Breaking News

Monthly Archives: November 2021

नवी मुंबई, पनवेलमध्ये कोरोना आटोक्यात

नवी मुंबई, पनवेल : रामप्रहर वृत्त नवी मुंबई, पनवेलमध्ये कोरोनाची दुसरी लाट शिखरावर असताना रुग्णालयांत खाटाही उपलब्ध होत नव्हत्या. नवी मुंबईत हजारच्या आसपास दररोज रुग्ण आढळत होते. अशीच भीषण परिस्थिती पनवेलमध्येही होती, परंतु आता या आजाराचा विळखा सैल झाला आहे. दररोज 25 पेक्षा कमी नवीन रुग्णांची भर पडत आहे. नागरिकांसाठी …

Read More »

मुरूडमधील शिबिरात 170 जणांचे रक्तदान

मुरूड : प्रतिनिधी अलिबाग मुरूड मेडिकल असोसिएशन, जंजिरा मेडिकल असोसिएशन व जय श्रीराम नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मुरूडमधील कल्याणी हॉस्पिटलमध्ये घेण्यात आलेल्या शिबिरात 170 जणांनी रक्तदान केले. अलिबाग येथील जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या रक्तपेढीच्या सौजन्याने घेण्यात आलेल्या या रक्तदान शिबिराचे उद्घाटन अलिबाग मुरूड मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मयूर कल्याणी, …

Read More »

ड्रोनद्वारे गावठाण सर्व्हेकरिता सहकार्य करावे

निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे यांचे प्रतिपादन अलिबाग : जिमाका गावठाण भूमापन प्रकल्प योजनेत भारतीय सर्व्हेक्षण विभाग (सर्व्हे ऑफ इंडिया) मार्फत जिल्ह्यात स्वामित्व योजनेंतर्गत ड्रोनद्वारे गावठाणातील मिळकतीचे सर्व्हे करण्यात येणार असून नागरिकांनी ड्रोनद्वारे सर्व्हेसाठी येणार्‍या अधिकारी, कर्मचार्‍यांना सहकार्य करावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे यांनी केले आहे. रायगडचे …

Read More »

नवी मुंबई महापालिकेची बेलापूर-कर्जत बस सेवा

कर्जत : बातमीदार नोकरी, शिक्षण, उद्योग, व्यवसाय तसेच दैनंदिन कामासाठी कर्जत तालुक्यातील प्रवासी मोठ्या संख्येने नवी मुंबईत जातात, मात्र एसटी कर्मचार्‍यांच्या संपामुळे त्यांची गैरसोय व हाल होत होते. ते लक्षात घेऊन नवी मुंबई महानगरपालिका परिवहन सेवेने बुधवार (दि. 17) पासून बेलापूर-कर्जत अशी बस सेवा सुरु केली आहे. आपल्या मागण्यांसाठी एसटी …

Read More »

दिवेआगर मंदिरात मंगळवारी गणेशाच्या सुवर्ण मुखवट्याची प्रतिष्ठापना

अलिबाग : प्रतिनिधी अंगारकी चतुर्थीचे औचित्य साधून  येत्या मंगळवारी (दि. 23) दिवेआगर येथील मंदिरात नव्याने तयार करण्यात आलेल्या गणेशाच्या सुवर्ण मुखवट्याची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर येथील मंदिरातून 23 मार्च 2012 रोजी दरोडेखोरांनी दोघा सुरक्षा रक्षकांचा खून करून सुवर्ण गणेशाचा मुखवटा व दागिने मिळून एक किलो 600 ग्राम …

Read More »

वातावरण बदलांमध्ये जगण्याची धडपड

कोणताही प्राणी नामशेष होण्यामागे महत्त्वाचं कारण असतं ते वातावरण बदलाचं. मानवप्राणी सोडल्यास बदलत्या वातावरणामुळे आजतागायत अनेक प्राण्याच्या जाती नामशेष झाल्या आहेत, तर काही अगदी दुर्मीळ झाल्या आहेत. पृथ्वीवरील तापमान व वातावरण हे सतत बदलत राहिले आहे व प्राणीदेखील वातावरण बदलांशी मिळतंजुळतं घेण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतात. यावर संशोधन करताना अनेक …

Read More »

सारे काही शेतकर्यांसाठी

शेतकर्‍यांच्या कल्याणासाठीच वर्षभरापूर्वी तीन अभिनव कृषी कायदे लागू करण्यात आले होते. देशभरातील शेतकर्‍यांनी त्याचे स्वागतच केले, परंतु हरियाणा, पंजाब आणि उत्तर प्रदेशचा काही भाग येथील शेतकर्‍यांनी संघर्षाचा पवित्रा घेतला आणि मोदी सरकारचे तिन्ही कृषीविषयक कायदे सपशेल नाकारले. यात प्रामाणिक संघर्षाचा भाग किती आणि राजकारणाचा किती हे आता येणारा काळच ठरवेल. …

Read More »

एसटी संपासंदर्भात परबांनी घेतली फडणवीसांची भेट

मुंबई : प्रतिनिधी एसटी संपावर तोडगा काढण्यासाठी परिवहन मंत्री अनिल परब यांनी गुरुवारी (दि. 18) थेट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा सागर बंगला गाठला. या वेळी त्यांनी फडणवीसांसोबत एसटी कामगारांच्या संपावर चर्चा केली. कोर्टाचे आदेश आणि एसटीची आर्थिक स्थिती यावरही या बैठकीत चर्चा झाली. या वेळी पगाराचा मुद्दा कसा सोडवायचा …

Read More »

दिघोडे-जांभूळपाडा मार्गावर पावसामुळे वाहतूक कोंडी

उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील चिरनेर-गव्हाण फाटा महामार्गावरील दिघोडे-जांभूळपाडा मार्गावर अवकाळी पावसामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाल्याने वाहतूक दोन तास ठप्प झाली होती. या महामार्गावर दिघोडे-गव्हाण फाटादरम्यान असलेले कंटेनर गोदामातील अवजड वाहतुकीची वर्दळ अधिक प्रमाणात असून, या गोदामांना ट्रेलर पार्किंगच्या ठिकाणी काही कंटेनर उभे करण्यात येतात. त्यामुळे या गोदामांना अन्य कोणत्याही …

Read More »

कराडे खुर्दमध्ये निवारा शेडचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त तालुक्यातील कराडे खुर्द ग्रामपंचायत निधीमधून कराडे खुर्द येथे स्मशानभूमीजवळ निवारा शेड उभारण्यात आले आहे. या निवारा शेडचे उद्घाटन प्रभारी सरपंच यशश्री योगेश मुरकुटे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला सदस्य नलिनी कारंदे, मीनल ठोंबरे, मुकेश पाटील, प्रमिला पाटील, माधुरी चितळे, रेवती भोईर, नितेश कारंदे, संतोष म्हात्रे, …

Read More »