Breaking News

देश-विदेश

These are all news about national-international

दिल्ली उच्च न्यायालयाने ठाकरे गटाची याचिका फेटाळली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था दिल्ली उच्च न्यायालयाने ठाकरे गटाची याचिका फेटाळली असून आणखी एक धक्का दिला आहे. ठाकरे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पक्षाचे नाव व निवडणूक चिन्ह गोठविण्याच्या निर्णयाविरोधात दिल्ली हायकोर्टात धाव घेत आव्हान दिले होते, मात्र हायकोर्टाने ही याचिका फेटाळून लावली. त्याचप्रमाणे निवडणूक आयोगाला या संबंधी तातडीने निर्णय घेण्याचे …

Read More »

‘काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचार आणि विकासकामांमध्ये अडथळा

पंतप्रधान मोदींनी तोफ डागली कांगडा (हिमाचल प्रदेश) : वृत्तसंस्था काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचार, काँग्रेस म्हणजे विकासातील अडथळा. असे सरकार कधीच विकास करू शकणार नाही, अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (दि. 9) केली. ते हिमाचल प्रदेशच्या कांगडा येथील चंबी मैदानात आयोजित निवडणूक सभेत बोलत होते. या वेळी त्यांनी भाजपच्या …

Read More »

आर्थिक दुर्बलांना 10 टक्के आरक्षण

सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल मोदी सरकारच्या घटनादुरुस्तीवर शिक्कामोर्तब नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील आर्थिक दुर्बल घटकांच्या (ईडब्ल्यूएस) 10 टक्के आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. मोदी सरकारने 103वी घटनादुरुस्ती करून घेतलेल्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी (दि. 7) शिक्कामोर्तब केले. त्यामुळे आर्थिक दुर्बलांना सरकारी नोकरी आणि महाविद्यालयातील प्रवेशासाठी 10 टक्के आरक्षण मिळणार …

Read More »

पंतप्रधानांकडून मोरबी दुर्घटनास्थळाची पाहणी

मोरबी : वृत्तसंस्था गुजरातच्या मोरबी येथील मच्छू नदीवर असलेला 100 वर्षे जुना झुलता पूल कोसळल्याची घटना रविवारी संध्याकाळच्या सुमारास घडली होती. या घटनेत 130पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, या ठिकाणी पंतप्रधान मोदी यांनी मंगळवारी (दि. 1) भेट देत पाहणी केली. पंतप्रधान मोदी तीन दिवसांच्या गुजरात दौर्‍यावर आहेत. त्यांनी सोमवारी …

Read More »

गुजरातमधील पूल दुर्घटनेस तरुणांची हुल्लडबाजी कारणीभूत?

व्हिडीओ व्हायरल अहमदाबाद : वृत्तसंस्था गुजरातमधील मोरबी येथील मच्छू नदीवर असलेला 100 वर्षे जुना झुलता पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 140 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेनंतर संपूर्ण देशभरातून शोक व्यक्त होत आहे. दरम्यान, पूल कोसळतानाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून यामध्ये काही तरुण पुलावर उड्या मारताना दिसत आहेत. या …

Read More »

एक देश-एक पोलीस गणवेश

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे राज्यांना आवाहन नवी दिल्ली : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील पोलिसांच्या गणवेशावर भाष्य केले आहे. एक देश-एक पोलीस गणवेश या संकल्पनेवर राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी सकारात्मक चर्चा करावी, असे आवाहन पंतप्रधान मोदींनी शुक्रवारी (दि. 28) केले. ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून विविध राज्यांच्या गृहमंत्र्यांच्या चिंतन शिबिराला संबोधित …

Read More »

मोदी सरकार करणार 10 लाख रिक्त जागांसाठी महाभरती

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी (दि. 22) सकाळी 11 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे रोजगार मेळाव्याचे उद्घाटन करणार आहेत. या मेळाव्यात 10 लाख लोकांना रोजगार मिळणार आहे. मेळाव्यादरम्यान नव्याने भरती झालेल्या 75 हजार लोकांना नियुक्ती पत्र देण्यात येणार आहे. युवकांना रोजगार पुरवण्यासाठी पंतप्रधानांनी दिलेलं वचन पूर्ण करण्यासंदर्भात हे एक महत्त्वाचं …

Read More »

शिवसेनेला मोठा धक्का! धनुष्यबाण चिन्ह गोठविले 

नवी दिल्ली ः शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला आतापर्यंतचा सर्वांत मोठा धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे पक्षचिन्ह गोठविले आहे. एवढेच नव्हे; तर शिवसेना पक्षाचे नावदेखील त्यांना वापरता येणार नाही. दुसरीकडे मुख्यमंंत्री एकनाथ शिंदे गटासाठी ही जमेची बाब ठरणार आहे. शिवसेनेत उभी उभी फूट पडल्यानंतर पक्षाच्या धनुष्यबाण चिन्हावर शिंदे …

Read More »

अज्ञानी पर्यटक आणि उपेक्षित ठिकाणे

’केल्याने देशाटन’ हा एक कार्यक्रम आमच्या लहानपणी दुरदर्शनवर लागत असे. या कार्यक्रमात उपेक्षित असलेली पर्यटन स्थळे प्रकाशात आणली जात असत. पर्यटकांना काय वेगळ पहायला मिळेल आणि शिकायला मिळेल याचा चांगला उद्देश यातून साध्य व्हायचा, मात्र आजच्या चॅनलमधील स्पर्धा आणि मालिकांची लोकप्रियता पाहता असे कार्यक्रम मागे पडू लागले आहेत. त्यामुळे नवनवीन …

Read More »

देशात सुपरफास्ट 5जी इंटरनेट सेवेचा शुभारंभ

भारताने नवा इतिहास रचला -पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्ली ः वृत्तसंस्था 21व्या शतकातील भारतासाठी 1 ऑक्टोबर 2022 हा ऐतिहासिक दिवस आहे. 5जी तंत्रज्ञान दूरसंचार क्षेत्रात क्रांती घडवून आणेल. नवा भारत हा फक्त तंत्रज्ञानाचा ग्राहक राहणार नाही, तर त्या तंत्रज्ञानाच्या विकासात आणि अंमलबजावणीत सक्रिय भूमिका बजावेल. 2जी, 3जी, 4जीच्या काळात भारत …

Read More »