिळालेली नाही. यामुळे जिममालक आणि ट्रेनर पुरते वैतागले आहेत. लाखो रुपये भांडवल आणि लाखोंचे भाडे भरून जिममालकांवर आर्थिक संकट कोसळले आहे. सरकारने आमचाही विचार करावा, अशी मागणी महाराष्ट्र जिम ओनर्स असोसिएशनच्या माध्यमातून करण्यात आली …
Read More »मुरूडमध्ये रंगला आगळावेगळा रानभाजी महोत्सव
मुरूड : प्रतिनिधी – मुरूड तालुका कृषी अधिकारी कार्यालय व पंचायत समिती यांच्या विद्यमाने कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत जागतिक आदिवासी दिनानिमित्त पंचायत समितीच्या सभागृहात रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात नथुराम वाघमारे व सोमनाथ वाघमारे या आदिवासी बंधूंच्या सहाय्याने रानभाज्यांची आकर्षकपणे मांडणी करण्यात आली होती. यामध्ये …
Read More »सिरमकडून लसींची नोंदणी करावी; आमदार गणेश नाईक यांची मागणी
नवी मुंबई ः बातमीदार नवी मुंबई शहरातील नागरिकांना भेडसाविणार्या समस्या व त्याबाबत करावयाच्या उपाययोजनांबाबत आमदार गणेश नाईक यांनी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांची मंगळवारी (दि. 11) भेट घेतली. या वेळी सिरम इन्स्टिट्यूटमार्फत तयार करण्यात येत असलेल्या लसींची नोंदणी नवी मुंबई पालिकेने करून ठेवावी. त्यामुळे नवी मुंबईकरांना डोस उपलब्ध होऊन कोरोनाचा …
Read More »प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेचा लाभ घ्या; प्रशासनाचे आवाहन
अलिबाग : प्रतिनिधी – केंद्र शासनाचे राष्ट्रीय मत्स्यिकी विकास मंडळ (एनएफडीबी) यांच्यामार्फत प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना राबविण्यात येत आहे. त्यानुसार मत्स्यव्यवसाय पूरक योजनांचा लाभ जिल्ह्यातील मच्छीमार, मत्स्यसंवर्धक तसेच इतर इच्छुक लाभार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. मत्स्यसंवर्धन निगडीत अनेक योजना आहेत. त्यात गोड्या, निमखारे पाण्यातील मत्स्यसंवर्धनाकरिता मत्स्यबीज, कोळंबी बीज …
Read More »पेण तहसील कार्यालयात दाखल्यांसाठी विद्यार्थ्यांची गर्दी
सोशल डिस्टन्सिंगची पायमल्ली पेण : प्रतिनिधी – बारावी व दहावीच्या निकालानंतर पुढील प्रवेशासाठी दाखले मिळविणार्यांची पेण तहसील कार्यालय आणि सेतू केंद्रात गर्दी होत आहे. या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग नियमांची सर्रास पायमल्ली होत असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे. मार्च महिन्यापासून तहसील कार्यालयाचे कामकाज पूर्ण कर्मचार्यांच्या उपस्थितीत होत नसल्याने आणि दाखल्यांचे …
Read More »मावळला जोडणारी नळीची पायवाट खचली
कर्जत : बातमीदार – कर्जत तालुक्यातील वदप ग्रामपंचायत हद्दीत दुर्गम भागात असलेल्या कळकराई ग्रामस्थांची मावळ आणि कर्जत तालुक्याला जोडणारी बैलगाडीची वाट पावसामुळे खचली आहे. त्यामुळे ग्रामस्थांना गावातून खाली येणे कठीण होऊन बसले आहे. कळकराई हे कर्जत तालुक्यातील पुणे जिल्हा हद्दीवर असलेले गाव असून, जेमतेम 40 घरांची येथे वस्ती आहे, मात्र …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper