Breaking News

Yearly Archives: 2020

रायगड जिल्ह्यात 372 नवे रुग्ण; नऊ जणांचा मृत्यू

पनवेल : रायगड जिल्ह्यात सोमवारी (दि. 27) कोरोनाच्या 372 नव्या रुग्णांची नोंद झाली असून, नऊ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील (महापालिका 152, ग्रामीण 46) 198, अलिबाग 48, पेण 36, उरण 18, खालापूर 16, कर्जत 13, महाड 11, रोहा व म्हसळा प्रत्येकी नऊ, मुरूड सहा, श्रीवर्धन पाच, …

Read More »

देऊळ बंद; शिवभक्तांनी घेतले बाहेरून दर्शन

मुरूड : प्रतिनिधीकोरोनामुळे मंदिरे अद्याप बंद असल्याने श्रावणातील पहिल्या सोमवारी (दि. 27) भाविकांना शिवलिंगाचे थेट दर्शन घेता आले नाही. त्यामुळे शिवभक्तांनी मंदिराबाहेरूनच दर्शन घेतले. श्रावण महिना पवित्र मानला जातो. या मासात श्रद्धेने व भक्तिभावाने पूजा-अर्चा, अभिषेक करण्यात येतो. श्रावणातील सोमवार व शनिवारी तर मंदिरांसमोर रांगा लागतात. पहिल्या श्रावणी सोमवारी मात्र …

Read More »

कळंबोली, रोहा भाजप युवा मोर्चाकडून श्रीराम लिहिलेली पत्रे रवाना

पनवेल : रामप्रहर वृत्त – महाराष्ट्र युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व रायगड जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष मयुरेश नेतकर यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि. 27) कळंबोली मंडळ युवा मोर्चा तर्फे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जय श्रीराम लिहिलेले 1000 पत्रके पोस्टाद्वारे त्यांच्या मुंबईच्या निवास्थानी पाठवण्यात आले आहेत. …

Read More »

पनवेल तालुक्यात 198 जण पॉझिटिव्ह

एकाचा मृत्यू; 168 रुग्णांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात सोमवारी (दि. 27) कोरोनाचे 198 नवीन रुग्ण आढळले असून 168 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर एकाचा मृत्यू झाला आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 152 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 120 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी …

Read More »

गूढ कायम

बॉलिवुड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या कथित आत्महत्येला महिनाभराहून अधिक काळ लोटला आहे. या काळात त्याच्या मृत्यूसंदर्भात अनेक उलटसुलट दावे-प्रतिदावे केले गेले असून तपासाचे गुर्‍हाळ सुरुच आहे. या प्रकरणी 36 जणांचे जाब-जबाब नोंदवण्यात आल्याचे स्वत: गृहमंत्र्यांनी रविवारी सांगितले. मात्र अद्यापही या प्रकरणी ठोस अशी कोणतीही माहिती पुढे आलेली नाही. गृहमंत्री …

Read More »

मुरूड : येथील एक आकर्षण असलेल्या नवाबाच्या राजवाड्याने हिरवी शाल पांघरली आहे. (छाया : सुधीर नाझरे)

Read More »

कारगील दिनाचे औचित्य साधून सुभेदार डोंगरे यांचा सत्कार

मुरूड : प्रतिनिधी कारगील दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ अलिबाग सीशोर ने कारगील युद्धाशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या निगडीत असलेल्या रायगड जिल्ह्यातील सेवानिवृत्त सैनिकांचा यथोचित गौरव करण्यात आला. या सत्काराला अलिबाग व मुरुड तालुक्यातील वरिष्ठ सैनिकांना आमंत्रित करण्यात आले होते.सुभेदार सुभाष ाबू डोंगरे ,पी ओ आर  महेश मुकुंद सप्रे,हवालदार कमलाकर …

Read More »

अकरावी प्रवेशावेळी प्रमाणपत्रांसाठी सहा महिने मुदतवाढ देण्याची मागणी

अलिबाग : प्रतिनिधी अकरावी ऑनलाईन प्रवेशअर्जावेळी आवश्यक करण्यात आलेला विद्यार्थ्यांचा जातीचा दाखला, अधिवास आणि नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र सादर करण्यास सहा महिन्यांची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी कोकण पदवीधर मतदारसंघातील आमदार निरंजन डावखरे यांनी केली आहे. कोरोनाच्या संसर्गाने लागू केलेला लॉकडाऊन शिथिल होत असतानाच, अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश अर्जाचा पार्ट-1 भरताना विद्यार्थ्याचा …

Read More »

कोरोनामुळे फुलांचा सुगंधही हरवला; मागणी घटल्याने विक्रेते हवालदिल

मुरूड : प्रतिनिधी कोरोनामुळे वाहतूक व्यवस्था ठप्प होऊन सर्वच आर्थिक व्यवहारांना मोठा फटका बसला. जीवनावश्यक वस्तूंशिवाय अन्य कोणत्याही वाहतुकीला परवानगी नसल्याने इतर घटकांची मोठी कोंडी झाली. याचाच फटका फुलविक्रेत्यांनाही बसला असून, मागणी घटल्याने त्यांना तोटा सहन करावा लागत आहे. पूजा तसेच विवाह व अन्य समारंभांसाठी फुलांना खूप महत्त्व असते. कोरोनाच्या …

Read More »

डिकसळ परिसरात डुक्कर मृतावस्थेत; परिसरात दुर्गंधी

कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील डिकसळ गावात रस्त्याच्या कडेला डुक्कर पाळले जात आहेत. त्यातील एका डुकराचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला आहे, मात्र त्या मृत पावलेल्या डुकराला तेथून उचलून नष्ट करण्यात न आल्याने परिसरात तसेच रस्त्यावरून जाणार्‍या वाहनांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. कर्जत-नेरळ रस्त्यावर असलेल्या डिकसळ गावाच्या बाहेर नेरळकडे जाताना …

Read More »