चौल-रेवदंड्यातील सुपारी व्यापारी, बागायतदार हवालदिल रेवदंडा : प्रतिनिधी अवकाळी आलेल्या पावसामुळे चौल-रेवदंड्यातील सुपारी व्यापारी व बागायतदाराचे अतोनात नुकसान झाले. अवकाळी पावसाने बेसावध असलेले बागायतदारांच्या सुपारीस पाणी लागल्याने त्यांना मोठी झळ बसली आहे. झाडावरून उतरवण्यात आलेल्या सुपार्यांना पाणी लागल्याने सुपारीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे व्यापार्यांना अगदी कमी किमतीत सुपारी द्यावी लागेल, …
Read More »Monthly Archives: November 2021
जयपूरच्या कला महोत्सवात कर्जतच्या हर्षदा कडूची चित्रे
कर्जत ़: प्रतिनिधी प्रतिभा एज्युकेशनल डेव्हलपमेंट रिसर्च सोसायटीच्या वतीने जयपूरमध्ये सध्या कला महोत्सव सुरू आहे. या कला महोत्सवात कर्जत तालुक्यातील पोसरी गावातील उदयोन्मुख चित्रकार हर्षदा संजय कडू हिच्या चित्रांचा समावेश आहे. कर्जतमधील अनेक चित्रकारांची चित्रे देशविदेशात गेली आहेत. मात्र महिला चित्रकाराची चित्रे अन्य राज्यात जाण्याची ही पहिलीच घटना आहे. कर्जत …
Read More »खालापूर पोलीस स्टेशन, चित्रकला, निबंध स्पर्धेमध्ये यश संपादन केलेल्या मुलांना सन्मान देऊन गौरव
खोपोली : प्रतिनिधी पोलीस स्मृतिदिनानिमित्त खालापूर पोलीस ठाण्याने घेतलेल्या निबंध स्पर्धेत अन्विता राम लबडे हिने तर चित्रकला स्पर्धेत हर्ष संजय जाधव (आंबिवली) याने प्रथम क्रमांक पटकावला. खालापूर पोलीस ठाण्याने पोलीस स्मृतिदिनानिमित्त तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी 27 ऑक्टोबर रोजी कोरोना योद्धा पोलीस या विषयावर निबंध व चित्रकला स्पर्धा घेतली होती. शहरातील स्वामी विवेकानंद …
Read More »पोलादपुरातील धैर्य सामाजिक संस्थेला जिल्हास्तरीय सन्मान
पोलादपूर : प्रतिनिधी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि जनजातीगौरव सप्ताह साजरा करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीचे औचित्य साधून आदिवासी समाजबांधवांच्या कल्याणासाठी जिल्ह्यात कार्यरत असणार्या स्वयंसेवी संस्थांचा रायगड जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे नुकताच सत्कार करण्यात आला. या वेळी पोलादपूर तालुक्यात विशेष कार्य करणार्या धैर्य सामाजिक संस्थेला गौरविण्यात …
Read More »कर्जतमध्ये झाडांना ठोकले लोखंडी खिळे
पर्यावरण मित्रांकडून नाराजी कर्जत : बातमीदार तालुक्यात मोठ्या प्रमाणात फार्महाऊसेसचे जाळे उभे राहत आहे. या फार्महाऊसेस बांधणार्या कंपन्यांकडून निसर्ग वाचविण्याचे सर्व नियम धाब्यावर बसवले जात आहेत. आपल्या फार्महाऊसकडे जाणारे रस्ते दर्शक फलक लावण्यासाठी झाडांचा वापर केला जात आहे. हे फलक लावण्यासाठी झाडांना मोठ्या प्रमाणात लोखंडी खिळे ठोकण्यात येत आहेत. या …
Read More »शामराव पेजे कोकण इतर मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळाच्या विविध योजना
मागासवर्गीय समाजातील दुर्बल घटकांच्या सर्वांगीण कल्याणासाठी शासनाने शामराव पेजे कोकण इतर मागासवर्गीय आर्थिक विकास या महामंडळाची स्थापना केली आहे. समाजातील इतर मागासवर्गीयांच्या आर्थिक उन्नतीसाठी या महामंडळामार्फत स्वयंरोजगाराच्या विविध कर्ज योजना राबविण्यात येतात. कोणत्या आहेत त्या योजना जाणून घेऊ या लेखाद्वारे! छोटे व्यवसायिक व स्वयंरोजगाराकरिता रु. 1 लाखाची थेट कर्ज योजना …
Read More »टोमॅटोच्या दरात वाढ; कोथिंबीर, मेथी स्वस्त
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलच्या बाजरपेठेत इतर भाजीपाल्याच्या तुलनेत लालेलाल टोमॅटोचे दर चांगलेच वाढले आहेत. मागील काही दिवसांपूर्वी किरकोळ बाजारात वीस ते तीस रुपये प्रतिकिलो दराने उपलब्ध असलेल्या टोमॅटोने तब्बल 80 ते 90 रुपये प्रतिकिलोपर्यंत उडी मारली आहे. थोड्याच दिवसात थंडीचे दिवस सुरू होणार आहेत. त्यामुळे भाजीपाला मुबलक प्रमाणात उपलब्ध …
Read More »गव्हाण विद्यालयात अरुणशेठ भगत यांचे अभीष्टचिंतन
पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी व समन्वय समितीचे सदस्य, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष आणि रयतच्या गव्हाण येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत जुनिअर कॉलेजच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन, भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यालयामध्ये अभीष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला. …
Read More »राज्यस्तरीय सिनियर तायक्वांडो स्पर्धेसाठी रायगडचा संघ जाहीर
पनवेल : रामप्रहर वृत्त ग्रीन पेरडाइस रिसोर्ट अर्नाळा विरार-वसई, पालघर येथे 3 ते 5 डिसेंबर रोजी होणार्या राज्यस्तरीय सिनियर तायक्वांडो स्पर्धेसाठी रायगडचा संघ संघटनेचे अध्यक्ष सदानंद निंबरे व सचिव सुभाष पाटील यांनी जाहीर केला आहे. मुलांच्या संघात (क्युरोगी प्रकार) शाकीब शेख (54 कीलो खालील), रवी चव्हाण (58 किलो खालील), शुभम …
Read More »नवी मुंबईत काँग्रेसची स्वबळाची भाषा
आगामी महापालिका निवडणुकीत आघाडीत बिघाडी? नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई महापालिका निवडणुकीची तयारी निवडणूक आयोगाने सुरू केली आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष महापालिका निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करताना दिसून येत आहेत. अशाच काँग्रेसने स्वबळाची भाषा केल्याने आगामी महापालिका निवडणुकीत आघाडीत बिघाडी होणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. मुंबई पालिका निवडणुकीसाठी …
Read More »