पनवेल : बातमीदार कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून तीन प्रमुख उपाययोजना सांगितल्या गेल्या असून त्यात सातत्याने हात धुण्याचा सल्ला महत्त्वाचा आहे. भीतीपोटी साबणाने अथवा सॅनिटायझरने सातत्याने हात धुतले जात आहेत. हे प्रमाण वाढू लागल्याने त्वचेच्या संरक्षक थराला इजा होऊन त्वचारोगांची समस्या निर्माण झाली आहे. हाताला खाज येणे, पांढरे चट्टे उठणे …
Read More »Yearly Archives: 2020
वटपौर्णिमेच्या साहित्य खरेदीसाठी महिलांची गर्दी
उरण : वार्ताहर वटपौर्णिमा शुक्रवारी (दि. 5) रोजी असल्याने वटवृक्षाची पूजा करण्यासाठी लागणार्या पुजेच्या सामुग्री खरेदी करण्यासाठी उरण बाजारात महिलांची लगबग दिसत होती. कोरोना रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये. त्यासाठी राज्यात सर्वत्र लॉकडाऊन असल्याने उरण बाजारात कर्नाटक, रत्नागिरी कोकण येथून येणारे फणस यंदा न आल्याने बाजारात फणस, फणसाचे गरे गायब झालेले …
Read More »खारघरमध्ये गरजूंना मदत करणार्या भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा सत्कार
खारघर : रामप्रहर वृत्त लॉकडाऊन काळात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली खारघरमध्ये गरजूंना जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, जेवण्याचे पॅकेट्स वाटप करण्यात आले. या सहकार्य करणार्या भाजप लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते यांचा सत्कार करण्यात आला. जीवघेणा कोविड-19 चा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र व राज्य …
Read More »नगरसेवक नितीन पाटील यांची नुकसानीची पाहणी
पनवेल : निसर्ग वादळामुळे शहरात ठिकठिकाणी एमएसईबीचे खांब पडले. त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला होता. तो पूर्ववत करण्यासाठी एमएसईबीचे अधिकारी व अग्निशमन दलाचे अधिकारी अनिल जाधव यांना सहकार्य करण्यासाठी भाजपचे नगरसेवक नितीन पाटील हजर होते. या वेळी परिसरात झालेल्या नुकसानीची माहिती नगरसेवक पाटील यांनी जाणून घेतली. वटसावित्रीच्या खरेदीसाठी नागरिकांची पनवेल …
Read More »झाड कोसळून चारचाकीचे नुकसान
नवी मुंबई : बातमीदार बेलापुर अग्रोळी गावात सोसाट्याच्या वार्याने झाड कोसळून चारचाकीचे नुकसान झाल्याची घटना बुधवारी सकाळी 11.30 वाजता घडली. कोकण किनारपट्टीवर सलग दोन दिवस ’निसर्ग’ वादळ धडकणार असल्याने सकाळपासून नवी मुंबईत सोसाट्याचे वारे वाहू लागले होते. या वार्यांमुळे सेक्टर 29 येथे उद्यानातील हे झाड रस्त्यावर कोसळले. त्यामुळे अरुंद असलेला …
Read More »उरणमध्ये मोठ्या झाडांची पडझड
उरण : वार्ताहर निसर्ग चक्रीवादळाने सर्वत्र हाहाकार केल्याने बुधवारी (दि. 3) उरण शहरात ठिकठिकाणी छप्परांवरील पत्रे उडाले, मोठे वृक्ष कोलमडले. सुदैवाने जीवित हानी झाली नाही. उरण शहरातील बोरी गावातील माजी नगराध्यक्ष अनंत गायकवाड व उद्योजक सदानंद गायकवाड यांच्या इमारतीवरील पत्र्याची शेड उडून खाली पडली. उद्योजक सदानंद गायकवाड यांच्या घराजवळील असेलेल्या …
Read More »चक्रीवादळाने रसायनीत नुकसान
मोहोपाडा : प्रतिनिधी रसायनीत निसर्ग चक्रीवादळाने बुधवारी (दि. 3) साडेअकरा वाजल्यानंतर रौद्ररुप धारण करून सर्वत्र होत्याचे नव्हते केले. सोसाट्याच्या वादळ वार्याबरोबर पावसानेही रौद्र रूप धारण केल्याने जनजीवन विस्कळीत झाले. सायं साडेपाच वाजेपर्यंत निसर्ग चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसल्याने चांभार्ली ते मोहोपाडा रस्त्यासहलगतची व इतर परिसरातील झाडे उन्मळून पडल्याने काही वेळ वाहतूक …
Read More »देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दोन लाखांच्या पार
नवी दिल्ली : वृत्तसंस्थाआरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार देशात गेल्या 24 तासांत 8909 कोरोनाग्रस्तांची नोंद झाली असून, ही संख्या एका दिवसातील सर्वाधिक आहे. नव्या रुग्णांमुळे कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा दोन लाखांच्या पुढे गेली आहे, तर या विषाणूने आतापर्यंत 5815 लोकांचा बळी घेतला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत एक लाख 303 लोकांनी …
Read More »निसर्ग चक्रीवादळाचा रायगडला तडाखा
जिल्ह्यात अनेक ठिकाणी पडझड मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान अलिबाग : प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात कोरोनाचे संकट वाढत असतानाच बुधवारी (दि. 3) जिल्ह्याला निसर्ग चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसला. सोसाट्याच्या वार्यामुळे ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली. घरांची छपरे उडाली. त्यामुळे मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. झाडे रस्त्यावर पडल्याने काही ठिकाणची वाहतूक बंद ठेवण्यात आली …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्यामुळे निराधार परप्रांतियांना आधार
पनवेल : रामप्रहर वृत्तकोरोना विषाणू प्रादुर्भाव आणि लॉकडाऊन परिस्थितीमुळे विनानिवारा फसलेल्या निराधार 11 परप्रांतियांना भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली मदतीचा आधार देण्यात आला आहे. नवीन पनवेल परिसरात 11 निराधार परप्रांतीय बिनाआधार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते दर्शन पोपट यांच्या निदर्शनास आले. ही बाब त्यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांना …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper