Breaking News

Monthly Archives: June 2022

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे मोफत वह्यावाटप

भाजप नेते अरुणशेठ भगत यांची प्रमुख उपस्थिती खारघर : रामप्रहर वृत्त श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने व भाजप युवा मोर्चाचे खारघर तळोजा उपाध्यक्ष शुभ पाटील याच्या वाढदिवसाचे औचित्य साधून खारघर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत वह्या वाटपाचा कार्यक्रम सोमवारी (दि. 27) आयोजित करण्यात आला होता. या वेळी भाजपचे पनवेल …

Read More »

करंजाडेतील पाणीप्रश्नी भाजपने वेधले सिडकोचे लक्ष

पाणीपुरवठा सुरळीत करण्याची आग्रही मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत बैठक पनवेल : रामप्रहर वृत्त करंजाडे पाणीप्रश्नावर पूर्वनियोजित बैठक सोमवारी (दि. 27) भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप मध्यवर्ती कार्यालयात झाली. या बैठकीत करंजाडेमधील पाणी प्रश्नावर सविस्तर चर्चा करण्यात आली. या शहरास 15 एमएलडी …

Read More »

नागरी समस्यांबाबत भाजपची तत्परता

कळंबोलीतील उघड्या गटारांना झाकणे बसविण्याची मागणी सभापती प्रमिला पाटील यांचे सिडकोला निवेदन कळंबोली : रामप्रहर वृत्त कळंबोलीमधील उघड्या गटारांना झाकण लावण्यात यावी, अशी मागणी करीत पनवेल महापालिकेच्या प्रभाग समिती ‘ब’च्या सभापती प्रमिला पाटील यांनी सिडकोच्या अभियंताकडे निवेदन दिले. कळंबोली हे सिडकोने वसविलेले शहर आहे. आता या शहरांमधील नागरी सुविधांची वानवा …

Read More »

‘महाराष्ट्रात लवकरच भाजप-शिवसेनेचे सरकार’

नवी दिल्ली : उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीतून बाहेर पडावे. महाराष्ट्रात लवकरच भाजप-शिवसेनेचे सरकार येईल, असा विश्वास ना. एकनाथ शिंदे समर्थक आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केला आहे. माध्यमांशी बोलताना आमदार केसरकर पुढे म्हणाले की, सध्या 10-12 आमदार वगळता सर्व आमदार आमच्यासोबत आहेत. आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जातोय. आमच्यावर गद्दाराचे …

Read More »

उकरूळ गावात कृषी संजीवनी सप्ताह; शेतकर्‍यांचा प्रतिसाद

कर्जत : बातमीदार एसआरटी, चारसूत्री लागवड पद्धत तसेच ड्रमसिडरसारख्या नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतकर्‍यांनी भात पिकाचे उत्पादन वाढवावे, असे आवाहन कर्जत तालुका कृषी अधिकारी शीतल शेवाळे यांनी उकरूळ येथे केले.  कृषी संजीवनी सप्ताहाचे निमिताने कर्जत तालुक्यातील उकरूळ ग्रामपंचायत आणि तालुका कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने गावातील मंदिरात शेतकर्‍यांसाठी प्रशिक्षण शिबिर …

Read More »

कर्जतमध्ये असंघटित कामगारांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर

कर्जत : बातमीदार राजर्षी शाहू महाराज जयंती दिनानिमित्त आधार असंघटीत जनरल कामगार युनियनच्या वतीने रविवारी (दि. 26) कर्जतमधील रायगड जिल्हा परिषदेच्या कन्या शाळेत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात नामवंत डॉक्टरांनी असंघटित कामगारांची आरोग्य तपासणी केली. राजर्षी शाहू महाराज जयंतीचे औचित्य साधून आधार असंघटीत जनरल कामगार …

Read More »

पोलादपुरातील रानबाजिरे धरणाची साठवण क्षमता वाढण्यासाठी बॅकवॉटर केले टप्प्याटप्प्याने रिकामे

वाळू वाहून गेल्याने अवैध उपसा करणार्‍यांची धांदल पोलादपूर : प्रतिनिधी तालुक्यातील रानबाजिरे धरण गेल्या वर्षी ओव्हरफ्लो होऊन वाहू लागले होते. या पार्श्वभूमीवर हे धरण उशिराने भरावे, यासाठी गेल्या महिन्यापासून धरणातील पाणी सावित्रीत सोडले जात आहे. त्यामुळे नदीपात्रातील  वाळू वाहून गेल्याने अवैध वाळू उपसा करणार्‍यांची धांदल उडाल्याचे दिसून येत आहे. पोलादपूर …

Read More »

जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून 10 गावांचा कायापालट करणार -आनंद राणे

कर्जत : प्रतिनिधी जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने येत्या तीन वर्षात राज्यातील दहा गावांचा कायापालट करण्यात येईल, अशी ग्वाही जीवनविद्या मिशनचे विश्वस्त आनंद राणे यांनी भिवपुरी (ता. कर्जत) येथे दिली. कर्जत तालुक्यातील वैजनाथ परिसरात असलेल्या सद्गुरू वामनराव पै यांच्या जीवनविद्या मिशनच्या वतीने भिवपुरी गावामध्ये ग्रामसमृध्दी अभियान राबविण्यात येणार आहे. …

Read More »

वाकण-खोपोली मार्गावरील पुलांचे काम अपुर्णावस्थेत

पावसाळ्यात यंदाही वाहणार पाली पुलावरून पाणी पाली : प्रतिनिधी वाकण-पाली-खोपोली राज्यमहामार्गावर जांभूळपाडा, भालगूल व पाली येथील नदीवरील पुलांची कामे सुरू आहेत. मात्र ही कामे अजूनही अपूर्ण आहेत. त्यामुळे पावसाळ्यात पालीतील अंबा नदी पुलावरून पाणी जाऊन वाहतूक खोळंबणार आहे. पावसाळ्यापूर्वी येथील पाली अंबा नदीवरील पुलाच्या एका मार्गिकेचे कामे पूर्ण करण्याचे एमएसआरडीसीचे …

Read More »

म्हसळ्यात भरवस्तीत आले भेकर

वनविभागाच्या सर्तकतेने जखमी भेकराला मिळाले जीवदान म्हसळा : प्रतिनिधी शहरातील भरवस्तीमधील दुकानाच्या बंद शटरला संध्याकाळच्या सुमारास एका भेकराने जोरदार धडक जोरदार धडक दिल्याने ते जखमी झाले. त्याचे वृत्त समजताच म्हसळयाचे वनपाल तत्काळ घटनास्थळी पोहचले त्यांनी पशुधन पर्यवेक्षकांच्या माध्यमातून उपचार करून जखमी भेकराला जिवदान दिले. म्हसळा तालुक्यात वनविभागाचे क्षेत्र फार मोठे …

Read More »