मुंबई : प्रतिनिधीदेवेंद्र फडणवीस सरकारच्या काळातील वृक्ष लागवडीची चौकशी करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. त्यावर वृक्ष लागवड हे ईश्वरी काम आहे, असे सांगत माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चौकशीस तयार असल्याचे म्हटले आहे. फडणवीस सरकारच्या काळात वृक्ष लागवड मोहीम हाती घेण्यात आली होती. राज्यातील सरकार बदलल्यानंतर विद्यमान वनमंत्री …
Read More »Yearly Archives: 2020
पोलादपूर तालुक्यात ‘केमिकल लोचा’
पोलादपूर तालुक्यामध्ये पंचतारांकित औद्योगिक वसाहत होण्यासंदर्भात तत्कालीन उद्योग राज्यमंत्री प्रभाकर मोरे यांनी केलेले प्रयत्न सप्ततारांकित शेतकरी संघर्ष समितीने हाणून पाडले होते. यानंतर ही पंचतारांकित औद्योगिक वसाहत महाड औद्योगिक वसाहतीच्या तिसर्या टप्प्यामध्ये समाविष्ट करण्यात आली, मात्र अद्याप त्याचा विधीवत समारंभपूर्वक फलक लागूनही शुभारंभ काही झाला नाही. पोलादपूर तालुक्यातील 25 वर्षांपूर्वीच्या या …
Read More »रणांगणातील स्त्री-शक्ती
वास्तविक स्त्री आणि पुरुष असा भेदभाव लष्करात असता कामा नये असे बजावून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच संरक्षण दलांमधील सुधारणांना वाट करून दिली होती. त्याचीच परिणती सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामध्ये झालेली आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी ताबडतोब ट्वीट करून राहुल गांधी यांचे अज्ञान दूर केले हे बरेच झाले. स्त्रीला पोथ्या-पुराणांमध्ये देवत्वाचा …
Read More »पर्यावरण जनजागृतीसाठी सायकलिंग अभियान; सिस्केप व युथ हॉस्टेलचा उपक्रम; 25 विद्यार्थ्यांचा सहभाग
अलिबाग : प्रतिनिधी जिल्ह्यातील जैवविविधता संवर्धन आणि संशोधन तसेच पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी बुधवारी (दि. 19) शिवजयंतीचे औचित्य साधून अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळून सायकल अभियानाला सुरुवात झाली. महाडच्या हुतात्मा स्मारकात 21 फेब्रुवारीला या अभियानाची सांगता होणार आहे. युथ हॉस्टेल व सिस्केप संस्थेने समृध्द पर्यावरणासाठी तीन दिवस सायकल अभियानाचे आयोजन केले …
Read More »अवैध वृक्षतोड खपवून घेतली जाणार नाही; विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा इशारा
महाड : प्रतिनिधी विकास कामात कोणी अडथळा आणू नये. मात्र रायगड मार्ग रुंदीकरणाच्या कामात गरज नसणारी वृक्षतोड ही अवैध असून, वृक्षतोडीचा हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी येथे दिला. महाड – रायगड मार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरु असून, या कामात अनावश्यक तसेच …
Read More »खालापूर : भाजपचे उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत पुरी यांनी बुधवारी अश्वारूढ शिवपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सोबत राहुल जाधव, दिलीप देशमुख, प्रिन्सि कोहली, दिलीप निंबाळकर, सुनील नांदे, विठ्ठल शाहासणे, रवींद्र जैन या पदाधिकार्यांसह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
Read More »रायगडात छत्रपती शिवरायांचा जयजयकार; कर्जतमध्ये तरुणांची शिवदौड
कर्जत : बातमीदार तालुक्यातील नेवाळी-मोहिली भागात असलेल्या सोनगिरी किल्ल्यावरून शिवज्योत घेऊन तरुण बुधवारी (दि. 19) सकाळी कर्जत शहरातील शिवाजी महाराज स्मारक येथे पोहचले. ही शिवदौड कर्जत येथील शिवराज प्रतिष्ठानने आयोजित केली होती. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यातील सोनगिरी हा एक किल्ला होता. कर्जत तालुक्यातील नेवाळी-मोहिली गावाच्या मागे उभ्या असलेल्या सोनगिरी …
Read More »युईएस स्कूलमध्ये शिवजयंतीनिमित्त पालखी व मिरवणुक
उरण : वार्ताहर युईएस स्कूल, ज्युनिअर अॅण्ड सिनिअर कॉलेजमध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने विमला तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याजवळ विद्यार्थी व पालक पारंपारिक वेषभूषेत जमले होते. युईएस संस्थेच्या ट्रस्टी मेंबर्सनी शिवरायांच्या मूर्तीस पुष्पहार घातले, त्यानंतर पालखीतील शिवरायांच्या मूर्तीसही पुष्पहार घालून अभिवादन केले. यानंतर ढोलताशे …
Read More »बँक ऑफ महाराष्ट्रच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी
पनवेल : रामप्रहर वृत्त बँकिंग सोबतच सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या नवीन पनवेल शाखेने मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी केली. बँकेचे ग्राहक व डीएसए प्रदीपराव देशमुख यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. सर्व उपस्थितांनी दोन्ही महामानवास पुष्प …
Read More »नगरसेवक मनोहर म्हात्रेंच्या प्रयत्नांना यश
पालिका महासभेत 50 कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती व विद्यमान नगरसेवक मनोहर म्हात्रे यांनी महासभेत मांडलेल्या विविध विकासकामांना मंजुरी मिळाली असून लवकरच कामांना सुरुवात होणार आहे. पनवेल महानगरपालिकेची महासभा मंगळवारी (दि. 18) झाली. या वेळी नगरसेवक मनोहर म्हात्रे यांनी अंदाजित 50 …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper