अमरावती : प्रतिनिधीज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आमटे यांची नात, डॉ. विकास आमटे यांची कन्या आणि महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी आत्महत्या केली आहे. त्यांनी मानसिक तणावातून आनंदवन येथील राहत्या घरी सोमवारी (दि. 30)सकाळी विषारी इंजेक्शन टोचून घेत जीवनयात्रा संपविली. वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता, …
Read More »Yearly Archives: 2020
महाविकास आघाडी सरकार नशिबी येणे महाराष्ट्राचे दुर्दैव
आमदार निरंजन डावखरे व आमदार महेश बालदी यांची टीका पनवेल : रामप्रहर वृत्तमहिलांवरील वाढते अत्याचार, अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकर्यांना अपुरी मदत, मराठा आरक्षणाचा झालेला खेळखंडोबा, वाढीव वीज बिल, कोरोना स्थिती हाताळण्यात आलेले अपयश पाहता महाविकास आघाडी सरकार नशिबी येणे हे महाराष्ट्राच्या जनतेचे मोठे दुर्दैव आहे, असे प्रतिपादन आमदार निरंजन डावखरे …
Read More »कोविशिल्ड लशीचा प्रयोग
प्रादुर्भाव कमी झालेल्या कोरोनाने देशात पुन्हा डोके वर काढले आहे. दिवाळीनंतर रुग्णवाढ अपेक्षितच होती. नियमांचे उल्लंघन केल्यावर दुसरे काय होणार. सध्या काही देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली असल्याने हिवाळ्यात आपल्याकडेही भीती व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर निर्बंध लागू होत आहेत, तर दुसरीकडे लशीसाठीचे संशोधनही जोमाने सुरू आहे. 2020 हे वर्ष …
Read More »मराठा समाजाचा 8 डिसेंबरला विधान भवनावर मोर्चा; राज्यस्तरीय बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
पुणे : प्रतिनिधी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आरक्षणासाठी 8 डिसेंबर रोजी विधान भवनावर धडक मोर्चा काढला जाणार आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या रविवारी (दि. 29) झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. मुंबईत हिवाळी अधिवेशन होत असून, त्या पार्श्वभूमीवर अनेक विषयांवर चर्चा झाली आहे. …
Read More »डॉ. सतीश वैरागी यांना दादासाहेब फाळके आयकॉन पुरस्कार
मुंबई : प्रतिनिधी कोकण विभाग महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभेचे अध्यक्ष डॉ. सतीश वैरागी यांना महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्यामार्फत दादासाहेब फाळके आयकॉन पुरस्कार दादासाहेब फाळके संस्थेचे संस्थापक अध्यक्ष किल्ल्याणजी यांच्या हस्ते मुंबई अंधेरी येथे देण्यात आला. महाराष्ट्रामध्ये उत्कृष्ट समाजसेवा करणारे तसेच कोविडमध्ये जिवाची पर्वा न करता रुग्णांसाठी सतत कार्यरत असणार्या व्यक्तींना हा …
Read More »मराठा आरक्षणाचा प्रश्न जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवला
उदयनराजेंचे टीकास्त्र सातारा : प्रतिनिधी आधीच्या पिढीतल्या लोकांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवला. कधीपर्यंत समाजाचा अंत पाहणार आहात. आरक्षणाचा प्रश्न सोडवावा; अन्यथा फार मोठा अनर्थ होईल आणि त्याला जबाबदार ही सगळी मंडळी असतील, असा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला आहे. खासदार उदयनराजे भोसले म्हणाले की, आता कुबट वास …
Read More »पाणजे ग्रामपंचायतीचे अभिनंदन
उरण : रामप्रहर वृत्त उरण तालुक्यातील पाणजे ग्रामपंचायतीला शासनाच्या आर आर (आबा पाटील) सुंदर गाव पुरस्कार योजनेच्या 2019/20 या वर्षा अंतर्गत तालुका स्तरावरून प्रथम पुरस्कार मिळाला आहे. त्यानिमित्त भाजपच्या पाणजे ग्रामपंचायतीच्या सरपंच करिष्मा भोईर, उपसरपंच नम्रता पाटील वा ग्रामपंचायत सदस्यांचे आमदार महेश बालदी, भाजप युवामोर्चाचे प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील आणि …
Read More »मुख्यमंत्र्यांनी धमकी देणे लोकशाहीला मारक
रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांची टीका मुंबई : प्रतिनिधी हात धुवुन मागे लागेल अशी जाहीर धमकी विरोधी पक्षांना देणे ही मुख्यमंत्र्यांची संविधानिक दृष्ट्या चूक आणि लोकशाहीला मारक भूमिका आहे, असे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. महाविकास आघाडी सरकारने वर्षभर केलेले …
Read More »विकासकामांचा दर्जावर विशेष लक्ष देणार -संतोष शेट्टी
पनवेल : वार्ताहर ज्येष्ठ नगरसेवक संतोष शेट्टी यांच्यावर स्थायी समिती सभापती पदाची जबाबदारी नुकतीच सोपवण्यात आलेली आहे. पदभार घेतल्यानंतर शेट्टी यांनी आपल्या कामाची छाप पाडण्यास सुरुवात केली आहे. मनपा क्षेत्रात यापुढे जी विकास कामे होतील ते दर्जेदार असायला हवेत. आपण स्वतः त्याची पाहणी करू अशा शब्दात स्थायी समिती सभापतींनी प्रशासनाला …
Read More »रायगडातील देवस्थानच्या जत्रा रद्द; जत्रोत्सवातील उलाढालीला कोरोनाची बाधा
अलिबाग : प्रतिनिधी दिवाळी संपली की कोकणातील जत्रोत्सव सुरू होतात. रायगड जिल्ह्यातील देवस्थानांच्या जत्रोत्सवाला आता प्रारंभ झाला असला तरी यंदा त्यावर कोरोनाचे सावट पहायला मिळत आहे. यामुळे अशा उत्सवातून दरवर्षी होणारी लाखो रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत गेला. सप्टेंबरपर्यंत टाळेबंदीत लोकांचे आर्थिक गणित कोलमडले.गणेशोत्सवापासून हळूहळू टाळेबंदीला …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper