Breaking News

Monthly Archives: May 2023

टेंभोडे परिसरात हॅण्डग्रेनेड सदृश्य वस्तू मिळल्याने खळबळ

पनवेल : वार्ताहर पनवेल जवळील टेंभोडे परिसरात असलेल्या झाडाझुडपात हॅण्डग्रेनेड सदृश्य वस्तू मिळल्याने परिसरात खळबळ उडाली होती. पनवेल जवळील टेंभोडे परिसरात असलेल्या क्रिकेट मैदानाच्या शेजारील नाल्यालगत असलेल्या झाडीझुडपात हॅण्डग्रेनेड सदृश्य वस्तू मिळल्याने परिसरात खळबळ उडाली होती. काही जागरूक नागरिकांनी या घटनेची माहिती खान्देश्वर पोलिसांना देताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत …

Read More »

सर्वांत मोठ्या दिवाळी अंक स्पर्धेचा 3 जूनला पारितोषिक वितरण समारंभ

पनवेल ः रामप्रहर वृत्त शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणारे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या 22व्या राज्यस्तरीय व रायगड जिल्हास्तरीय या सर्वांत मोठ्या दिवाळी अंक स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ 3 जून रोजी …

Read More »

एक्स्प्रेस वेवर ब्रेक फेल कंटेनरची सहा वाहनांना धडक

एक ठार, पाच जण जखमी खोपोली, खालापूर ः प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बोरघाटातील खोपोली बायपासजवळ ढेकू गावाच्या हद्दीत एका ब्रेक फेल झालेल्या कंटेनरने पुढे जाणार्‍या सहा कारना धडक दिल्याची घटना सोमवारी (दि. 22) रात्री घडली. या अपघातात एकाचा मृत्यू, तर पाच जण जखमी झाले आहेत. पुणे येथून मुंबईमार्गे राजस्थानकडे जाणार्‍या …

Read More »

वडाळे तलाव स्वच्छतेसह जलचरांच्या सुरक्षेसाठी आवाहन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेने वडाळे तलावाचे सुशोभीकरण नुकतेच केले आहे. सुंदर परिसर, रम्य वातावरण, समोर अथांग असे तळे पाहून पनवेलकर नागरिक हा मोकळा श्वास घेत सुखावत असतो, परंतु काही नागरिक हे त्याच तळ्यामधील माश्यांना खायला घालायला म्हणून येतात आणि नको नको त्या गोष्टी त्या तळ्यात टाकत असतात. त्यामुळे …

Read More »

एकविरा देवीबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणार्‍यास अटक

पनवेल : वार्ताहर महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान आणि आगरी कोळी, कराडी समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या आई एकविरा देवीबद्दल इस्टाग्राम या सोशल मीडियावर आक्षेपार्ह अपशब्द पोस्ट केल्याप्रकरणी पनवेल पोलिसांनी शेखर उर्फ शैलेश बाळासाहेब शेंडगे याला सोलापूर येथून अटक केली आहे. दुसर्‍या आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत. एकविरा देवीबद्दल आक्षेपार्ह व अपशब्द पोस्ट करून …

Read More »

युवा वॉरियर्स फुटबॉल, व्हॉलीबॉल चषक स्पर्धा रंगली

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यापैकी खारघर येथील गोखले शाळेच्या मैदानात रंगलेल्या युवा वॉरियर्स व्हॉलीबॉल चषक स्पर्धेचे उद्घाटन भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते, तर खांदा कॉलनीतील सीकेटी महाविद्यालयाच्या …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून न्हावे विद्यालयासाठी सर्वतोपरी मदतीची ग्वाही

पनवेल ः रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शनिवारी (दि. 20) रयत शिक्षण संस्थेच्या पनवेल तालुक्यातील न्हावे येथील न्यू इंग्लिश स्कूल येथे भेट देऊन नूतन इमारतीची पाहणी केली. या वेळी त्यांनी उर्वरित काम टीआयपीएल कंपनीकडून पूर्ण करून देण्याचे जाहीर केले तसेच विद्यालयासाठी सुसज्ज व अद्ययावत प्रयोगशाळा, संगणक कक्ष …

Read More »

मुख्यमंत्री सोमवारी नेरळजवळील सगुणाबागमध्ये

कर्जत ः प्रतिनिधी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी (दि. 22) नेरळजवळील सगुणाबाग कृषी पर्यटन केंद्रात भेट देणार आहेत. कृषीरत्न शेतकरी शेखर भडसावळे यांच्या जल, कृषी आणि पर्यावरणविषयक प्रकल्पांची पाहणी मुख्यमंत्री करणार आहेत. त्याचवेळी सगुणा रुरल फाऊंडेशनकडून आयोजित सगुणा राईस टेक्निक (एसआरटी) पद्धतीने शेती करणार्‍या राज्यातील 30 शेतकर्‍यांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सन्मान …

Read More »

खारघर टोल नाका येथे जनावरांच्या मांसाने भरलेला टेम्पो जप्त

फरार चालकाविरोधात गुन्हा दाखल पनवेल : वार्ताहर बेकायदेशीररित्या गोवंश जनावरांची कत्तल करुन टेम्पोमधून सुमारे 350 किलो वजनाचे मुंबईमध्ये नेले जाणारे जनावरांचे मांस पकडण्याची कारवाई खारघर पोलिसांनी सायन-पनवेल मार्गावरील खारघर टोल नाका येथे केली. या कारवाईत पोलिसांनी जनावरांचे मांस घेऊन जाणार्‍या टेम्पोसह मांस जप्त केले आहे. या वेळी टेम्पोचालक पळून गेल्याने …

Read More »

चिंचवणमध्ये विविध विकासकामांचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी यांच्या पाठपुराव्यातून पनवेल तालुक्यातील आणि उरण मतदारसंघातील चिंचवण गावात सुमारे एक कोटी 23 लाख रुपयांची विकासकामे मंजूर झाली आहेत. या कामांचे भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शनिवारी (दि. 20) झाले. पनवेल …

Read More »