Breaking News

Yearly Archives: 2020

लोकनेते रामशेठ ठाकूर भाजप प्रदेश कार्यसमिती विशेष निमंत्रित सदस्यपदी

पनवेल : रामप्रहर वृत्तभाजपच्या राज्य कार्यकारिणीची घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. या कार्यकारिणीत 12 प्रदेश उपाध्यक्ष, पाच महामंत्री, एक कोषाध्यक्ष, प्रदेश कार्यसमिती विशेष निमंत्रित सदस्य, कार्यसमिती सदस्य, निमंत्रित सदस्य, मोर्चा, प्रकोष्ट, मीडिया, सोशल मीडिया आदींचा समावेश आहे. यातील प्रदेश कार्यसमिती विशेष निमंत्रित सदस्यपदी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची …

Read More »

कर्नाळा बँक गैरव्यवहार  प्रकरणाचा तपास सीआयडीकडे

पनवेल : रामप्रहर वृत्तशेकाप नेते माजी आमदार विवेक पाटील अध्यक्ष असलेल्या कर्नाळा नागरी सहकारी बँकेतील 512 कोटी 54 लाख 53 हजार रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणाचा तपास राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) सोपवण्यात आला आहे. गत फेब्रुवारी महिन्यामध्ये या प्रकरणी कर्नाळा बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांच्यासह संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि …

Read More »

रायगडात 261 नवे रुग्ण; पाच जणांचा मृत्यू

पनवेल : रायगड जिल्ह्यात शनिवारी (दि. 4) कोरोनाच्या 261 नव्या रुग्णांची नोंद झाली असून, पाच जण मृत्युमुखी पडले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल महापालिका हद्दीतील 135, पनवेल ग्रामीणमधील 46, पेण तालुक्यातील 23, खालापूर तालुक्यातील 17, उरण तालुक्यातील 13, रोहा व म्हसळा तालुक्यातील प्रत्येकी आठ, माणगाव तालुक्यातील चार, कर्जत तालुक्यातील तीन, …

Read More »

राज्य सरकारने मनपांशी समन्वय साधावा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची सूचना पनवेल : प्रतिनिधीराज्य सरकारने कोविड-19 नियंत्रणात आणण्यासाठी महापालिकांना एका नव्या पैशाचीही मदत केली नाही. आरोग्य यंत्रणा सरकारच्या नियंत्रणात असल्या तरी महापालिकांवर त्याचा मोठा बोजा पडत आहे. मोठ्या महापालिका तो खर्च पेलू शकतात, मात्र लहान महापालिकांची अडचण होत आहे. ते पाहता राज्य सरकारने …

Read More »

सर्वपक्षीय संघर्ष समिती आणि सिडको यांची मास हाऊसिंग प्रकल्पासंदर्भात बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते दि. बा पाटील साहेब सर्वपक्षीय संघर्ष समिती आणि सिडको यांची बैठक शुक्रवारी (दि. 3) सिडको भवनात झाली. सिडको उलवे नोड येथे नव्याने जो मास हाऊसिंग प्रकल्प आणत आहेत त्याला सर्वपक्षीय समितीने या वेळी प्रखर विरोध दर्शविला. या बैठकीला लोकनेते दि. बा. पाटील साहेब संघर्ष समितीचे अध्यक्ष …

Read More »

रायगडात पावसाची संततधार

अलिबाग : प्रतिनिधीगेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने अखेर रायगड जिल्ह्यात दमदार पुनरागमन केले. त्यामुळे पावसाची प्रतीक्षा संपली आहे. शनिवारी (दि. 4) दिवसभर पावसाची संततधार सुरू असल्याचे पहावयास मिळाले. यंदा मान्सून वेळेत दाखल झाला. नाममात्र हजेरी लावून वरुणराजाने दडी मारली होती. शुक्रवारी पावसाने जिल्ह्यात पुनरागमन केले. त्यानंतर त्याचा जोर वाढत …

Read More »

लॉकडाऊन, नैसर्गिक संकटाशी मुकाबला करीत गणेशमूर्ती रवाना

पेण : प्रतिनिधीकोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून सुरू असलेला लॉकडाऊन आणि त्यानंतर जून महिन्यात आलेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या संकटावर मात करून पेणच्या सुप्रसिद्ध गणेशमूर्ती परदेशी निघाल्या आहेत.प्रतिकूल परिस्थितीतही गणेश मूर्तिकारांनी हार न मानता नव्या जोमाने कामाला लागून पेण शहरातील विविध कलाकेंद्रांतून गणेशमूर्ती दुबई, थायलंड, इंडोनेशिया, मॉरिशियस येथे पाठविल्या आहेत. इंडोनेशिया व …

Read More »

‘अक्षरकार’ कमल शेडगे यांचे निधन

मुंबई : प्रतिनिधी सुप्रसिद्ध ‘अक्षरकार’ कमल शेडगे यांचे शनिवारी (दि. 4) मुंबईतील राहत्या घरी हृदयविकाराने निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि सून असा परिवार आहे. कमल शेडगे यांना मुळात चित्रकलेची आवड होती. वृत्तपत्रात नोकरी सुरू केल्यानंतर ते अक्षरलेखनाकडे वळले.1962 साली ’रायगडाला जेव्हा जाग येते’ …

Read More »

करंजा-रेवस प्रवासी वाहतूक बंद

उरण : प्रतिनिधी लॉकडाऊननंतर 12 दिवसांपूर्वीच सुरू करण्यात आलेली करंजा-रेवस या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक करणारी तरसेवा बंदरात तीन नंबरचा धोक्याचा इशारा देणारा लाल बावटा लावण्यात आला असल्याने 4 जुलैपासून अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आल्यानंतर 22 जुनपासुन करंजा-रेवस तरसेवा शासनाच्या आदेशानंतर पुन्हा सुरू करण्यात …

Read More »

पमपा हद्दीत पाच खासगी कोविड रुग्णालयांना मान्यता

पनवेल : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिका हद्दीत वाढत्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा एक भाग म्हणून कोरोना विषाणू या संसर्गजन्य रोगाच्या उपचारासाठी खाजगी कोविड हॉस्पिटल आवश्यक असल्याने शनिवारी (दि. 4) महापालिका आयुक्तांनी पाच खासगी रुग्णालयांना कोविड-19 रूग्णांलय म्हणून मान्यता दिली आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने उपलब्ध हॉस्पिटलमध्ये …

Read More »