Breaking News

Yearly Archives: 2020

शासकीय मदत रोख स्वरूपात मिळावी -आमदार रविशेठ पाटील

पेण : प्रतिनिधीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या काळात केंद्र सरकारच्या माध्यमातून 20 लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले, तसेच विनामूल्य धान्य देण्याचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर राज्य शासनानेही पुढाकार घेऊन जनतेला रोख रक्कम स्वरूपात मदत करावी, अशी मागणी आमदार रविशेठ पाटील यांनी केली आहे. आमदार पाटील म्हणाले की, कोरोना संकट आपल्या …

Read More »

अलिबागच्या कोविड रुग्णालयात सुविधा पुरवा -अ‍ॅड. महेश मोहिते

अलिबाग : प्रतिनिधीअलिबाग येथील कोविड रुग्णालयात सुविधांचा अभाव असल्यामुळे तेथे दाखल करण्यात आलेल्या रुग्णांचे हाल होत आहेत. या रुग्णालयात सुविधा पुरवा, अशी मागणी भाजप दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांनी केली आहे.  अ‍ॅड. मोहिते यांनी अलिबागच्या कोविड रुग्णालयात रुग्णांवर उपचार करणारे डॉ.  विक्रमजीत पडोळे, डॉ. राजीव तांबोळे यांची …

Read More »

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर पंतप्रधान मोदींची राष्ट्रपतींशी चर्चा

नवी दिल्ली : वृत्तसंस्थापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि.5) राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली. या वेळी पंतप्रधान मोदींनी राष्ट्रपती कोविंद यांना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय मुद्द्यांची माहिती देत चर्चा केली. पंतप्रधान मोदी व राष्ट्रपती यांच्यात जवळपास अर्धा तास चर्चा झाली, मात्र या दोघांमध्ये काय चर्चा झाली, याबाबत नेमकी माहिती अद्याप …

Read More »

रेवदंड्यात कडकडीत बंद

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचे पाऊल रेवदंडा : प्रतिनिधीकोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून रेवदंडा ग्रामपंचायत आणि रेवदंडा-चौल व्यापारी असोसिएशनच्या माध्यमातून तीन दिवसासाठी रेवदंडा बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बंदला नागरिकांनी प्रतिसाद दिला.  रेवदंडा हे अलिबाग, रोहा व मुरूड तालुक्यांसाठी मध्यवर्ती ठिकाण आहे. शिवाय परिसरातील गावांत कोरोना रुग्ण आढळल्याने रेवदंडा ग्रामस्थांच्या …

Read More »

वादळग्रस्तांच्या मदतीत वाढ करा

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र मुंबई : प्रतिनिधीनिसर्ग चक्रीवादळाने नुकसानग्रस्त झालेल्या कोकणवासीयांना राज्य शासनाने जाहीर केलेली मदत अपुरी असून, त्या मदतीत वाढ करावी, यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. चक्रीवादळात कोकणवासीयांचे प्रचंड नुकसान झाले. त्यापैकी अनेक ठिकाणी अद्याप मदत पोहोचली नसल्याने कोकणवासीयांच्ता अपेक्षांचा …

Read More »

महामार्गालगत रानभाजी विकणार्‍या महिलेचा कंटेनरच्या धडकेत मृत्यू

खोपोली : प्रतिनिधीमुंबई-पुणे महामार्गावर खालापूरनजीक रस्त्याशेजारी रानभाज्या विक्रीसाठी बसलेल्या एका महिलेचा कंटेनरची धडक बसून जागीच मृत्यू झाला. त्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. जानकी पवार (वय 65, शिरवली वाडी, ता. खालापूर) असे मयत वृद्ध महिलेचे नाव असून, तिच्या पश्चात अपंग मुलगा आहे.पोटाची खळगी भरण्यासाठी आदिवासी महिला महामार्गालगत रानभाज्या विक्रीसाठी बसतात. पुणे, …

Read More »

निसर्ग चक्रीवादळग्रस्त कोकणवासीयांच्या व्यथा

निसर्ग चक्रीवादळ होऊन एक महिना उलटून गेला. तरीही वादळग्रस्तांच्या समस्या कायम आहेत. आधीच कोरोना या वैश्विक महामारीचा सामना करताना कोकणवासीय त्रस्त असताना नैसर्गिक आपत्तीने त्यांचे वर्तमान पुरते उद्ध्वस्त झाले असून, भविष्याबाबतही चिंतेचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत राज्य शासनाने त्यांना सर्वतोपरी साह्य करणे आवश्यक असताना साध्या मूलभूत सेवाही नीटपणे पुरविल्या जात …

Read More »

निजामपुरात कोरोनाचा शिरकाव; बाधितांची संख्या 55

माणगाव ः प्रतिनिधी माणगाव तालुक्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला असून रुग्णसंख्येत वाढ होत आहे. लॉकडाऊनच्या सहाव्या टप्प्यात निजामपूर गावात कोरोनाने शिरकाव केला असून येथे एक 25 वर्षीय तरुण, माणगाव येथील एक, मोर्बा येथील दोन रुग्णांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तसेच तालुक्यातील 13 रुग्णांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती …

Read More »

कोरोनाग्रस्तांच्या कुटुंबीयांना सहज जेवण डबा; सहजसेवा फाऊंडेशनचा अनोखा उपक्रम

खोपोली ः प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खालापूर तालुक्यातील कोविड रुग्ण तसेच त्यांच्या कुटुंबीयांसाठी खोपोलीतील सहजसेवा फाऊंडेशनने मदतीचा हात पुढे केला आहे. कोरोना रुग्ण असलेल्या व्यक्तीच्या घरी जेवण बनविण्यासाठी कोणी नसेल किंवा रुग्ण हॉस्पिटलमध्ये असेल अथवा त्यांच्या घरी छोटी मुले किंवा वृद्ध व्यक्तींना जेवणाची गैरसोय होत असेल तर त्यांच्यासाठी घरपोच निःशुल्क जेवण …

Read More »

मी कर्जतकरचा नागरिकांना दिलासा; आरोग्य सुविधा कर्जतकरांच्या दारी

कर्जत ः बातमीदार कोरोनाने जगभर थैमान घातले आहे. या विषाणूवर अद्याप कोणतेही औषध किंवा लस उपलब्ध नाही. कर्जत तालुक्यात कोरोना रुग्णांचा आकडा शंभरी पार करून पुढे गेला आहे. त्या अनुषंगाने कर्जत येथील भाजपच्या किसान मोर्चा प्रदेश चिटणीस सुनील गोगटे यांच्याकडून कर्जतमध्ये मी कर्जतकर हे अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत …

Read More »