Breaking News

Yearly Archives: 2020

रात्री उशिरापर्यंत सुरू असणार्या आस्थापनांवर होणार कारवाई; पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांची माहिती

पनवेल : वार्ताहर शासनाने निर्देश आखून दिले असताना सुद्धा अनेक ठिकाणी रात्री उशिरापर्यंत हॉटेल, ढाबे, पानटपर्‍या व इतर आस्थापने सुरू असतात. यांच्याविरोधात आता कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी दिली. नववर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात अनेेकजण तयारी करीत आहेत. काहीजण यासाठी हॉटेल, ढाबे, फार्म …

Read More »

जंजिरा किल्ला प्रवेशबंदीमुळे व्यावसायिकांचे लाखोंचे नुकसान

पर्यटकांची संख्या रोडावली मुरूड ः प्रतिनिधीकोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रायगड जिल्हाधिकार्‍यांनी एका आदेशान्वये ऐतिहासिक जंजिरा किल्ला 2 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयाचा पर्यटन व्यवसायावर विपरीत परिणाम झाला आहे. विविध ठिकाणांहून अनेक पर्यटक जंजिरा किल्ला पाहण्यासाठी येतात. यामध्ये परदेशी नागरिकांचाही  समावेश असतो, परंतु अचानक किल्ला पर्यटकांसाठी बंद झाल्याने येथील …

Read More »

केगाव ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा भाजपत प्रवेश

उरण ः वार्ताहरउरण तालुक्यातील महत्त्वाच्या अशा केगाव ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील काँग्रेस, शेकाप आणि शिवसेनेचे पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सोमवारी (दि. 28) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.15 जानेवारी रोजी होऊ घातलेल्या केगाव …

Read More »

शिळफाटा टोलमधून स्थानिकांना सूट

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या दणक्याने प्रशासन वठणीवर पनवेल ः प्रतिनिधीपनवेल तालुक्यातील किरवली येथे असलेल्या शिळफाटा टोल नाक्यातून स्थानिकांनी मागणी करूनसुद्धा टोलमध्ये सूट न दिल्याने भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सोमवारी (दि. 28) धडक मोर्चाचा दणका देत आयआरबी टोल नाका प्रशासनाला वठणीवर आणले. या दणक्यामुळे टोल नाका प्रशासनाने …

Read More »

उरण नगर परिषदेत दिनदर्शिकेचे वाटप

उरण : वार्ताहर अखिल बुरुड समाज प्रतिष्ठानच्या वतीने दिनदर्शिका 2021च्या वार्षिक दिनदर्शिकेचे उरण नगर परिषद नगरसेवक व कर्मचार्‍यांना  शनिवारी (दि. 26) वाटप करण्यात आले. तसेच नगर परिषदेकडून बुरुड समाजासाठी पाच टक्के निधीतून साहित्य मिळण्यासंदर्भात नगराध्यक्ष सायली म्हात्रे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी नगराध्यक्ष म्हात्रे यांनी दिलेल्या निवेदनाची दखल घेऊन …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते ‘आदिवासी दिनदर्शिका’चे प्रकाशन

पनवेल : रामप्रहर वृत्त आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र राज्यच्या 2021च्या आदिवासी दिनदर्शिकाचे प्रकाशन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि. 27) करण्यात आले. आदिवासी समाजातील गोरगरीब कुटूंबांना अल्पदरात दिनदर्शिका उपलब्ध करून देण्यासाठी आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र राज्याच्या वतीने दरवर्षी आदिवासी दिनदर्शिका प्रकाशित करण्यात येते. या दिनदर्शिकेमध्ये समाजातील क्रांतिकारक, …

Read More »

मंडी आणि किमान आधारभूत किंमत नष्ट होणार नाही -राजनाथ सिंह

नवी दिल्ली : वृत्तसंस्था केंद्रातील मोदी सरकारने आणलेल्या नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकर्‍यांचे आंदोलन सुरू असतानाच, किमान आधारभूत किंमत (एमएसपी) नष्ट करण्याचा या सरकारचा हेतू कधीही नव्हता, ना आहे, ना कधी असेल. मंडी व्यवस्थाही कायमच राहणार आहे. कुणीही ‘मायचा लाल’ शेतकर्‍यांपासून त्यांची जमीन हिसकावू शकत नाही, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी …

Read More »

नव्या वर्षासाठी नवी दिशा

कोरोना महामारीच्या संकटामुळे अनंत अडचणींनी व परिणामी नैराश्याने झाकोळून गेलेले 2020 साल चार दिवसांतच मागे पडणार आहे. वर्षअखेरीस देशातील कोरोना संदर्भातील परिस्थिती बर्‍यापैकी नियंत्रणात आल्यामुळे आपण सारेच येणार्‍या 2021 सालाकडे सकारात्मकतेने आणि आशेने पाहात आहोत. सरणार्‍या वर्षातील आपल्या अखेरच्या मन की बात या कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अनेक प्रेरणादायी …

Read More »

आता ढोंगबाजी चालणार नाही

जे. पी. नड्डांचा राहुल गांधींवर निशाणा नवी दिल्ली ः वृत्तसंस्था शेतकरी आंदोलनावरून राजकीय पक्षांत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनाकारण घेरण्याचा प्रयत्न केला. परिणामी भाजपकडूनही राहुल गांधींवर निशाणा साधण्यात आला. भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी लोकसभेतील राहुल गांधींच्या …

Read More »

मोरबे ग्रामपंचायत हद्दीतील शेकापच्या असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपत प्रवेश

पनवेल ः प्रतिनिधीशेतकरी कामगार पक्षातील ढोंगी पुढार्‍यांच्या मतलबी कारभाराला कंटाळून पनवेल तालुक्यातील मोरबे ग्रामपंचायत हद्दीतील असंख्य कार्यकर्त्यांनी रविवारी (दि. 27) भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत पनवेल येथील मध्यवर्ती कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला.शेकाप नेत्यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून शेकापचे चिंध्रण पंचायत समिती युवाध्यक्ष …

Read More »