नेरळ : बातमीदार माथेरानच्या पायथ्यांशी असलेल्या बेकरे गावातील खांबाया देवाचा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दिंडी सोहळ्यात लहान मुलांनी पारंपरिक वेशभूषा साकारली होती. हे सर्वांचे आकर्षण बनले होते. दिंडीत बालकांसह ज्येष्ठ नागरिक, तरूण आणि महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. बेकरे गावातील …
Read More »Yearly Archives: 2020
पनवेल : महाराष्ट्र राज्य पुरोगामी शिक्षक आघाडीच्या वतीने कामोठे येथील रयत शिक्षण संस्थेच्या लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका स्वप्नाली म्हात्रे यांना ‘कोकण रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेे. त्याबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सोमवारी स्वप्नाली म्हात्रे यांचे अभिनंदन केले. सोबत भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय.टी.देशमुख, रयतचे पीआरो कारंडे …
Read More »मत्स्यशेतीच्या नुकसानभरपाईसाठी पेणमधील शेतकर्यांचे बेमुदत उपोषण
पेण : प्रतिनिधी पुरामुळे पेण तालुक्यातील मत्स्य शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे होऊनदेखील बाधीत शेतकर्यांना अद्याप नुकसान भरपाई किंवा मदत मिळालेली नाही. त्यामुळे नुकसान भरपाई व अन्य मागण्यासांठी बाधीत शेतकर्यांनी सोमवार (दि. 13) पासून पेण प्रांत अधिकारी कार्यालयासमोर मूलभूत अधिकार संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली बेमूदत उपोषण सुरू केले …
Read More »मौजे-कल्हे येथे उभारण्यात आला बंधारा, पाणीसमस्या सोडविण्यासाठी पनवेल कृषी विभागाचा उपक्रम
पनवेल : रामप्रहर वृत्त डिसेंबरनंतर ओढ्याचे पात्र कोरडे पडते, परिणामी ग्रामस्थांना व जनावरांना वणवण पाण्यासाठी भंटकंती करावी लागत म्हणून मौजे-कल्हे येथील लाडूची वाडी येथे पनवेलच्या महाराष्ट्र शासन कृषी विभाग, तालुका कृषी विभाग, कृषी कर्मचारी व लोकसहमतातुन बंधारा उभारण्यात आला. या विभागामध्ये लाडूची वाडी, काजू वाडी अशा वाड्या वसल्या आहेत. बंधारा …
Read More »देवपाड्यात शिक्षकांची वानवा
ग्रामस्थ ठोकणार शाळेला टाळे; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील देवपाडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षकांची कमतरता असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तीन वर्षांपासून येथील शिक्षकांची बदली झाल्याने त्यांच्या जागेवर अद्याप शिक्षकच आले नाहीत. शाळा व्यवस्थापन समितीने पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडे अनेकवेळा मागणी करूनही …
Read More »तुटवली येथील गोशाळेचे भूमिपूजन
पोलादपूर : प्रतिनिधी आई शेवंतीबाई (वाडी) फाउंडेशनतर्फे पोलादपूर -महाबळेश्वर मार्गावरील वाडी तुटवली येथे नियोजित गोशाळेचा भूमिपूजन सोहळा नुकताच होमहवनाने करण्यात आला. गोशाळेचे संकल्पना असलेले डॉ. विनोदराव मोरे यांनी सपत्नीक होमहवनाचे विधी केले. मध्यप्रदेशातील कॅबिनेट दर्जाचे मंत्री महामंडलेश्वर स्वामी कम्प्युटरबाबा यांनी होमहवनाचे विधी पूर्ण केले. यानंतर उमरठ येथील महिला मंडळातर्फे हरिपाठ …
Read More »मुक्तांगणच्या दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय तपासणी शिबिर
महाड : प्रतिनिधी हिरवळ एज्युकेशन ट्रस्टच्या महाडमधील मुक्तांगणच्या दिव्यांग (मतिमंद) मुलांकरिता नुकतेच मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नवेनगर येथील हिरवळ संस्थेच्या प्रांगणामध्ये भरविण्यात आलेल्या या शिबिरामध्ये नामांकित वैद्यकीय तज्ज्ञांकडून शारीरिक तपासणी करण्यात आली. टेलेंटक्युब एज्युकेशन अँड ट्रेनिंग कन्सल्टसीचे फाऊंडर व कौसिलर डॉ. भाग्यवान मांजरेकर, फिजिओथेरॉपिस्ट डॉ. राजेश …
Read More »चोरीच्या गुन्ह्यातील दागिने मालकांकडे सुपूर्द
अलिबाग : प्रतिनिधी पोलीस रेझींग डे चे औचित्य साधून रायगड पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यातील सोन्या, चांदीचे दागिने संबंधित मालकांकडे सुपूर्द केले. एकूण 850.37 ग्राम वजनाचे हे दागिने असून, त्यांची किंमत 24 लाख 64 हजार 257 रूपये इतकी आहे. आपले मौल्यवान दागिने हातात पडताच मालकांच्या चेहर्यांवरील आनंद लपून राहिला नव्हता. पोलीस रेझिंग-डे …
Read More »अपघात टाळण्यासाठी चालकांनी सतर्क रहावे
सहाय्यक पोलीस निरीक्षक रंगराव पवार यांचे आवाहन मुरूड : प्रतिनिधी एसटीचा प्रवास सुरक्षित असल्याची भावना प्रवाशांमध्ये कायम रहावी, यासाठी चालकांनी वेगमर्यादा पाळून सुरक्षित वाहने चालवावीत व रस्ते अपघाताचे प्रमाण टाळण्यासाठी चालकांनी सर्तक रहावे, असे आवाहन मुरुड पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक रंगराव पवार यांनी केले. राज्य परिवहन महामंडळातर्फे 11 ते 26 …
Read More »शिवप्रेमी, दासभक्त, पर्यटकांसाठी शुभवर्तमान; शिव-समर्थ स्मारक फेब्रुवारीत सर्वांसाठी खुले!
उरण : प्रतिनिधी 30 कोटी खर्च करुन जेएनपीटीकडून उरण येथे उभारण्यात येत असलेले 20 मीटर उंचीच्या शिवस्मारकाचे काम जानेवारी महिन्याअखेरीस पुर्णत्वास जाणार आहे. विविध सुविधा असलेले भव्य स्मारक येत्या फेब्रुवारीत सर्वांसाठी खुले होणाऱे शिवस्मारक देशभरातील शिवप्रेमी, दासभक्त, पर्यटक आणि नागरिकांसाठी शुभवर्तमान ठरणार आहे. उरणचे आमदार महेश बालदी यांच्या पुढाकाराने या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper