पुणे : विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयकाच्या विरोधात भारतीय जनता युवा मोर्चाच्या (भाजयुमो) वतीने राज्यव्यापी काळे विधेयक होळी आंदोलन करण्यात आले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली विधेयकाची होळी करण्यात आली. हा आंदोलनाचा पहिला टप्पा असून आता या पुढे या आंदोलनाची मालिका चालवली जाणार आहे. यावेळी …
Read More »विदर्भ, मराठवाड्यासह प. महाराष्ट्रात गारपीट; बळीराजा चिंतेत
अकोला, नगर ः प्रतिनिधी हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार राज्यात अवकाळी पावसाला सुरुवात झाली असून विदर्भ, मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी तर गारपिटीसह वरुणराजाने हजेरी लावली. यामुळे रब्बी पिकांना धोका निर्माण झाला असून शेतकर्यांची चिंता वाढली आहे. विदर्भातील अकोल्यात मंगळवारी (दि. 28) दुपारी 2च्या सुमारास गारपिटीसह जोरदार पाऊस झाला. अकोल्यासह भंडारा, …
Read More »सातार्यातील लोकनेते रामशेठ ठाकूर भवनाचे रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरदराव पवार यांच्या हस्ते आज उद्घाटन
कर्मवीरभूमी, सातारा : हरेश साठे रयत शिक्षण संस्थेच्या सातारा येथील छत्रपती शिवाजी कॉलेज महाविद्यालयाच्या प्रांगणात उभारलेल्या ‘लोकनेते रामशेठ ठाकूर भवन’चे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते सोमवारी (दि. 27) सकाळी 11 वाजता होणार आहे. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, तर प्रमुख …
Read More »ओमायक्रॉनबाबत सावधगिरी बाळगा; ‘मन की बात’मधून पंतप्रधान मोदींचे देशवासीयांना आवाहन
नवी दिल्ली : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी मन की बात कार्यक्रमामध्ये देशाला संबोधित केले. या वर्षातील हा शेवटचा मन की बात कार्यक्रम होता. पंतप्रधान मोदींनी या वेळी देशवासीयांना वाढत्या ओमायक्रॉन विषाणूच्या प्रसाराबाबत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, आपले शास्त्रज्ञ नवीन ओमायक्रॉन प्रकाराचा सतत अभ्यास करत …
Read More »राज्यपालांचे अधिकार कमी करणे योग्य नाही; देवेंद्र फडणवीसांची राज्य सरकारवर टीका
नागपूर : प्रतिनिधी राज्यात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाचा मुद्दा जोर धरत आहे. या अध्यक्षपदाच्या निवडीसाठीच्या नियमांमध्ये राज्य सरकारने बदल केले आहे, पण त्याला भाजपने जोरदार विरोध केला आहे. राज्यपालांचे अधिकार कमी करणे हे योग्य नाही, त्यामुळे भाजप त्याचा विरोध करत आहे, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र …
Read More »मंत्री गुलाबराव पाटलांची जीभ घसरली; राजीनाम्याची मागणी
जळगाव ः प्रतिनिधी जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी बोदवड नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलताना हेमा मालिनी यांचा संदर्भ देत आक्षेपार्ह विधान केले. त्यावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भरसभेत हेमा मालिनी यांच्या गालांची तुलना रस्त्यांशी केली. हेमा मालिनीच्या गालांसारखे रस्ते मी केले, असे सांगत त्यांनी राष्ट्रवादी …
Read More »बेईमानीने केलेली कृती कधी फळत नाही -देवेंद्र फडणवीस
भंडारा ः प्रतिनिधी राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी (दि. 19) महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला. राज्यात सरकार नावाचे अस्तित्वच दिसत नाही. हे तीनचाकी सरकार बेईमानीने तयार झालेले आहे आणि बेईमानीने केलेली कृती कधी फळत नाही, असे फडणवीस म्हणाले. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर येथे नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारभेत बोलताना …
Read More »हिंमत असेल तर राजीनामा द्या! ; अमित शाह यांचे उद्धव ठाकरेंना आव्हान
पुणे ः प्रतिनिधी केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांच्या हस्ते रविवारी (दि. 19) पुणे महापालिकेच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे भूमिपूजन आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना शाह यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली. शाह म्हणाले, पुणे ही लोकमान्य टिळकांची भूमी आहे. …
Read More »पाकिस्तानातून आलेले चिनी बनावटीचे ड्रोन बीएसएफने पाडले
नवी दिल्ली : भारतीय सीमारेषेवरील पाकिस्तानच्या कुरापती अद्यापही थांबलेल्या नाहीत. कोणत्या ना कोणत्या प्रकारे त्यांचे घुसखोरी करण्याचे प्रत्यन सुरूच आहेत. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानला जगासमोर उघडे करणारी एक घटना घडली आहे. सीमा सुरक्षा दलाने शनिवारी (दि. 18) फिरोजपूर सेक्टरमध्ये पाकिस्तानमधून आलेले एक ड्रोन यशस्वीरित्या पाडले. हे ड्रोन चिनी बनावटीचे असल्याचेही समोर …
Read More »पालघरमध्ये तरुणाच्या सापासोबत दोरीउड्या; व्हिडीओ व्हायरल
पालघर ः प्रतिनिधी पालघरमधील एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका तरुणाने चक्क सापाला हातात घेऊन दोरीउड्या मारल्या. त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. व्हिडीओमध्ये तरुण हातात धामण जातीचा साप पकडून त्याच्यासोबत दोरीउडी मारत असल्याचे दिसत आहे. तरुणाने सापासोबत केलेला हा जीवघेणा खेळ कॅमेर्यात कैद करण्यात आला …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper