पनवेल ः रामप्रहर वृत्त आपल्या भारत देशाला अधिक बलवान बनवायचे असेल तर विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पुढे नेणे गरजेचे आहे. त्यासाठी आंबेडकरी चळवळ धारदार बनवून देशात समता, बंधुत्व, न्याय व विज्ञानाचा पुरस्कार करणे हे प्रत्येक आंबेडकरी अनुयायाचे कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य पुर्णपणे पार पाडण्यासाठी अनुयायांनी झटले पाहिजे, …
Read More »Monthly Archives: April 2022
मनमौजी माउंटेनियर्सने पाच दिवसात पाच सुळके सर केले
मोहोपाडा ः प्रतिनिधी चौक, रसायनी, पनवेल विभागातील मनमौजी माउंटेनियर्सने पाच दिवसात पाच सुळके सर करून गडप्रेमींना अनोखी भेट दिली आहे. त्यामुळे माउंटेनियर्स यांच्यात उत्साह वाढला आहे. इर्शाळगड, तेल बैला डावा, तेल बैला उजवा, कल कराई, वजीर सुळका हे पाच कठीण सुळके रसायनीतील विनयप्रताप हनुमंत सिंग यांच्या नेतृत्वाखाली पाच दिवसात चढून …
Read More »उलवे येथे जागतिक वसुंधरा दिनानिमित्त वृक्षारोपण
उरण ः बातमीदार अमेरिकेतील सॅन फ्रॅन्सिस्को गेलार्ड नेल्सन यांनी 1970 मध्ये अर्थ डे ही सर्वप्रथम संकल्पना मांडली. त्यानुसार 22 एप्रिल हा दिन जागतिक वसुंधरा दिन म्हणून जगभर साजरा होत असतो. उलवे येथील वटवृक्ष सामाजिक संस्थेच्या वतीने स्थानिक परिसंस्थेला उपयुक्त असणार्या देशी वृक्ष लागवड करुन जागतिक वसुंधरा दिन साजरा करण्यात आला. …
Read More »नवी मुुंबईत 68 ठिकाणी ‘माणुसकीच्या भिंती’
स्वच्छ भारत अभियानांतर्गत उपक्रम; संकल्पनेला प्रतिसाद नवी मुंबई : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांर्तगत नवी मुंबई पालिकेने हवे असेल ते घ्या आणि नको असेल ते द्या अशी संकल्पना राबविण्यात आली असून शहरातील महत्त्वाच्या 68 ठिकाणी माणुसकीची भिंत उभारण्यात आली आहे. या ठिकाणी आपल्याकडील जुने मात्र चांगल्या स्थितीतील कपडे, …
Read More »जादूगार हवा आहे
आधी निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांचे प्रेझेंटेशन, मग चर्चांचे गुर्हाळ, मग समितीचे चर्हाट, पुन्हा चिंतन शिबिराची उठाठेव आणि त्यानंतर परदेशातून परतलेल्या माननीय राहुलजी यांचा निर्णय अशा प्रचंड प्रक्रियेतून गेल्यानंतरच काँग्रेसीजनांच्या हाताला पुनर्जन्मासाठी आवश्यक असलेली संजीवनी बुटी लागेल असे दिसते. मात्र इतके घडून देखील काँग्रेस अजूनही आस्ते कदम याच भूमिकेत असली …
Read More »उरण आगारातील 90 टक्के बससेवा पूर्ववत
181 कर्मचारी पुन्हा कामावर हजर उरण ः वार्ताहर मुंबई विभागाच्या उरण आगारात संपकरी एसटी कर्मचार्यांचे पुनरागमन झाले आहे. आगारातील 193 कर्मचार्यांपैकी जवळजवळ 181 कर्मचारी पुन्हा कामावर रूजू झाले आहेत. त्यामूळे 90 टक्क्यांहून अधिक बससेवा सुरू झाली असल्याची माहिती उरण आगाराचे व्यवस्थापक सतीश मालचे यांनी दिली आहे. ऑक्टोबर 2021पासून राज्यातील एसटी …
Read More »पनवेलमध्ये संजय गांधी निराधार योजना समिती गठीत
एकूण 53 प्रकरणे मंजूर पनवेल : रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी 24 मार्च 2022 रोजी दिलेल्या आदेशानुसार पनवेल तालुक्यासाठी संजय गांधी निराधार योजना समिती गठीत करण्यात आलेली आहे. त्याअनुषंगाने समितीच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि. 20) तहसीलदार कार्यालय पनवेल येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत संजय …
Read More »पनवेल प्रभाग 18मधील पाडा मोहल्ल्यात नालेसफाई
नगरसेवक विक्रांत पाटील यांची कार्यतत्परता पनवेल ः वार्ताहर पनवेल महापालिका प्रभाग 18मधील पाडा मोहल्ल्यात नाले आणि गटारांची दूरवस्था झाली होती. याबाबत नगरसेवक विक्रांत पाटील यांच्याकडे नागरिकांनी तक्रार करताच त्यांनी तातडीने या भागातील नालेसफाई करून घेतली. पाडा मोहल्ल्यात सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने पाणी तुंबण्याचे प्रमाण वाढत होते. याबाबत परिसरातील नागरिकांनी नगरसेवक …
Read More »‘सीकेटी’च्या एनसीसी विभागातर्फे शहिदांना नमन
पनवेल ः रामप्रहर वृत्त राष्ट्रीय कॅडेट्स कोप्स (एनसीसी)च्या शहिदांना शतश: नमन कार्यक्रमांतर्गत 8 महाराष्ट्र गर्लस बटालियन मुंबई गट व सीकेटीच्या एनससीसी विभागातर्फे शहीद नाईक हनुमंत कदम यांचे भाऊ श्रीकांत कदम यांना कृतज्ञता फलक प्रदान केले. कर्नल एम. एल. शर्मा यांच्या नेतृत्वाखाली स्मृतिचिन्ह आणण्यात आले. शहीद नाईक हनुमंत कदम यांना 17 …
Read More »भाजप खोपटे गाव अध्यक्षपदी नवनाथ ठाकूर
उरण ः बातमीदार भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते तथा खोपटे गावचे सुपुत्र नवनाथ नारायण ठाकूर यांची खोपटे गाव अध्यक्षपदी निवड करण्यात आल्याचे पत्र उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांनी नवनाथ ठाकूर यांना दिले. लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर, आ. प्रशांत ठाकूर, आ. महेश बालदी यांनी नवनाथ ठाकूर यांना शुभेच्छा दिल्या. …
Read More »