पुणे ः प्रतिनिधी शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) गैरव्यवहार केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करीत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक केली आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी या प्रकरणी काही धक्कादायक खुलासे केले आहेत. या प्रकरणात आतापर्यंत दोन लोकांना अटक करण्यात आली असून आरोपींकडून 90 लाख …
Read More »केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्र दौर्यावर
पुणे ः केंद्रीय अमित शाह दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौर्यावर येत आहेत. सहकाराची सुरुवात झालेल्या प्रवरा येथे शनिवारी (दि. 18) देशाची पहिली सहकार परिषद होणार आहे तसेच विचारमंथनही होणार आहे. या परिषदेस गृहमंत्री शाह उपस्थित राहणार आहेत. सहकार क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी या परिषदेत सहभागी होणार आहेत. त्यामुळे या वेळी शाह काय …
Read More »लष्करी इतमामात अंत्यसंस्कार; पती-पत्नीला एकाच वेळी अखेरचा निरोप
नवी दिल्ली : वृत्तसंस्था ‘अमर रहे अमर रहे बिपीन रावत अमर रहे’, ‘वंदे मातरम’, ‘भारत माता की जय’, ‘जब तक सूरज चांद रहेगा, बिपीनजी का नाम रहेगा’ अशा घोषणा देत शुक्रवारी (दि. 10) देशाच्या संरक्षण दलाचे प्रमुख (सीडीएस) जनरल बिपीन रावत यांना अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांच्यासह पत्नी मधुलिका रावत …
Read More »तामिळनाडूत भीषण हेलिकॉप्टर दुर्घटना; देशाचे सीडीएस बिपीन रावत यांच्यासह 13 जणांचा मृत्यू
चेन्नई, नवी दिल्ली ः वृत्तसंस्था देशाच्या तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख अर्थात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत यांचे बुधवारी (दि. 8) तामिळनाडूमध्ये झालेल्या भीषण हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये निधन झाले. भारतीय वायुदलाचे एमआय-17 व्ही 5 हेलिकॉप्टर बुधवारी दुपारी तामिळनाडूच्या कुन्नूर भागात कोसळले. या दुर्घटनेत एकूण 14 पैकी 13 जणांचा मृत्यू झाला आहे. …
Read More »गोव्यात काँग्रेसच्या आणखी एका माजी मुख्यमंत्र्याचा राजीनामा
पणजी : मागील काही महिन्यांपासून गोव्यात काँग्रेसला गळती लागलेली पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते लुइजिन्हो फेलेरो यांनी राजीनामा देऊन ते तृणमूल काँग्रेसमध्ये दाखल झाले होते. त्यानंतर आता गोव्यातील आणखी एका माजी मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसमधून फारकत घेतली आहे. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते रवी नाईक यांनी …
Read More »…म्हणून ओबीसींचे सर्वेक्षण रखडले; भाजप नेते राम शिंदेंचा राज्य सरकारवर आरोप
अहमदनगर : प्रतिनिधी ’ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द करताना सर्वोच्च न्यायालयाने यासंबंधीचा इम्पिरिकल डाटा सादर करण्यास सांगितले होते. हे काम राज्य मागासवर्ग आयोगाचे आहे. त्यासाठी 450 कोटी रुपयांच्या निधीची गरज आहे, मात्र महाविकास आघाडीने आयोगाला हा निधी दिला नाही. त्यामुळे हे काम रखडले आहे,’ असा आरोप भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजी मंत्री …
Read More »विधान परिषद निवडणूक : चंद्रशेखर बावनकुळेंचा अर्ज दाखल; भाजपचे शक्तिप्रदर्शन
नागपूर ः प्रतिनिधी नागपूरमधून विधान परिषदेसाठी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. यानिमित्ताने भाजपने सोमवारी (दि. 22) नागपुरात शक्तिप्रदर्शन केले. या वेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या वेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, आम्हाला अतिशय आनंद आहे की, आमचे सहकारी चंद्रशेखर …
Read More »काँग्रेसच्या पदयात्रेत मानापमान नाट्य
कल्याण : प्रतिनिधी महागाईच्या विरोधात काँग्रेसने संपूर्ण राज्यात जनजागरण पदयात्रा सुरू केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वातील ही पदयात्रा रविवारी (दि. 21) कल्याणमध्ये काढण्यात आली होती, मात्र या यात्रेत मानापमान नाट्य रंगले. काँग्रेस सेवा दलाच्या कार्यकर्त्यांनी या पदयात्रेवर बहिष्कार टाकल्याने काँग्रेसमधील सुंदोपसुंदी उघड झाली आहे. नाना पटोले यांच्या …
Read More »अनिल देशमुखांना आणखी एक दणका
नवी दिल्ली ः 100 कोटींच्या वसुली प्रकरणामध्ये सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केलेले राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्या अडचणी दिवसेंदिवस अधिकाधिक वाढत आहेत. सीबीआय तपासाचा अहवाल तपासणीसाठी न्यायालयाच्या समोर ठेवण्याची मागणी करणारी देशमुख यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. तपास यंत्रणांना त्यांनी केलेल्या चौकशीची माहिती निरीक्षणासाठी …
Read More »विष प्राशन केलेल्या एसटी कर्मचार्याचा मृत्यू
खामगाव ः प्रतिनिधी राज्यात सुरू असणार्या एसटी संपादरम्यान विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणार्या कर्मचार्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. विशाल अंबलकर (वय 31, रा. माटरगाव, ता. शेगाव) असे या दुर्दैवी कर्मचार्याचे नाव आहे. खामगाव एसटी आगारात सहाय्यक मेकॅनिकल म्हणून काम करणार्या विशालने 16 नोव्हेंबर रोजी नैराश्येतून आपल्या घरी विष प्राशन …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper