Breaking News

Yearly Archives: 2020

तीन दिवसांत लाखोंची दंडवसुली; नवी मुंबई पालिकेची धडक कारवाई

नवी मुंबई ः बातमीदार कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी 10 दिवसांचा लॉकडाऊन सुरू झाला असला तरी अनेक नागरिक अत्यावश्यक वस्तू खरेदीच्या बहाण्याने घराबाहेर पडत असल्याचे निदर्शनास येत आहे. महापालिका आयुक्तांनी विभागनिहाय नियुक्त केलेल्या विभागप्रमुख दर्जाच्या समन्वय अधिकार्‍यांना संबंधित विभागातील पोलीस यंत्रणेसह प्रभावी अंमलबजावणीकडे दररोज नियमित विशेष लक्ष देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार …

Read More »

कामोठ्यातील डुकरे दाम्पत्याची कोरोनाकाळात घरपोच भाजीपाला सेवा

कामोठे ः प्रतिनिधी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पनवेल महानगरपालिका क्षेत्रात पुन्हा लॉकडाऊन पुकारण्यात आले आहे. अटी-शर्थींसह जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीला पालिकेने परवानगी दिली आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक गैरसोयींना तोंड द्यावे लागत आहे. असे असले तरी ते अपरिहार्य झाले आहे. अशा परिस्थितीत एकता सामाजिक संस्थेच्या माध्यमातून कामोठ्यातील उषा डुकरे आणि बिबीषण डुकरे दाम्पत्य …

Read More »

वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीकडून 38 जणांवर कारवाई

मोहोपाडा ः प्रतिनिधी रसायनी परिसरातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत असलेल्या वासांबे मोहोपाडा हद्दीत कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी ग्रामपंचायतीने कडक पावले उचलली असून मास्क न वापरणार्‍या 36 जणांवर कारवाई करीत 15,200 रुपयांचा दंड वसूल केला, तर बाजारपेठेतील दोन दुकानदारांकडून ग्राहकांसाठी सोशल डिस्टन्ससाठी उपाययोजना न केल्याने ग्राहक गर्दी करीत असल्याने …

Read More »

‘मूषक नियंत्रण कामगारांवरील अन्याय दूर करा’

नवी मुंबई ः बातमीदार जुलै महिना उजाडला तरी अजून पालिकेत मूषक नियंत्रण विभागात काम करणार्‍या कामगारांचे मे व जून महिन्याचे वेतन झाले नाही. त्यामुळे मूषक नियंत्रण कामगारांच्या वेतन विलंबाबाबत होणारा अन्याय दूर करण्याची मागणी सानपाड्यातील भाजप कार्यकर्ते पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडे केली आहे. नवी मुंबई महानगरपालिका …

Read More »

कोरोनाच्या संकटातही कामगार भरतीसाठी मुलाखती; भाजप कार्यकर्ते आक्रमक

मोहोपाडा ः प्रतिनिधी रसायनी मोहोपाडा परिसरातील एनआयएसएम सेबी रस्त्यालगत जय प्रेसिजन प्रोडक्ट कंपनी आहे. या कंपनीतील काही कामगारांना कोरोनाची लागण होऊन त्यांचे कोरोना अहवालही पॉझिटिव्ह येत आहेत. शिवाय कंपनीतील बरेच कामगार व त्यांचे कुटुंबीय विविध आजारांनी त्रस्त आहेत. त्यातच जय कंपनीने हा डाव साधून बाहेरील कामगारांच्या मुलाखती सुरू केल्याने त्या …

Read More »

वारी विठूरायाची काव्यस्पर्धेत माणगावच्या साहित्यिकांचे यश

माणगाव : प्रतिनिधी – उरण येथील मधुबन कट्टातर्फे आषाढी एकादशीनिमित्त नुकत्याच घेण्यात आलेल्या वारी विठूरायाची ऑनलाइन काव्यस्पर्धेत माणगावमधील चार स्पर्धकांनी क्रमांक पटकावून तालुक्याचा साहित्यिक ठसा उमटवला आहे. या वर्षी कोरोनाच्या महामारीत पंढरीची वारी चुकल्यामुळे कवितेतून विठूरायाचे स्मरण करून नवोदित व लौकिकप्राप्त अशा सर्व कवी-कवयित्रींना संधी मिळावी यासाठी या काव्यस्पर्धेचे आयोजन …

Read More »

अलिबाग ‘रोटरी’चा पदग्रहण सोहळा

डॉ. किरण नाबर यांची अध्यक्षपदी निवड अलिबाग : प्रतिनिधी – रोटरी क्लब ऑफ अलिबाग सिशोरच्या अध्यक्षपदी डॉ. किरण नाबर यांची नियुक्ती करण्यात आली. मावळते अध्यक्ष जगदिश राणे यांच्याकडून त्यांनी नुकताच पदभार स्वीकारला. सचिवपदी निमिश परब यांची, तर खजिनदारपदी डॉ. राजेंद्र चांदोरकर यांची नियुक्ती झाली आहे. कार्यकारीणीचा पदभार समारंभ झुम मिटींगच्या …

Read More »

कोरोना संसर्ग वाढतोय, तरीही गांभीर्य नाही!

अनेक जण मास्कविना कर्जत : प्रतिनिधी – कर्जत शहरात नगर परिषदेने मास्क न लावणार्‍यांवर दंड आकारणीची मोहीम सुरू केली आणि लोक मास्क लावू लागले, मात्र अद्यापही अनेकांना याचे गांभीर्य समजत नाही की, आम्हाला काहीच होणार नाही या आविर्भावात ते वावरताना दिसतात. काही लोक ते लावायचा म्हणून लावतात तसेच बाजारपेठेत फिरणार्‍या …

Read More »

माणगाव पोलीस ठाण्यात झाला कोरोनाचा शिरकाव

अधिकारी व कर्मचार्‍याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह माणगाव : प्रतिनिधी – माणगाव पोलीस ठाण्यात कोरोनाने शिरकाव केला असून, येथील एका अधिकार्‍याचा व एका कर्मचार्‍याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने पोलीसवाले धास्तावले आहेत. माणगावमध्ये एका पोलीस अधिकार्‍याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. या अगोदर एका पोलीस कर्मचार्‍याला कोरोना झालेला आहे. उपजिल्हा रुग्णालय, तहसील कार्यालयापाठोपाठ आता …

Read More »

रायगडात 12 रुग्णांचा मृत्यू; 264 नवे पॉझिटिव्ह

पनवेल : रायगड जिल्ह्यात सोमवारी (दि. 6) तब्बल 12 कोरोनाबळींची नोंद झाली असून, 264 नव्या रुग्णांची भर पडली आहे. मृत रुग्णांमध्ये पनवेल ग्रामीणमधील पाच, तर पनवेल महापालिका हद्द तसेच उरण, खालापूर, पेण, म्हसळा, महाड व पोलादपूर तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. याशिवाय पॉझिटिव्ह आढळलेले रुग्ण पनवेल मनपा हद्दीत 124, अलिबाग …

Read More »