Breaking News

Yearly Archives: 2020

सततच्या पावसाने कार्वी प्रकल्प जमीनदोस्त

पाली ः प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील उद्धर येथील प्रयोगशील तरुण शेतकरी तुषार केळकर यांचा कार्वी प्रकल्प सततच्या पावसामुळे सोमवारी कोसळला. या वेळी तेथे कोणी नसल्याने जीवितहानी झाली नाही, मात्र त्यांचे 40 हजारांहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे. निसर्ग चक्रीवादळाने सार्‍यांचे मोठे नुकसान केले होते. अनेकांचे प्रकल्पदेखील यात मोडून पडले आहेत. इको …

Read More »

नवी मुंबई महापालिका प्लाझ्मा थेरपीसाठी प्रयत्नशील

नवी मुंबई ः बातमीदार नवी मुंबई महापालिका परिसरात कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना दुसरीकडे बरे होणार्‍यांचे प्रमाणदेखील अधिक आहे. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट 50 टक्के असताना नवी मुंबईचा रिकव्हरी रेट 57 ते 58 टक्के आहे. त्यात सध्या देशात बरे होणार्‍या कोरोना रुग्णांचा वापर करीत प्लाझ्मा थेरपी सुरू करण्यात आली असून ती …

Read More »

कर्जत तालुक्यात पाच नवीन रुग्ण

कर्जत ः प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मंगळवारी आढळलेले पाचही रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. त्यामुळे तालुक्यातील रुग्णांची संख्या 171वर गेली आहे. मंगळवारी आढळलेल्या कोरोनाबाधित रुग्णांपैकी धाकटे वेणगाव येथील 19 वर्षांचा युवक पाताळगंगा येथील रिलायन्स कंपनीमध्ये दररोज कामासाठी ये-जा करीत आहे, तर नेरळनजीकच्या दामत येथील 57 वर्षांची …

Read More »

कोरोनाविषयक नियमांचे पालन न केल्यास दंड

पनवेल ः प्रतिनिधी पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी आयुक्तांच्या आदेशांचे पालन न केल्यास आता एक हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. अनेक नागरिक कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करीत नसल्याचे दिसत असल्याने महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी …

Read More »

पनवेल तालुक्यात 114 नवीन रुग्ण; एकाचा मृत्यू, 174 रुग्णांची कोरोनावर मात

पनवेल ः प्रतिनिधी  पनवेल तालुक्यात मंगळवारी 114 नवीन रुग्ण आढळले असून, एकाचा मृत्यू झाला आहे, तर 174 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत मंगळवारी 90 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून, एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे,  तर 93 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. पनवेल ग्रामीणमध्ये 24 …

Read More »

सर्पमित्रांनी अजगराच्या पिलांना दिले जीवदान

उरण : प्रतिनिधी वन्यजीव निसर्ग संरक्षण सर्पमित्र संस्थेच्या सदस्यांनी दोन दिवसांत चार अजगराच्या पिलांना जीवदान दिले असून, त्यांना वनरक्षकांच्या उपस्थितीत जंगलात सोडण्यात आले.अजगर जातीचा साप हा शेड्यूल्ड 1मध्ये मोडत असल्याने त्याचे वन कायदे कडक करण्यात आले आहेत. उरण परिसरात सर्पमित्र, निसर्गमित्र सतर्क असल्यामुळे या परिसरात अनेक वन्यप्राणी, साप वाचविले जात …

Read More »

नवी मुंबईत 159 जण कोरोनामुक्त 115 जण पॉझिटिव्ह

नवी मुंबई ः बातमीदार नवी मुंबईत मंगळवारी 159 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले, तर 115 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. गेला आठवडाभर बाधितांची संख्या वाढली असताना मंगळवारी कमी झालेल्या रुग्णसंख्येने नवी मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. कोरोनाबधितांची एकूण संख्या आठ हजार 72 झाली आहे. बरे झालेल्यांची एकूण संख्या चार …

Read More »

वासांबे मोहोपाड्यात 62 कोरोनाबाधित

मोहोपाडा ः प्रतिनिधी कोरोना महामारीच्या संकटाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. रसायनी परिसरातील  वासांबे मोहोपाडा हद्दीतही कोरोनाने दहशत निर्माण केली आहे. वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत हद्दीत कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने परिसरात चार दिवसांचा जनता कर्फ्यूही झाला. दरम्यान, मंगळवारी दुपारपर्यंत वासांबे मोहोपाडा हद्दीतील महेशवरी पार्क वसाहतीत दोघांचे, तर रिसवाडीतही दोघा पती-पत्नीचे कोरोना अहवाल …

Read More »

लावणीच्या कामांना सुरुवात

पनवेल ः बातमीदार मागील चार-पाच दिवसांपासून पावसाने जोरदार बरसायला सुरुवात केल्याने बळीराजा सुखावला असून शेतात पुरेशा प्रमाणात पाणी झाल्याने पनवेल तालुक्यातील शेतकर्‍यांनी लावणीच्या कामांना सुरुवात केली आहे. जून महिन्याच्या सुरुवातीस हजेरी लावलेल्या पावसाने अचानक दडी मारल्याने बळीराजा चिंताग्रस्त झाला होता. पाण्याअभावी दुबार पेरणीचे संकट बळीराजावर ओढावल होते, मात्र मागील दोन …

Read More »

कोविड रुग्णालयात गॅस पाइपलाइनद्वारे ऑक्सिजन पुरवठा

नवी मुंबई ः बातमीदार केवळ 20 दिवसांत नवी मुंबइतील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये उभारण्यात आलेल्या 1183 बेड्स क्षमतेच्या कोविड रुग्णालयामध्ये 483 ऑक्सिजन बेड्सची सुविधा करण्यात आली आहे. या बेड्सना तातडीची गरज म्हणून सिलिंडरद्वारे ऑक्सिजन पुरवठा केला जात होता, मात्र यामध्ये अधिक सुधारणा करीत रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा समान दाबाने मिळावा या दृष्टीने …

Read More »