240 खेळाडूंची लिलाव प्रक्रिया पूर्ण अलिबाग ः प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील झिराड येथील साई क्रीडा मंडळ पुरस्कृत अलिबाग प्रीमियर लीग (एपीएल) क्रिकेट स्पर्धा 2 ते 4 डिसेंबर या कालावधीत होणार आहे. या स्पर्धेसाठी 240 खेळाडूंची लिलाव प्रक्रिया नुकतीच अलिबाग-रेवस मार्गावरील खडताळ पुलाजवळील होरीझोन बँक्वेट हॉलमध्ये पार पडली. एपीएलच्या लिलाव प्रक्रियेसाठी तालुक्यातून …
Read More »Monthly Archives: October 2021
पोलीस असल्याचे सांगत फसविणार्याला खालापूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या
खालापूर : प्रतिनिधी खालापुरातील ज्येष्ठ नागरिकाला पोलीस अधिकारी असल्याचे सांगत दम देत पाऊण लाखाचा ऐवज लुटणार्या अबालू जाफर इराणी (वय 47 वर्ष, रा. विष्णू कृपानगर शिवाजीनगर, पुणे) तोतयाला खालापूर पोलीस पथकाने नगर जिल्ह्यातून अटक केली आहे. इराणीने राज्यात अनेक ठिकाणी तोतया पोलीस अधिकारी बनून गुन्हे केल्याचे तपासात समोर येत आहे. …
Read More »मिनिट्रेन घडविणार माथेरानमधील पर्यावरण आणि संस्कृतीचे दर्शन
कर्जत : प्रतिनिधी युनोस्कोमुळे माथेरानचे पर्यावरण जगाला कळणार असून मिनिट्रेनच्या माध्यमातून ते दाखवणार असल्याचे विभागीय व्यवस्थापक शलभ गोयल यांनी सांगितले. नेरळ-माथेरान-नेरळ मिनिट्रेनला युनोस्कोमध्ये स्थान मिळाल्यानंतर मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक शलभ गोयल हे माथेरान रेल्वे स्टेशन सुशोभित करणे, पर्यटकांना रेल्वेच्या सोयी-सुविधांची पाहणी, तसेच माथेरानमधील पुढील कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी माथेरान भेटीला आले …
Read More »पोलादपूर विद्यामंदिरच्या विद्यार्थिनींना सक्षमीकरणाबाबत मार्गदर्शन
पोलादपूर : प्रतिनिधी समाजातील नातेवाईक, मित्रपरिवार, तसेच आप्तशेजारी यांच्यापासून महिलावर्गाला विविध प्रकारच्या अत्याचारांना सामोरे जावे लागू नये, यासाठी वेळीच सावधपणे प्रतिकार करण्याची समयसूचकता दाखविण्याची आवश्यकता असल्याचे मत महाड उपविभागीय पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी व्यक्त केले. पोलादपूर शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या पोलादपूर विद्यामंदिर येथे विद्यार्थिनींसोबत डीवायएसपी नीलेश तांबे यांनी संवाद …
Read More »मोरे महिला महाविद्यालयात ‘मिशन युवा स्वास्थ्य’ अंतर्गत लसीकरण अभियान
रोहे : प्रतिनिधी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे आरोग्यविषयक, तसेच शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी, महाविद्यालये ऑफलाईन पद्धतीत पूर्ण क्षमतेने सुरू होणे आवश्यक असल्याचे लक्षात घेऊन दि. 25 ऑक्टोबर ते 02 नोव्हेंबर 2021 या कालावधीत मिशन युवा स्वास्थ्य अंतर्गत लसीकरण अभियान राबविण्यात येत आहे. याच उपक्रमांतर्गत एम. बी. मोरे फाऊंडेशनचे कला, वाणिज्य व विज्ञान महिला …
Read More »दोन डोस घेऊनही रेल्वेचे तिकीट मिळेना; प्रवासी नाराज
कर्जत : बातमीदार उपनगरीय लोकल प्रवास हा कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी बंद करण्यात आला होता, पण नुकत्याच काढलेल्या परिपत्रकानुसार ज्यांनी दोन डोस घेतले आहेत त्यांना सिजनल तिकीट देण्यात येत असून त्या प्रवाशांना कोणतेही सिंगल अथवा रिटर्न तिकीट मिळणार नसल्याने प्रवासी वर्गात कमालीची नाराजी आहे. सर्व रेल्वेस्थानकांवर त्याप्रमाणे बोर्ड लावण्यात …
Read More »मुरूड आगारचा संप मिटला; वाहतूक सुरू
संपात सहभागी कर्मचार्यांवर कार्यवाही नाही; वाहतूक अधिकारी मनीषा पाटील यांचे आश्वासन मुरूड : प्रतिनिधी मुरूड आगाराचा आज तिसर्या दिवशी संप संपुष्टात आलेला आहे. रायगड विभाग नियंत्रक कार्यालयाकडून मुरूड आगारातील एसटी कर्मचार्यांसोबत चर्चा करण्यासाठी विभागीय वाहतूक अधिकारी मनीषा पाटील यांनी आज प्रत्यक्ष कर्मचार्यांची भेट घेऊन संपात सहभागी झालेल्या कर्मचार्यांवर कोणतीही कार्यवाही …
Read More »ते आले, फिरले आणि ठोस न सांगता निघून गेले!
एखाद्या गावात किंवा शहरात एखादा मंत्री येतो त्यावेळी त्या गावातील किंवा शहरातील किंवा परिसरातील विकासाचे प्रश्न मार्गी लागतात अशी सर्वसामान्य माणसांची अपेक्षा असते. राज्याचे एक बडे आणि वजनदार मंत्री आदित्य ठाकरे हे माथेरान या जगप्रसिद्ध थंड हवेच्या ठिकाणी सरकारी कार्यक्रमासाठी आले होते. त्यांच्या या दौर्याने माथेरानच्या विकासाला आणखी गती येईल …
Read More »राज्यात काळी दिवाळी
तमसो मा ज्योतिर्गमय अर्थात अंधाराकडून प्रकाशाकडे असा तेजोमय संदेश देणारा दिवाळीचा सण तोंडावर आला आहे. सर्वत्र त्यासाठी जोरदार तयारी केली जात असताना महाराष्ट्रात मात्र शेतकरी, एसटी कर्मचार्यांसह विविध घटकांच्या समस्या आजही जैसे थे आहेत. त्यामुळे त्यांनी दीपावली कशी साजरी करावी, हा प्रश्नच आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यापासून राज्याची …
Read More »नेरे येथील रस्ता काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन
पनवेल ः रामप्रहर वृत्तमाजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल विधानसभा मतदारसंघात विकासाची अनेक कामे सुरू आहेत. त्या अंतर्गत नेरे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्थानिक विकास निधीमधून रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. या कामाचे भूमिपूजन भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते …
Read More »