Breaking News

Monthly Archives: November 2021

आधारभूत भात खरेदी केंद्र सुरू करा; पेण तालुक्यातील शेतकर्‍यांची मागणी

पेण : प्रतिनिधी तालुक्यात खरीप हंगामातील भाताची कापणी करण्यास सुरुवात झाली असून, पेण तालुक्यात अद्याप आधारभूत खरेदी केंद्र सुरू झालेले नाही. बाजारात भाताला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकर्‍यांची पिळवणूक होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर शासकीय आधारभूत भात खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी पेण तालुक्यातील शेतकरी करीत आहे. रायगड …

Read More »

पनवेलमध्ये उद्यानाची साफसफाई; नगरसेवक विक्रांत पाटील यांचा पाठपुरावा

पनवेल : वार्ताहर पनवेल प्रभाग क्रमांक 18 मधील ठाणा नाका रोडवरील श्रीजी सोसायटी आणि नालंदा सोसायटी परिसरातील उद्यानात साफसफाई करण्यात आली. या कामी नगरसेवक विक्रांत पाटील यांनी पाठपुरावा केला होता. ठाणा नाका रोडवरील श्रीजी व नालंदा सोसायटी परिसरातील उद्यानात पावसाळ्यात गवत व झाडे झुडपे वाढली होती. तसेच पाऊस लांबल्यामुळे उद्यानात …

Read More »

आदिवासींची पाण्यासाठी पायपीट; कर्जतमधील मोरेवाडी, ताडवाडी ग्रामस्थांची परवड

कर्जत : बातमीदार तालुक्यातील पाथरज ग्रामपंचायत हद्दीतील मोरेवाडी आणि ताडवाडी येथील आदिवासी लोकांची पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट सुरू झाली आहे. पावसाळा संपताच लगेचच येथील महिलांना पाण्यासाठी मातीच्या बंधार्‍यावर जावे लागत आहे. त्यासाठी या आदिवासी महिलांना पुरुषांची मदत घ्यावी लागत असल्याने पाण्यासाठी येथील आदिवासी लोकांचा रोजगारदेखील बुडत आहे. कर्जत हा आदिवासीबहुल तालुका …

Read More »

उरण बेलदारवाड्यातील रस्ता काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण

नागरिकांनी मानले आमदार महेश बालदींचे आभार उरण : वार्ताहर आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नाने उरणमध्ये विविध विकासकामे जोरदार सुरूच आहेत. उरण नगर परिषद हद्दीतील मोरा मुख्य रस्त्याजवळील बेलदारवाडा येथे चिंचेच्या झाडापासून दगडी खाणीपर्यंत रस्ता काँक्रिटीकरण काम पूर्ण झाले आहे. त्याबद्दल येथील नागरिकांनी आमदार महेश बालदी यांचे सोमवारी (दि. 1) संपर्क …

Read More »

दिवाळीनिमित्त फराळ सामानाचे वाटप

भाजप तक्का विभागाचा स्तुत्य उपक्रम    1500 कुटुंबीयांनी घेतला लाभ पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष व श्री युवा प्रतिष्ठान तक्का-पनवेलचे प्रमुख मार्गदर्शक आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली श्री युवा प्रतिष्ठानचे संस्थापक युवा नेते प्रतिक देवचंद बहिरा व भाजप तक्का विभागीय कमिटी यांच्या वतीने 1500 कुटुंबीयांना दिवाळी फराळ सामान …

Read More »

कर्जत डामसेवाडीतील आदिवासींना दिवाळी भेट

कर्जत : बातमीदार पनवेल कामोठे येथील निर्धार सामाजिक संस्थे तर्फे कर्जत तालुक्यातील नांदगाव ग्रामपंचायत हद्दीमधील डामसेवाडी येथील आदिवासी कुटुंबाना दिवाळी फराळासह कपडे, शैक्षणिक साहित्य, धान्य तसेच आकाश कंदिलचे वाटप करण्यात आले. संस्थेचे पदाधिकारी अनिल कुंभार, शुभम वाळके, कमलेश पाटील, रोहीत पाटील, निलेश आहेर, सुरेश झोरे आदींनी डामसेवाडीत जावून तेथील आदिवासी …

Read More »

अमर वार्डे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

अलिबाग : प्रतिनिधी दत्ताजीराव खानविलकर एज्युकेशनल ट्रस्टचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार अमर वार्डे यांच्या ’उनाडक्या’ या पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी (दि. 30) सरस्वती एज्युकेशन ट्रस्टचे विश्वस्त अशोक टिळक आणि मनीषा टिळक यांच्या हस्ते करण्यात आले. ट्रस्टच्या चिंतामणराव केळकर विद्यालयाच्या सभागृहात अ‍ॅड. संजीव जोशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या पुस्तक प्रकाशन समारंभाला प्रकाशक फारूक …

Read More »

‘गृहरक्षक दलाच्या सर्वच जवानांना 108 रुग्णवाहिकेची माहिती असायलाच पाहिजे’

अलिबाग : रामप्रहर वृत्त अपघातस्थळी तातडीने पोचून जखमींना रुग्णालयापर्यंत पोचविण्याचे काम 108 ही रुग्णवाहिका करीत असल्याने या रुग्णवाहिकेबाबतची माहिती गृहरक्षक दलाच्या सर्वच जवानांना असायला पाहिजे, असे मत आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञ जयपाल पाटील यांनी व्यक्त केले. रायगड जिल्हा होमगार्ड व नागरी संरक्षण दल यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबाग गोंधळपाडा येथील होमगार्ड प्रशिक्षण …

Read More »

पेणमध्ये सायकल रॅली

पेण : प्रतिनिधी माझी वसुंधरा अभियानांतर्गत पेण नगर परिषद आणि रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात सायकल रॅली काढण्यात आली होती. प्रदूषण रोखण्यासाठी आठवड्यातून किमान एकदा तरी सायकलचा वापर करा आणि शहरातील प्रदुषण कमी करण्यासाठी सहकार्य करा, असे आवाहन नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी या वेळी केले. पर्यावरणाच्या जनजागृतीसाठी नगर परिषद …

Read More »

वाहतूक कोंडीने महाड गुदमरतंय!

महाड शहरातले रस्ते हे वाहतूक कोंडीचे जाळे झाले आहे. बेकायदेशीर पार्किंग आणि विक्रेत्यांमुळे शहरातील मुख्य मार्ग वाहतूक कोंडीच्या विळख्यात सापडले आहेत. दिवसेंदिवस हा प्रश्न गंभीर होत चालला आहे. नगरपालिका प्रशासन आणि वाहतूक पोलीस यंत्रणा या वाहतूक कोंडीतून महाडकरांची सुटका करण्यात अपयशी ठरले आहेत. महाड शहरात दोन प्रमुख मार्ग आहेत. एक …

Read More »