Breaking News

Monthly Archives: May 2023

खालापुरात दहा दगडखाणी सील; तहसीलदारांची धडक कारवाई

खोपोली ः प्रतिनिधी पर्यावरण विभागाची मुदत संपुष्टात आल्यानंतरदेखील दगड खदान, क्रशर सुरू ठेवणार्‍या दहा दगड खाणींवर तहसीलदार आयुब तांबोळी यांच्या आदेशाने शनिवारी (दि. 27) कारवाई करण्यात आली. दगड खाणीला महसूल पथकाकडून टाळे ठोकण्यात आले आहे. तालुक्यात सुरू असलेल्या दगड खाणीबद्दल अनेक तक्रारी महसूल विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने महसूल …

Read More »

पनवेल वडवलीतील अंतर्गत रस्ता होणार सुसाट

काँक्रिटीकरणाचे भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्त उरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक विकास निधीमधून 10 लाख रुपये खर्चून नांदगाव ग्रामपंचायत येथील वडवली गावातील अंतर्गत रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम करण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शनिवारी (दि. 27) …

Read More »

जंजिरा किल्ला सोमवारपासून बंद

शेवटच्या सुट्यांमध्ये किल्ल्यावर अलोट गर्दी मुरूड ः प्रतिनिधी मुरूड तालुक्यातील राजपुरी येथील सुप्रसिद्ध जंजिरा किल्ला हा सोमवार (दि. 29)पासून बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे शेवटचा शनिवार-रविवारची सुट्टी साधून पर्यटकांनी किल्ला पाहण्यासाठी अलोट गर्दी केली होती. मोठ्या प्रमाणात पर्यटक आल्याने किल्ल्याच्या प्रवेशद्वारजवळ मोठी गर्दी झाली होती. त्यातच पावसाळा जवळ आल्याने लाटांचा …

Read More »

रायगडच्या विकासासाठी पंचसूत्री केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना सुपूर्द

पनवेल ः प्रतिनिधी औद्योगिक विकासापासून वंचित राहिलेल्या दक्षिण रायगडमधील श्रीवर्धन, म्हसळा तालुक्यांसह उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड व दापोली तालुक्यांचा विकासाचा अनुशेष भरून काढण्याबाबत होऊ शकणार्‍या उपाययोजनांची विकासाची पंचसूत्री केंद्रीय रस्ते वाहतूक व राष्ट्रीय महामार्ग मंत्रालय मंत्री नितीन गडकरी यांना ग्रंथमित्र, तथा भाजपचे दक्षिण रायगड जिल्हा चिटणीस मनोज गोगटे यांनी नागपूर …

Read More »

आमरसामुळे पनवेल-सायन महामार्ग झाला जाम

पनवेल ः वार्ताहर पनवेल-सायन महामार्गावर पनवेलहून बेलापूरकडे जाणार्‍या रिक्षेमधील आमरसाने भरलेली अंदाजे पाच ते दहा किलो वजनाची पिशवी रस्त्यावर पडल्याने आमरस रस्त्यावर सांडला. या आमरसामुळे जवळपास पाच ते सहा वाहने घसरल्याने काही काळ पनवेल-सायन महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. सायन-पनवेल महामार्गावरील कामोठे ब्रिजवर पाच ते सहा वाहने घसरून पडली. हा …

Read More »

देशातील पहिल्या ’एआय’ विद्यापीठाला मंजुरी

पनवेल ः वार्ताहर राज्य सरकारच्या उच्च व तंत्रशिक्षण खात्याने आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (मानवनिर्मित बुद्धिमत्ता) प्रेरित शिक्षण देणार्‍या भारतातील पहिल्या विद्यापीठाला अंतिम मंजुरी दिली आहे. या विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकवले जाणार आहेत. रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे युनिव्हर्सल एआय विद्यापीठ कार्यान्वित झाल्याची माहिती खात्यातर्फे जारी अधिसूचनेद्वारे देण्यात आली आहे. एआय क्षेत्रातील …

Read More »

बारावीच्या परीक्षेत कामोठ्यातील लोकनेते रामशेठ ठाकूर कॉलेजचा 100 टक्के निकाल

कामोठे : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मिडीयम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजचा बारावीचा निकाल 100 टक्के लागला आहे. यामध्ये सायन्स विभागामध्ये श्रेयश गजानन नाळे याने 85.66 टक्के तर कॉमर्स विभागात 84.50 टक्के गुण प्राप्त करून देवदिप दिनेश त्रिपाठी याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. लोकनेते …

Read More »

बारावीच्या परीक्षेत मुंबई विभागामध्ये रायगड सरस

अलिबाग ः प्रतिनिधी बारावीच्या परीक्षेत रायगड जिल्ह्यातील 91.94 टक्के विद्यार्थी उर्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षी 93.11 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. यंदा दोन टक्क्यांनी निकाल घसरला आहे. तरीदेखील रायगडने मुंबई विभागात रायगड अव्वल स्थान मिळवले आहे. जिल्ह्यात तळा तालुक्याचा निकाल सर्वाधिक 97.30 टक्के लागला आहे. फेब्रुवारी 2023मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या …

Read More »

बारावीच्या परीक्षेत यंदाही कोकण विभाग नंबर वन!

निकालात मुलींची बाजी मुंबई ः प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल 91.25 टक्के लागला आहे. विभागनिहाय निकालाची टक्केवारी पाहता कोकण विभाग अव्वल स्थानी (96.01 टक्के) आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीची …

Read More »

ज्युनिअर पनवेल प्रीमियर लीगमध्ये एफएससीसी, रॉकविला फायटर्स विजयी

पनवेल ः रामप्रहर वृत्त मिडलक्लास सोसायटीच्या मैदानावर सुरू असलेल्या टीआयपीएल ज्युनिअर पनवेल प्रीमियर लीगच्या दुसर्‍या दिवशी फ्युचर स्टार क्रिकेट क्लिनिक (एफएससीसी) आणि रॉकविला फायटर्स या संघांनी विजयाची नोंद केली. पहिला सामना एफएससीसी विरुद्ध प्रतीक क्रिकेट अकॅडमी (पीसीए) असा झाला. यामध्ये पीसीएने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्रक्षण स्वीकारले. एफएससीसी संघाने फलंदाजी करीत …

Read More »