Breaking News

मुंबई – नवी मुंबई

नवी मुंबईत वायू प्रदूषण वाढतेय

विविध उपाययोजनेसंदर्भात आयुक्तांकडे मागणी नवी मुंबई : बातमीदार शहरातील वायू प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे. हवेची गुणवत्ता ढासळत असल्याने नागरिकांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते सुधीर पाटील यांनी आयुक्तांकडे प्रदूषणासंबंधी तक्रार करत काही उपाययोजना सुचवल्या आहेत. यात महत्त्वाची बाबत म्हणजे रस्त्यावर साचलेली धूळ काढण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर …

Read More »

नवी मुंबई ते मुंबई आता फक्त 50 मिनिटांत

बेलापूर-गेटवे वॉटर टॅक्सी सेवा सुरू नवी मुंबई : प्रतिनिधी बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया दरम्यान वॉटर टॅक्सी सेवेचे शुभारंभ मंत्री, बंदरे व खनिजकर्म, महाराष्ट्र राज्य दादा भुसे यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी व्यासपीठावर स्थानिक आमदार मंदाताई म्हात्रे, ट्रान्सपोर्ट आणि पोर्ट प्रधान सचिव पराग जैन, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड सीईओ …

Read More »

बेलापूरमध्ये महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेचे कार्ड वाटप

नवी मुंबई : बातमीदार भाजप उत्तर भारतीय नवी मुंबई अध्यक्ष राजेश राय यांचा वाढदिवस अलबेला हनुमान मंदिर बेलापूर येथे दरवर्षी प्रमाणे सामाजिक कार्य करताना उत्साहात साजरा करण्यात आला, त्यामध्ये बेलापूरच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्यासह भाजपच्या सर्व वरिष्ठ पदाधिकार्‍यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. या वेळी नागरिकांना महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेचे कार्ड …

Read More »

काँक्रीट प्लांटमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

प्लांट बंद करा; अन्यथा आंदोलन करण्याचा नवी मुंबई भाजपचा इशारा नवी मुंबई : बातमीदार तुर्भे रेल्वे वॉर्डमध्ये कोणतीही कायदेशीर परवानगी न घेता कॉक्रीट प्लांट सुरू असून यामधून होणारे ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषण यामुळे या परिसरामध्ये राहणार्‍या रहिवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे नवी मुंबई भाजप जिल्हा उपाध्यक्ष संकेत …

Read More »

नवी मुंबईच्या उद्यान विभागाला कारणे दाखवा नोटीस बजावा

भाजपच्या दशरथ भगत यांची मागणी नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई शहरातील उद्याने ओसाड करून त्याप्रती नागरिकांच्या भावना भडकविणार्‍या महापालिकेच्या उद्यान विभागाला कारणे दाखवा नोटीस बजावा ह्या मागणीसाठी माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांनी नागरिकांच्या शिष्टमंडळासह एनआरआय पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम जगदाळे साहेब यांची भेट घेतली. नवी …

Read More »

दिघा रेल्वे स्थानकाचे लवकरच उद्घाटन

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त ठाणे-वाशी-पनवेल ट्रान्स हार्बर मार्गावरील प्रस्तावित दिघा रेल्वे स्थानकाचे काम पुर्णत्साव आले आहे. दिघा रेल्वे स्थानकाचे काम पूर्ण झाल्यानंतर रेल्वेचा थांबा व वेळापत्रक नियोजनाकरीता एमआरव्हीसीने रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव पाठविला असून येत्या 15 दिवसांत मंजुरी मिळणार आहे. त्यामुळे नवी मुंबई व ठाणेकरांसाठी वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा दिघा …

Read More »

बदलत्या हवामानामुळे आजारपण वाढले

नवी मुंबईत सर्दी ताप, खोकल्याचे रुग्ण सर्वाधिक नवी मुंबई : रामप्रहर वृत्त शहरात बदलत्या हवामानामुळे आजाराचे प्रमाण वाढले आहे.  त्यामुळे शहरात मध्यवर्ती असलेल्या वाशी पालिका रुग्णालयातही बाह्यरुग्णसेवेत वाढ झाल्याची माहिती पालिका रुग्णालयांच्या डॉक्टरांनी दिली आहे. मागील काही दिवसापासून सतत होणार्‍या हवामानातील बदलामुळे शहरात ताप व सर्दी खोकल्याचे रुग्ण वाढल्याचे चित्र …

Read More »

शिक्षक मतदारसंघाची गुरुवारी मतमोजणी

नवी मुंबई : कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाची मतमोजणी गुरुवारी (दि. 2) सकाळी नेरूळ सेक्टर 24मधील आगरी-कोळी सांस्कृतिक भवनमध्ये होणार आहे. या मतमोजणीसाठी आगरी-कोळी सांस्कृतिक भवनसमोरील रोडवर दोन्ही बाजूला बॅरिकेटिंग करून मतमोजणीच्या परिसरात सर्व प्रकारच्या वाहनास प्रवेश बंदी करण्यात आली असल्याबाबतची अधिसूचना नवी मुंबई वाहतूक विभागाने जारी केली आहे. कोकण विभाग …

Read More »

नवी मुंबई फेस्टमधून एकात्मतेचा संदेश

लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले कौतुक नवी मुंबई : रामप्रहर वृत्त वर्ल्ड कल्चरल डेव्हलपमेंट फाऊंडेशनतर्फे नवी मुंबई फेस्ट 2023या सामाजिक-सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. 21 जानेवारीपासून या कार्यक्रमाची सुरुवात झाली असून 29 जानेवारीपर्यंत हा फेस्ट झाला. या फेस्ट ला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रविवारी (दि. 29) सदिच्छा …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 फेब्रुवारीला मुंबईत

मुंबई : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 फेब्रुवारी रोजी मुंबई दौर्‍यावर येणार आहेत. अंधेरी पूर्वमधील मरोळ बोहरा कॉलनीत बोहरा मुस्लीम समाजाकडून उभारण्यात आलेला अल जमिया तस सैफिया विद्यापीठाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या ठिकाणी आतापासूनच मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. महिनाभरातील पंतप्रधान मोदींचा हा दुसरा …

Read More »