Breaking News

देश-विदेश

These are all news about national-international

गुजरातमध्ये भाजपचा ऐतिहासिक विजय

अहमदाबाद : वृत्तसंस्था संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल गुरुवारी (दि. 8) जाहीर झाला. भाजपने ऐतिहासिक कामगिरी केली असून 184 पैकी 156 जागा जिंकल्या आहेत. गुजरातमध्ये सलग सातव्यांदा भाजपचे सरकार आले आहे. काँग्रेसचा मात्र दारुण पराभव झाला आहे. काँग्रेसला केवळ 17 जागांवर विजय मिळवता आला आहे. दुसरीकडे आक्रमक …

Read More »

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन

पुणे ः प्रतिनिधी आपल्या अभिनयाची वेगळी छाप उमटविणारे दिग्गज अभिनेते विक्रम गोखले यांचे शनिवारी (दि. 26) निधन झाले. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी शेवटचा श्वास घेतला. ते 76 वर्षांचे होते. वयोपरत्वे प्रकृती खालवल्याने गेले पंधरा दिवस ते रुग्णालयात उपचार घेत होते. अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. रंगभूमी, चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिका …

Read More »

पंतप्रधान मोदींकडून 71 हजार जणांना नोकरीची नियुक्तीपत्रे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (दि. 22) रोजगार मेळाव्यांतर्गत तब्बल 71 हजार तरुणांना नियुक्तीपत्र दिले. शिक्षक, प्राध्यापक, डॉक्टर, नर्स, नर्सिंग ऑफिसर, फार्मासिस्ट्स, रेडिओग्राफर्स अशा अनेक तांत्रिक आणि पॅरामेडिकल पदासाठी ही नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींनी नियुक्तीपत्रे देण्यात आलेल्या तरुणांशी संवादही साधला. तरुणाईच्या …

Read More »

अभिमानास्पद! जी-20 गटाचे भारताकडे अध्यक्षपद

बाली : इंडोनेशियातील बाली येथे आयोजित जी-20 गटाच्या दोन दिवसीय शिखर परिषदेची बुधवारी (दि. 16) सांगता झाली. सदस्य देशांनी संयुक्त जाहीरनाम्याला अंतिम रूप दिल्यानंतर इंडोनेशियाकडून आगामी वर्षासाठी जी-20चे अध्यक्षपद भारताकडे सुपूर्द करण्यात आले. इंडोनेशियाचे अध्यक्ष जोको विडोडो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पुढील वर्षाच्या जी-20 परिषदेचे अध्यक्षपद सोपविलेे. यानंतर पंतप्रधान …

Read More »

दिल्ली उच्च न्यायालयाने ठाकरे गटाची याचिका फेटाळली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था दिल्ली उच्च न्यायालयाने ठाकरे गटाची याचिका फेटाळली असून आणखी एक धक्का दिला आहे. ठाकरे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पक्षाचे नाव व निवडणूक चिन्ह गोठविण्याच्या निर्णयाविरोधात दिल्ली हायकोर्टात धाव घेत आव्हान दिले होते, मात्र हायकोर्टाने ही याचिका फेटाळून लावली. त्याचप्रमाणे निवडणूक आयोगाला या संबंधी तातडीने निर्णय घेण्याचे …

Read More »

‘काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचार आणि विकासकामांमध्ये अडथळा

पंतप्रधान मोदींनी तोफ डागली कांगडा (हिमाचल प्रदेश) : वृत्तसंस्था काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचार, काँग्रेस म्हणजे विकासातील अडथळा. असे सरकार कधीच विकास करू शकणार नाही, अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (दि. 9) केली. ते हिमाचल प्रदेशच्या कांगडा येथील चंबी मैदानात आयोजित निवडणूक सभेत बोलत होते. या वेळी त्यांनी भाजपच्या …

Read More »

आर्थिक दुर्बलांना 10 टक्के आरक्षण

सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल मोदी सरकारच्या घटनादुरुस्तीवर शिक्कामोर्तब नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील आर्थिक दुर्बल घटकांच्या (ईडब्ल्यूएस) 10 टक्के आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. मोदी सरकारने 103वी घटनादुरुस्ती करून घेतलेल्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी (दि. 7) शिक्कामोर्तब केले. त्यामुळे आर्थिक दुर्बलांना सरकारी नोकरी आणि महाविद्यालयातील प्रवेशासाठी 10 टक्के आरक्षण मिळणार …

Read More »

पंतप्रधानांकडून मोरबी दुर्घटनास्थळाची पाहणी

मोरबी : वृत्तसंस्था गुजरातच्या मोरबी येथील मच्छू नदीवर असलेला 100 वर्षे जुना झुलता पूल कोसळल्याची घटना रविवारी संध्याकाळच्या सुमारास घडली होती. या घटनेत 130पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, या ठिकाणी पंतप्रधान मोदी यांनी मंगळवारी (दि. 1) भेट देत पाहणी केली. पंतप्रधान मोदी तीन दिवसांच्या गुजरात दौर्‍यावर आहेत. त्यांनी सोमवारी …

Read More »

गुजरातमधील पूल दुर्घटनेस तरुणांची हुल्लडबाजी कारणीभूत?

व्हिडीओ व्हायरल अहमदाबाद : वृत्तसंस्था गुजरातमधील मोरबी येथील मच्छू नदीवर असलेला 100 वर्षे जुना झुलता पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 140 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेनंतर संपूर्ण देशभरातून शोक व्यक्त होत आहे. दरम्यान, पूल कोसळतानाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून यामध्ये काही तरुण पुलावर उड्या मारताना दिसत आहेत. या …

Read More »

एक देश-एक पोलीस गणवेश

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे राज्यांना आवाहन नवी दिल्ली : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील पोलिसांच्या गणवेशावर भाष्य केले आहे. एक देश-एक पोलीस गणवेश या संकल्पनेवर राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी सकारात्मक चर्चा करावी, असे आवाहन पंतप्रधान मोदींनी शुक्रवारी (दि. 28) केले. ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून विविध राज्यांच्या गृहमंत्र्यांच्या चिंतन शिबिराला संबोधित …

Read More »