पनवेल : बातमीदार नवी मुंबईत कठोर टाळेबंदी सुरू केली आहे. मुंबईतून अत्यावश्यकसेवेव्यतिरीक्त अन्य कोणालाही शहरात येऊ दिले जात नाही. याच कारवाई दरम्यान 175 हून अधिक रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत. या सर्व रिक्षा नवी मुंबईतील टाळेबंदी संपल्यावर परत देण्यात येणार आहेत. वाशी टोल नाक्यावर सदर कारवाई करण्यात आली आहे. नवी …
Read More »Yearly Archives: 2020
नवी मुंबईत कोरोनाचा वाढता संसर्ग; एक लाख 60 हजार चाचण्यांचे लक्ष्य
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त शहरात कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी येत्या काळात एक लाख 60 हजार नागरिकांच्या चाचण्या घेण्यास पालिका प्रयत्नशील असल्याची माहिती पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी दिली. नवी मुंबईत बाधितांची संख्या 8072 झाली आहे, तर आजवर 260 जण मृत्युमुखी पडले आहेत. मुंबईप्रमाणेच चाचण्यांची गती वाढवून रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा …
Read More »स्वराज्याची राजधानी अंधारातच
महिनाभरानंतरही किल्ले रायगड विजेविना महाड : प्रतिनिधीनिसर्ग चक्रीवादळाने किल्ले रायगड आणि परिसरातील विजेचे पोल कोसळल्याने गेल्या एक महिन्यापासून तमाम महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेली स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड अंधारात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसह परिसरातील गावांमध्येही अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात जाणता राजाची जर ही अवस्था असेल तर रयतेचे …
Read More »रायगडात 235 नवे पॉझिटिव्ह रुग्ण; पाच जणांचा मृत्यू
पनवेल : रायगड जिल्ह्यात मंगळवारी (दि. 7) कोरोनाच्या 235 नव्या रुग्णांची नोंद झाली असून, पाच जण मृत्युमुखी पडले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल महापालिका हद्दीतील 90, पनवेल ग्रामीणमधील 24, अलिबाग तालुक्यातील 19, रोहा 17, म्हसळा 16, पेण व श्रीवर्धन प्रत्येकी 15, उरण 14, खालापूर 11, मुरूड सात, कर्जत पाच आणि …
Read More »पेण एसटी स्थानकात पाणीच पाणी!
पेण : प्रतिनिधीरायगड जिल्ह्यातील मध्यवर्ती असलेल्या पेण एसटी बसस्थानकाची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत असून राजकीय उदासीनता आणि शासकीय वेळकाढूपणामुळे या स्थानकाचा विकास होत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. पावसाळा सुरू झाल्याने येथे पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. दरवर्षीची ही समस्या यंदाही कायम आहे.लॉकडाऊनच्या काळात राज्यातील एसटी बसेस बंद ठेवण्यात आल्या …
Read More »राज्य सरकारने महावितरणला निधी द्यावा
आमदार गणेश नाईक यांची मागणी नवी मुंबई : बातमीदारकोरोना महामारीने नागरिकांच्या हाताला काम उरलेले नाही. अनेकांच्या नोकर्या गेल्या असून, कित्येक जणांच्या पगारात कपात केली गेली आहे. अशा वेळी राज्य सरकारने नागरिकांच्या हिताचे निर्णय घेणे अपेक्षित असताना उलट शासनाचे प्राधीकरण असलेल्या महावितरणकडून नागरिकांची लूट सुरू आहे. ती थांबावी यासाठी सरकारने महावितरणला …
Read More »जिल्हाबंदी, नाकाबंदी कडक करावी
महाड : प्रतिनिधीकोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाड बंद हा उपाय नसून, हा बंद त्वरित शिथिल करावा आणि कडक जिल्हाबंदी लागू करून पोलीस नाकाबंदीही अधिक कडक करा, अशी मागणी महाड भाजपच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांच्याकडे करण्यात आली.महाडमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे, मात्र ठराविक मंडळी आणि व्यापार्यांनी मिळून आठ दिवस …
Read More »उद्धव ठाकरे मातोश्रीबाहेर पडतच नाहीत : चंद्रकांत पाटील
पुणे : प्रतिनिधीराज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दररोज राज्याच्या वेगवेगळ्या भागांचे दौरे करीत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र मातोश्रीवरून बाहेर पडायला तयार नाहीत, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. ते मंगळवारी (दि. 7) पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर …
Read More »सरकारची नाचक्की
विद्यापीठ आणि उच्च शैक्षणिक संस्थांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयामुळे राज्यातील तीन चाकी आघाडी सरकार चांगलेच तोंडावर पडले आहे. या परीक्षा सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस घेण्याचा निर्णय विद्यापीठ अनुदान आयोगाने सोमवारी दिला. अधिकार नसताना राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मात्र बराच मनस्ताप सहन करावा लागत असून त्यांची अवस्था कात्रीत सापडल्यासारखी …
Read More »उरण ः शहरातील बाजारपेठेत असलेले राजपाल नाका येथील मोबइल चॉइस एन एक्सचे उद्घाटन भाजप उरण शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. या वेळी उरण नगर परिषद उपनगराध्यक्ष जयविन कोळी, मननशेठ पटेल, भरत चौधरी, हितेश शाह, अजित भिंडे, सागर मोहिते, हस्तीमल मेहता आदी उपस्थित होते.
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper