Breaking News

Monthly Archives: November 2021

एसटी कर्मचार्‍यांच्या मागणीला भारतीय मजदूर संघांचा पाठिंबा

उरण : वार्ताहर एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करा, या मागणीला भारतीय मजदूर संघ रायगड जिल्हा या संघटनेने पाठिंबा दिला असून संघटनेतर्फे त्याबाबतचे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील कर्मचार्‍यांनी 27 ऑक्टोबरपासून आपल्या विविध मागण्यांबाबत आंदोलन सुरु केलेले आहे. या आंदोलनात वेतन आयोग, महागाई भत्ता …

Read More »

झोपडपट्टीवासीयांना न्याय मिळवून देण्यासाठी भाजप प्रयत्नशील

नगरसेवक प्रकाश बिनेदार यांचे प्रतिपादन नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त झोपडपट्टीवासीयांना न्याय मिळवून देण्यासाठी भाजप प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन पनवेल महापालिकेचे नगरसेक प्रकाश बिनेदार यांनी केले. ते झोपडपट्टीवासीयांच्या नवनाथ नगर येथील शनिवारी (दि. 13) झालेल्या जाहीर सभेत संबोधित करीत होते. या वेळी नगरसेविका सुशीला घरत उपस्थित होत्या. नवीन पनवेल भीमनगर झोपडपट्टी …

Read More »

अब हिंदू मार नहीं खाएगा!

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया पुणे : प्रतिनिधी त्रिपुरामध्ये घटना घडली की नाही हा प्रश्न आहे, पण त्यासाठी अमरावती, नांदेड, मालेगाव मध्ये अशांतता पसरवणे हे कितपत योग्य आहे. त्यामुळे अमरावतीमध्ये जे घडले ती, हिंदुंची उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती. अब हिंदू मार नहीं खाएगा, अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी …

Read More »

राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत रूपेश पावशेला सुवर्णपदक

पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेलमधील पैलवान रूपेश पावशे याने उत्तर प्रदेशातील आगरा येथे झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले आहे. याबद्दल त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.स्पोर्ट्स अ‍ॅण्ड फिजिकल फिटनेस बोर्डच्या वतीने आगरा येथे आयोजित राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी 85 किलो वजनी गटात रूपेश पावशे याची महाराष्ट्रातून निवड झाली होती. आपली निवड सार्थ …

Read More »

नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या जनसेवा कार्यालयाचे उद्घाटन

पनवेल ः भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या जनसेवा कार्यालयाचे उद्घाटन रविवारी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी रायगडचे माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार रवींद्र चव्हाण, भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर आदी …

Read More »

एसजीटी इंटरनॅशनल स्कूलचे केंद्रीय राज्यमंत्री नारायणस्वामी यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल ः प्रतिनिधीशिक्षण हेच जीवन आहे. शिक्षणामुळे केवळ ज्ञानच मिळते असे नव्हे; तर जगण्याचे मार्गही उलगडतात, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री ए. नारायणस्वामी यांनी रविवारी (दि. 14) कामोठे येथे केले. कामोठे येथील नौपाडा, तसेच चिंचपाडा येथे एसजीटी इंटरनॅशनल स्कूल सुरू झाले आहे. या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्कूलचे उद्घाटन …

Read More »

एसटी कामगारांच्या आत्महत्यांना रक्तपिपासू आघाडी सरकारच जबाबदार

भाजप नेते आशिष शेलार यांचा हल्लाबोल मुंबई ः प्रतिनिधीराज्यात गेल्या सहा महिन्यांत जवळपास 40 एसटी कामगारांनी आत्महत्या केल्या आहेत. या आत्महत्यांना राज्यातील रक्तपिपासू आघाडी सरकारच जबाबदार आहे, असा आरोप भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. त्यांनी रविवारी (दि. 14) आंदोलक एसटी कामगारांची आझाद मैदानात जाऊन भेट घेतली. त्या …

Read More »

कामोठ्यातील मॅरेथॉनला उदंड प्रतिसाद

पनवेल ः रामप्रहर वृत्तछाबा फाऊंडेशनच्या वतीने कामोठे येथे 5 आणि 10 किलोमीटर मॅरेथानचे आयोजन रविवारी (दि. 14) करण्यात आले होते. ही स्पर्धा ‘रन फॉर चाईल्ड एज्युकेशन’ अर्थात बालशिक्षणसाठी जगजागृती करण्याच्या दृष्टिकोनातून घेण्यात आली. रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूलच्या मैदानात झालेल्या या स्पर्धेस स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष …

Read More »

खोपोली येथे मोफत नेत्रचिकित्सा शिबिर

खोपोली : प्रतिनिधी लायन्स क्लब ऑफ खोपोली ऑल फोर आईज नेत्रालय व नवतरुण मित्र मंडळ चिंचवली शेकीन यांच्या संयुक्त विद्यमाने चिंचवली शेकीन व परिसरातील नागरिकांसाठी मोफत डोळे तपासणी व अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन रविवारी (दि. 14) स्वातंत्र्यवीर सावरकर प्राथमिक शाळा क्रमांक 9 येथे करण्यात आले होते. या शिबिरात 81 …

Read More »

माथेरानमध्ये अनधिकृतपणे टेंटचा होतोय वापर

पर्यावरण खात्याचे दुर्लक्ष माथेरान : रामप्रहर वृत्त माथेरान हे एक पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील पर्यटन क्षेत्र आहे. येथील वनसंपदा व पर्यावरण राखण्यासाठी वनविभाग, हरित लवाद, पर्यावरण सनियंत्रण समितीसारख्या समित्या कार्यरत आहेत. त्यामुळेच माथेरानमधील जंगलांमध्ये हल्ली आढळून येणारे टेंट (तंबू) हा येथील चर्चेचा विषय ठरत आहे. हे असेच सुरू राहिले तर त्याचा येथील …

Read More »