अत्यावश्यक सेवांना सूट पनवेल ः रामप्रहर वृत्तकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिका क्षेत्रात शुक्रवारी (दि. 3) रात्री 9 वाजल्यापासून 14 जुलैच्या पहाटे 5 वाजेपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने आमदार प्रशांत ठाकूर आणि महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांनी यासाठी महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे पाठपुरावा केला होता. …
Read More »Yearly Archives: 2020
जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांना मिळणार साडेबारा टक्के विकसित भूखंड
पनवेल ः उरण वार्ताहरजेएनपीटी प्रकल्पग्रस्तांना 12.5 टक्के विकसित भूखंड देण्याबाबत लवकरात लवकर कार्यवाही करू, असे आश्वासन जेएनपीटीचे डेप्युटी चेअरमन उन्मेष वाघ यांनी दिले आहे. जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांना देण्यात येणार्या 12.5 टक्केभूखंड वाटपाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. तो मार्गी लावण्यासाठी लोकनेते दि. बा. पाटीलसाहेब सर्वपक्षीय प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या मागणीनुसार गुरुवारी (दि. …
Read More »रायगडात सहा जणांचा मृत्यू; 247 नवीन रुग्ण
पनवेल : रायगड जिल्ह्यात गुरुवारी तब्बल 247 नवीन रुग्ण आढळले असून सहा जणांचा मृत्यू झाला, तर 109 रुग्ण बरे झाल्याने घरी गेले आहेत. पनवेल महापालिका क्षेत्रात 115, पनवेल ग्रामीणमध्ये 67, रोहा 16, खालापूर 14, पेण 13, अलिबाग 12, कर्जत सहा आणि उरणमध्ये चार रुग्ण आढळले. रायगडात कोरोना रुग्णांची एकूण संख्या …
Read More »तीन दिवसांच्या बंदनंतर कर्जत बाजारपेठेत झुंबड
कर्जत ः प्रतिनिधीकर्जत तालुक्यात कोरोनाचा ससेमिरा सुरूच आहे. दररोज कोरोनाग्रस्तांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही कोरोना पसरला आहे. या पार्श्वभूमीवर कर्जतच्या व्यापारीवर्गाने 29, 30 जून व 1 जुलै असा तीन दिवस कडकडीत बंद पाळला, मात्र गुरुवारी (दि. 2) बाजारपेठ उघडल्यानंतर कर्जत बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.तालुक्यात …
Read More »चित्रकलेतून घडविले विठूरायाचे दर्शन
मुंबई ः प्रतिनिधी कोरोनामुळे यंदा वारकर्यांची पंढरीची वारी चुकली. परंतु विठूरायावरील नागरिकांचा भक्तीभाव तसूभरही कमी झाला नाही, हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील देवगड तालुक्यातील गव्हाणे या गावच्या अक्षय मेस्त्री या चित्रकाराने आपल्या कलेतून दाखवून दिले आहे. अक्षयने गवाणे यांनी दीड एकर जमिनीत पावसाळी येणार्या गवतामध्ये भव्य दिव्य विठ्ठलाचे चित्र साकारले आहे. या …
Read More »कारखान्यांमुळे कोरोनाग्रस्त रुग्णांत वाढ; व्यवस्थापनावर लगाम घालण्याची मागणी
खोपोली : प्रतिनिधी खालापूर खोपोली शहरात सह अन्य ठिकाणी कारखाने पूर्वी प्रमाणेच सुरू झाल्याने या कारखान्यात व्यवस्थापन विभागात काम करणारे काही कर्मचारी, अधिकारी हे कोरोनाग्रस्त तालुक्यासह मुंबई-पुणे या भागातून खोपोली खालापुरात येतात. परिणामी या रूपाने कोरोनाचे शिरकाव करून कोरोना बाधित रुग्णाच्या संख्येत वाढ झाली आहे. खालापूर तालुक्यात व खोपोली शहरात …
Read More »‘फडणवीसांनी दोन तासांत प्रश्न सोडवले असते’
मुंबई : प्रतिनिधी कोरोना संकटात देवेंद्र फडणवीसांकडे फक्त दोन तास मागितले असते तर त्यांनी दोन तासांमध्ये कितीतरी प्रश्न सोडवले असते. पण ही मदत घ्यायला यांचा इगो आडवा येतो आहे. असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे यांच्यावर चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा या शब्दांमध्ये टीकास्त्र सोडले …
Read More »कोरोनाग्रस्ताचे रुग्णालयातून पलायन; पोलिसांकडून शोध सुरू
पनवेल : वार्ताहर कोरोना बाधित रूग्णांच्या संसर्गामुळे इतरांना कोरोनाची लागण होत असल्याची माहिती असताना देखील पनवेल भागात राहणार्या एका 32 वर्षीय कोरोना बाधित तरूणाने कामोठे येथील एमजीएम रूग्णालयातून कोणाला काही एक न सांगता पलायन केल्याची घटना घडली आहे. रूग्णालयातून पळून गेलेल्या या कोरोना बाधित रूग्णामुळे इतरांना कोरोनाची लागण होऊन त्यांच्या …
Read More »रसायनी परिसरात कडकडीत बंद
मोहोपाडा : प्रतिनिधी रसायनी परिसरातील वासांबे (मोहोपाडा) ग्रामपंचायत हद्दीत कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या दहा दिवसांपासून वाढत चाचला आहे. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही कोरोना पसरला आहे. परिसरातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी वासांबे मोहोपाडा, चांभार्ली व वावेघर ग्रामपंचायतीकडून चार दिवस परीसरातील बाजारपेठ बंद ठेवण्यात आल्या आहेत. वासांबे (मोहोपाडा) ग्रामपंचायत हद्दीत 41 कोरोनारुग्णांची संख्या झाली …
Read More »पनवेल तालुक्यात 182 कोरोनाबाधित; तिघांचा मृत्यू; 77 जण कोरोनामुक्त
पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात गुरुवारी (दि. 2) कोरोनाचे 182 नवीन रुग्ण आढळले असून तिघांचा मृत्यू झाला आहे. तर 77 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. महापालिका हद्दीत 115 नवे रुग्ण आढळले असून दोघांचा मृत्यू झाला आहे. तर 65 रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. पनवेल ग्रामीणमध्ये 67 …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper