मुंबई : प्रतिनिधी राज्यभर सुरू असलेले एसटी कर्मचार्यांचे आंदोलन दडपण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. यवतमाळ, इगतपुरीसह इतर ठिकाणांहून चार बस मुंबईतील आंदोलनात सहभागी होण्यासाठी येत होत्या, मात्र या कर्मचार्यांना डांबून ठेवले आहे. त्यामुळे शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळक लागेल. याची जबाबदारी सर्वस्वी सरकारवर राहील, असा इशारा रविवारी (दि. …
Read More »Monthly Archives: November 2021
अरुणशेठ भगत यांच्या वाढदिवसानिमित्त कुस्ती स्पर्धा
पनवेल ः रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या वाढदिवसानिमित्त तालुका कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने कुस्तीच्या खुल्या दंगली (स्पर्धा) आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा सोमवारी (दि. 22) दुपारी 1.30 वाजता बेलवली-वारदोली येथील माऊली मैदानात होणार आहे. स्पर्धेचे आयोजक भाजप तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील आणि बेलवली अध्यक्ष सतीश …
Read More »फिटनेससाठी डॉक्टरांचा पुढाकार ; क्रीडा स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद
अलिबाग ः प्रतिनिधीअलिबाग-मुरूडमधील डॉक्टरांनी डॉक्टर व त्यांच्या कुटुंबीयांसाठी अलिबागजवळील आरसीएफ वसाहतीमधील क्रीडा संकुलात क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. वैद्यकीय उपचाराबरोबरच शरीर फिट ठेवण्यासाठी वैयक्तिक व सांघिक खेळ महत्त्वाचे असल्याचा संदेश यातून देण्यात आला. या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.अलिबाग व मुरूड मेडिकल असोसिएशनच्या वतीने घेण्यात आलेल्या या क्रीडा स्पर्धेत क्रिकेट, …
Read More »पनवेलच्या यश वनवेरूची संतोष ट्रॉफी स्पर्धेसाठी निवड
पनवेल ः वार्ताहरफुटबॉलमध्ये महत्त्वाची असलेल्या संतोष ट्रॉफी स्पर्धेसाठी पनवेलमधील यश वनवेरू या युवा खेळाडूची महाराष्ट्र संघात निवडझाली आहे.यश वनवेरू हा रायगडमधून अनेक वर्षांनंतर निवडलेला पहिला खेळाडू आहे. त्याच्याबरोबरच सिद्धार्थ कोलाको, मध्यभागी, अलझार दिल्लीवाला, बचावपटू, अद्वैत शिंदे, मिड फिल्डर (सर्व रा. नवी मुंबई) यांचीसुद्धा संतोष ट्रॉफी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. हे …
Read More »‘मएसो’ ज्ञानमंदिरात दीपोत्सवाचा उत्साह
कळंबोली : प्रतिनिधी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या ज्ञानमंदिर कळंबोली विद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त व संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त दीपोत्सवासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे संस्थापक वामन प्रभाकर भावे, आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके व लक्ष्मण नरहरी इंदापूरकर यांनी 1860 साली राष्ट्रीय शिक्षण देण्याच्या उद्देशाने संस्थेची स्थापना केली. या वर्षी शाळा …
Read More »शिवणकाम प्रमाणपत्राचे वितरण
मोहोपाडा : प्रतिनिधी पेहचान प्रोजेक्ट इदेमित्सु ल्युब प्रा. लि. व येरळा प्रोजेक्ट्स सोसायटी, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील अतिरिक्त एमआयडीसीतील जांभिवली येथे टेलरिंग प्रशिक्षण देण्यात आले होते. या शिवणकाम प्रमाणपत्राचे वितरण सरपंच रिया कोंडीलकर यांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमाबाबत देवदास झेंडे यांनी टेलरिंग या व्यवसायातून महिलांनी आपल्या …
Read More »कामोठे 11 मधील समस्या मार्गी; नगरसेविका हेमलता गोवारी यांचा पाठपुरावा
कामोठे : रामप्रहर वृत्त कामोठे से. 11 मधील सेक्टर 5 व 9 या भागातील विविध नागरी समस्या सोडविण्यात आल्या आहेत. या कामी नगरसेविका हेमलता गोवारी व सामाजिक कार्यकर्ते रवी गोवारी यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता. त्यानिमित्त येथील नागरिकांनी गोवारी दाम्पत्याचे जाहीर आभार मानले आहेत. कामोठे शहरातील अतिशय दुर्लक्षित असा भाग …
Read More »भाजप भटके विमुक्त सेलची बैठक; आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती
पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप कोकण प्रदेश विभागीय भटके विमुक्त सेलची रविवारी (दि. 21) भाजप मध्यवर्ती कार्यालयात झाली. या बैठकीला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट दिली. या वेळी त्यांचे स्वागत करण्यात आली. बैठकीमध्ये कमिटीच्या रचनेसंदर्भात चर्चा करण्यात आली असून बुथ आघाडीतील सदस्यांना मार्गदर्शन करण्यात आले. प्रदेश …
Read More »लसीकरणासाठी लकी ड्रॉची नामी शक्कल
मुरूड : प्रतिनिधी मुरूड नगर परिषद हद्दीतील कोविड लसीकरणाचे काम 85 टक्के पूर्ण झाले आहे. शहरातील 18 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण 100 टक्के पूर्ण व्हावे या उद्देशाने शहरात राहणार्या नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी दि. 18 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबरपर्यंत पहिला व दुसरा डोस घेणार्या व्यक्तींचे लकी ड्रा काढण्यात येणार आहेत. यामध्ये 20 …
Read More »धुळीमुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात
खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील चिंचवली शेनगाव ते मानकीवली रस्त्यावर धुळीचे प्रचंड प्रमाणात धुळीचे साम्राज्य असून, या रस्त्यावरून प्रवास करणारे वाहनचालक, तसेच परिसरातील ग्रामस्थांचे आरोग्य धुळीमुळे धोक्यात आले आहे. नगरपालिका हद्दीतील काही भाग व पुढे जिल्हा परिषदेच्या तालुक्यातील हा रस्ता येथून जाणार्या दगड खाणीच्या वाहनांमुळे धोकादायक झाला आहे. ओव्हरलोड वाहतुकीमुळे …
Read More »