वर्धा : येथे रेमडेसिवीरचे उत्पादन सुरू झाल्याने महाराष्ट्रातील काळाबाजार थांबणार आहे. जिल्हाधिकार्यांच्या नियंत्रणात नागपूरसह विदर्भातील सर्व जिल्ह्यांतील गरिबांना सरकारी शुल्कात रेमडेसिवीर उपलब्ध होणार असून देशातील इतरही ठिकाणी ते पुरविले जाईल, पण वर्धा जिल्ह्याला निश्चितच प्राथमिकता असेल, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. वर्ध्यातील सेवाग्राम येथील एमआयडीसी परिसरातील …
Read More »कोरोनाची तिसरी लाट अटळ; वैद्यकीय सल्लागारांचा इशारा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढताहेत. त्यासोबतच मृतांचा आकडादेखील सातत्याने 3500च्या वर आहे. त्यातच आता केंद्र सरकारच्या मुख्य वैद्यकीय सल्लागारांनी देशात कोरोनाची तिसरी लाट अटळ असल्याचा इशारा दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला. यापासून बचावासाठी देशातील आरोग्य व्यवस्था अजून सक्षम करण्याची गरजही त्यांनी या वेळी अधोरेखित केली …
Read More »मराठा आरक्षण रद्द
सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णयराज्य सरकार बाजू मांडण्यात अपयशी नवी दिल्ली ः वृत्तसंस्थामराठा समाजाला शैक्षणिक प्रवेश व नोकर्यांमध्ये दिलेल्या आरक्षणाला आव्हान देणार्या याचिकांवर बुधवारी (दि. 5) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. या वेळी मराठा आरक्षण अवैध असल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय सुनावला आहे. या निर्णयामुळे राज्य सरकारला …
Read More »परदेशी खेळाडूंना घरवापसीची ओढ
बीसीसीआय करणार चार्टर्ड फ्लाइटची सोय नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाआयपीएलचे 14वे पर्व अनिश्चित काळासाठी स्थगित केल्यानंतर परदेशी खेळाडूंना घरवापसीची ओढ लागली आहे, पण काही देशांनी भारतातून येणार्या विमानसेवा रद्द केल्याने मायदेशात कसे जायचे, असा प्रश्न अनेकांना सतावत आहे. ऑस्ट्रेलिया सरकारने 15 मेपर्यंत भारतातील विमानसेवा बंद केल्या आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियन खेळाडू भारतात …
Read More »‘रेमडेसिवीर’च्या उत्पादनाला वेग
केंद्रीय राज्यमंत्री मनसुख मांडवीय यांची माहिती नवी दिल्ली ः वृत्तसंस्था देशात कोरोनाचा कहर सुरूच आहे. देशभरात अनेक ठिकाणी वैद्यकीय सुविधा तसेच औषधांची कमतरता भासू लागली आहे. अनेक ठिकाणी रेमडेसिवीर या कोरोनाच्या उपचारासाठी महत्त्वाच्या मानल्या जाणार्या औषधाचा तुटवडाही भासू लागला आहे. अशातच आता भारतातील रेमडेसिवीरचे उत्पादन वेगाने वाढवले असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री …
Read More »ममतांना निवडणूक आयोगाचा झटका
पुन्हा मतमोजणीची मागणी फेटाळली नंदीग्राम ः वृत्तसंस्था पश्चिम बंगालच्या नंदीग्राममध्ये झालेल्या पराभवानंतर टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी यांना पुन्हा एकदा मोठा झटका बसला आहे. आपले पूर्वीचे सहकारी शुभेंदू अधिकारी यांच्यासोबत झालेल्या अटीतटीच्या लढतीतील पराभवानंतर पुन्हा मतमोजणी करण्याची त्यांची मागणी फेटाळण्यात आली आहे. यासंदर्भात बोलताना निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, रिटर्निंग ऑफिसरचा …
Read More »कोरोनामुळे आयपीएल स्थगित
नवी दिल्ली ः वृत्तसंस्थादेशात सध्या कोरोनाच्या दुसर्या लाटेने थैमान घातले असताना आयपीएललाही त्याचा फटका बसला आहे. त्यामुळे या स्पर्धेचा 14वा हंगाम स्थगित करण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मंगळवारी (दि. 4) घेतला. बीसीसीआयचे राजीव शुक्ला यांनी याबाबतची माहिती दिली.कोलकाता नाइट रायडर्स संघाच्या दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचे सोमवारी समोर …
Read More »आयपीएलमध्ये कोरोनाची एण्ट्री
कोलकाता संघाच्या दोन खेळाडूंना लागण बंगळुरू ः वृत्तसंस्थाआयपीएलमधील संघ कोलकाता नाइट राइडर्सचे खेळाडू वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरीयर या दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कोलकाता आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सोमवारी (दि. 3) होणारा सामना रद्द करून पुढे ढकलण्यात आला आहे. आयपीएलमध्ये खेळाडूंना बायो बबलचे सुरक्षाकवच आहे, तसेच कडक …
Read More »महाविकास आघाडीला पंढरपूरमध्ये दे धक्का!; भाजपचे समाधान आवताडे विजयी
पंढरपूर ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडीकडून प्रतिष्ठेच्या करण्यात आलेल्या पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजपने बाजी मारली आहे. भाजपचे समाधान आवताडे यांनी राष्ट्रवादीचे भगिरथ भालके यांचा 3716 मतांनी पराभव करीत हा मतदारसंघ भालके यांच्या ताब्यातून हिसकावून घेतला आहे. गेली 11 वर्षे भगिरथ यांचे वडील आमदार भारत भालके या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करीत …
Read More »आसाम, पुद्दुचेरीत भाजपची बाजी; प. बंगाल तृणमूल काँग्रेसकडे, केरळमध्ये एलडीएफ, तर तामिळनाडूत द्रमुकला सत्ता
नवी दिल्ली ः देशात चार राज्ये आणि एक केंद्रशासित प्रदेश अशा पाच ठिकाणी झालेल्या विधानसभा निवडणुकीत आसामसह पुद्दुचेरीत भारतीय जनता पक्षाने विजय मिळविला आहे. पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये अनुक्रमे तृणमूल काँग्रेस आणि डावी लोकशाही आघाडीने (एलडीएफ) सत्ता राखली, तर तामिळनाडूत द्रमुकने बहुमत प्राप्त केले आहे. रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरू होती. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper