Breaking News

देश-विदेश

These are all news about national-international

देशात कोरोनाचा हाहाकार!; दीड हजार मृत्यू; 2,61,500 नवे रुग्ण

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था महाराष्ट्रासह देशभरात कोरोना संक्रमणाचा प्रसार वेगाने होत असून, परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होताना दिसत आहे. अशातच देशात नव्या विश्वविक्रमी रुग्णसंख्येची नोंद झाली आहे. भयावह बाब म्हणजे वाढणार्‍या रुग्णसंख्येबरोबरच देशातील मृत्यूंची संख्याही झपाट्याने वाढली आहे. पहिल्या लाटेपेक्षा कोरोनाची दुसरी लाट घातक ठरताना दिसत आहे. युके, दक्षिण, ब्राझील या …

Read More »

‘देशात लॉकडाऊनचा निर्णय घाईगडबडीत घेतला जाणार नाही’

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था देशात महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने थैमान घातले आहे. त्यामुळे देशात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लावण्याची चर्चा सुरू झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या मुद्द्यावर भूमिका मांडली. देशात लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घाईगडबडीत घेतला जाणार नाही. सध्या तरी तशी परिस्थिती दिसत नाही, असे …

Read More »

कुंभमेळा प्रतिकात्मक ठेवावा

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आवाहन नवी दिल्ली ः वृत्तसंस्थादेशात कोरोनाचे संकट गंभीर झालेले असताना उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये कुंभमेळा सुरू असून, लाखो भाविक हरिद्वारमध्ये जमले आहेत. कुंभमेळ्यातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी यांच्याशी फोनवरून संवाद साधून कुंभमेळा प्रतिकात्मक पद्धतीने करण्याची विनंती केली.हरिद्वारमधील कुंभमेळ्यात …

Read More »

महाराष्ट्रासह देशात थैमान!; सलग तिसर्‍या दिवशी हजारांहून अधिक कोरोनाबळी

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था महाराष्ट्रासह देशातील इतर राज्यांत कोरोनाचा वेगाने प्रादुर्भाव होत असून, दररोज झोप उडवणारी आकडेवारी समोर येऊ लागली आहे. सलग तिसर्‍या दिवशी देशात एक हजारांपेक्षा जास्त कोरोना बळींची नोंद झाल्याने चिंता व्यक्त होत आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने अक्षरशः थैमान घातले असून, शुक्रवारी (दि. 16) सकाळी संपलेल्या 24 तासांत …

Read More »

गुड न्यूज! यंदा देशात समाधानकारक पाऊस

हवामान विभागाचा अंदाज नवी दिल्ली ः वृत्तसंस्थादेशात कोरोनाचे संकट अधिकाधिक गडद होत असताना देशातील शेतकरी मात्र आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. कोरोनाच्या निर्बंधांमुळे शेतीपिकांची वाहतूक, वितरण आणि विक्री करण्यात शेतकर्‍यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय हवामान विभागाकडून दिलासादायक माहिती देण्यात आली आहे. यंदा सरासरीच्या 98 टक्के …

Read More »

वाढता वाढता वाढे..!

देशात कोरोना रुग्णांचा नवा उच्चांक नवी दिल्ली ः वृत्तसंस्थादेशभरात कोरोनाची दुसरी लाट आल्यापासूनची सर्वोच्च आकडेवारी नोंदवली गेली आहे. देशात मंगळवारी (दि. 13) सकाळी संपलेल्या 24 तासांत एक लाख 84 हजार 372 नवे रुग्ण आढळले आहेत.कोरोना संकट दिवसेंदिवस गडद होत चालले आहे. यावर केंद्र सरकार कठोर पावले उचलत आहे. लसीकरण मोहीमही …

Read More »

आता जगातील प्रत्येक लस भारतात मिळणार!

मोदी सरकारचा मोठा निर्णय नवी दिल्ली ः वृत्तसंस्थादेशातील कोरोना लसींचा तुटवडा दूर करण्यासाठी मोदी सरकारने मंगळवारी (दि. 13) मोठा निर्णय घेतला. ज्या लसींना जगातील कोणत्याही देशाच्या सरकारी संस्थेने परवानगी दिली आहे त्या सर्व लसींना भारतानेही मंजुरी दिली आहे. सरकारने आपल्या आदेशात ज्या संस्थांचा उल्लेख केला आहे त्या संस्था अमेरिका, युरोप, …

Read More »

महाराष्ट्रासाठी भाजप उपलब्ध करून देणार 50 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन; प्रवीण दरेकर यांची घोषणा

दमण : वृत्तसंस्था राज्यात निर्माण झालेला रेमडेसिवीरचा तुटवडा व रुग्णांची होत असलेली गैरसोय या पार्श्वभूमीवर विविध औषध कंपन्यांकडे चाचपणी करून इंजेक्शन मिळवण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून भाजप नेत्यांनी सोमवारी (दि. 12) दमणला धाव घेतली. दमणच्या भेटीनंतर महाराष्ट्रासाठी भाजपकडून 50 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून देण्याची घोषणा विधान परिषद विरोधी पक्षनेते …

Read More »

देशात सर्वाधिक लस पुरवठा महाराष्ट्राला; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची माहिती

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था देशात कोरोना लसीचा सर्वाधिक पुरवठा महाराष्ट्राला करण्यात आला आहे. लस वितरणात लोकसंख्येचा निकष नाही. लोकसंख्येचा विचार करायला गेले, तर मग सर्वाधिक लस उत्तर प्रदेशला मिळायला हवी होती, पण, तसे झाले नाही, असे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी म्हटले आहे. ते वृत्तवाहिनीशी बोलत होते.केंद्राकडून लस वितरणात …

Read More »

देशात रुग्णवाढीचा नवा उच्चांक; मृतांच्या संख्येतही झाली मोठी वाढ

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था प्रचंड वेगाने वाढणार्‍या कोरोना रुग्णांमुळे महाराष्ट्रासह देशातील परिस्थिती पुन्हा एकदा चिंताजनक होत चालली आहे. देशात रविवारी (दि. 11) सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये देशात आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णवाढ नोंदवण्यात आली. देशात 1,52,879 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. दुसरीकडे कोरोनामुळे होणार्‍या मृत्यूची संख्याही वाढली असून, आठशेपर्यंत मर्यादित …

Read More »