Breaking News

मुंबई – नवी मुंबई

‘मेट्रो’बाबत लपूनछपून मुलाखती देऊ नका आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना टोला

मुंबई ः प्रतिनिधी मेट्रो कारशेडवरून भाजपने शिवसेनेवर कडक शब्दांत हल्ला चढविला आहे. केंद्र सरकारचे आदेश धुडकावून मेट्रो कारशेड कांजूरमार्गलाच बांधण्याची घोषणा शिवसेनेने केली आहे. त्याबाबतचा आरेचा निर्णय रद्द केल्याने भाजप आता जनहितासाठी आक्रमक झाला आहे. भाजपचे नेते आशिष शेलार यांनी या विषयावर थेट चर्चा करण्याचे आव्हान आदित्य ठाकरे यांना दिले …

Read More »

ठाकरे सरकारला ‘सर्वोच्च’ झटका; अर्णब गोस्वामींना दिलासा; विधिमंडळ सचिवांना बजावली नोटीस

मुंबई ः प्रतिनिधी राज्यातील ठाकरे सरकारला सर्वोच्च न्यायालयाने जोरदार झटका दिला आहे. महाराष्ट्र विधानसभेत दाखल करण्यात आलेल्या विशेषाधिकार हनन प्रकरणात रिपब्लिकन टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेस सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. एवढेच नव्हे तर या प्रकरणात न्यायालयाने विधानसभा सचिवांना कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे. या नोटिशीला उत्तर देण्यासाठी न्यायालयाने …

Read More »

नियमांचे पालन करण्यासाठी सिनेमागृहे सुरू होण्यास विलंब

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त अनलॉक संदर्भातील नवीन नियमावली जाहीर करताना राज्य शासनाच्या माध्यमातून नाट्यगृहे, सिनेमागृहे आणि मल्टिप्लेक्स नियमांचे पालन करून सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. परंतु नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी नियोजन करावे लागणार असून, त्यासाठी काही दिवसांचा अवधी लागणार आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या परवानगीनंतरदेखील गुरुवारी (दि. 5) नवी मुंबईतील …

Read More »

नवी मुंबई पालिकेत कोरोना लशीची लगबग

यादी तयार करण्याचे काम सुरू नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोरोना लस दृष्टिक्षेपात येत असल्याने ती देण्याचा प्राधान्यक्रम ठरविण्याचे काम पालिका पातळीवर सुरू झाले असून आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्‍यांना प्रथम लस दिली जाणार आहे. त्यासाठी त्यांची यादी तयार करण्याचे काम प्रशासनाने सुरू केले आहे. नवी मुंबई पालिकेच्या आरोग्य …

Read More »

ज्येष्ठांसाठी धोका कायम

नवी मुंबईत कोरोना मृतांमध्ये वृद्धांचे प्रमाण सर्वाधिक नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी ज्येष्ठ नागरिकांचा धोका अद्याप टळलेला नाही. मार्चपासून आतापर्यंत तब्बल 5,556 ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आतापर्यंत 486 ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाला असून, कोरोनाबळींमध्ये 53.23 टक्के ज्येष्ठ नागरिक आहेत. तसेच 4,705 …

Read More »

हँल्डिंग पौंडच्या स्वच्छतेसाठी भाजप नगरसेवकाचा पुढाकार

नवी मुंबई : बातमीदार शहरातील होल्डिंग पौंडच्या स्वच्छतेचा विषय यंदाच्या पावसाळ्यामूळे चर्चेत आला आहे. सीबीडी बेलापूर येथील कांदळवने गाळ व इतर रानटी वनस्तपतींमुळे भरलेल्या हँल्डिंग पौंडचा फटका यंदा सीबीडीतील हजारो नागरिकांना बसला असून हे होल्डिंग पौंड स्वच्छ करण्याची मागणी वाढू लागली आहे. यातच होल्डिंग पौंडच्या स्वच्छतेविषयी सातत्याने मागणी करणार्‍या स्थानिक …

Read More »

अर्णब गोस्वामी यांच्या जामीन अर्जावर आज पुन्हा सुनावणी

मुंबई : प्रतिनिधी अलिबागमधील वास्तुविशारद अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले रिपब्लिकन टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना जामिनाचा अंतरिम दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. गोस्वामी यांच्या जामीन अर्जावर शुक्रवारी (दि. 6) दुपारी 3 वाजता पुन्हा सुनावणी घेण्यात येणार आहे. रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यासह आयकास्ट स्लॉशस्काय …

Read More »

राज्यातील चित्रपटगृहे, मल्टिप्लेक्स, नाट्यगृहे आजपासून सुरू

मुंबई : राज्यातील चित्रपटगृहे, मल्टिप्लेक्स आणि नाट्यगृहे 50 टक्के क्षमतेसह गुरुवार (दि. 5)पासून सुरू होणार आहेत. कोरोना प्रतिबंधित क्षेत्र अर्थात कंटेन्मेंट झोनबाहेर असलेल्या सगळ्या थिएटर्स, मल्टिप्लेक्स आणि नाट्यगृहांना परवानगी देण्यात आली आहे. कंटेन्मेंट झोन वगळता तरण तलाव उघडण्यास तसेच योगा इन्स्टिट्यूट आणि इन डोअर स्पोर्ट्सनाही संमती देण्यात आली आहे. राज्य …

Read More »

‘लटकवा, अटकवा अन् भटकवा, हीच तिघाडी सरकारची कार्यपद्धती’

’मेट्रो’वरून भाजपचा टोला मुंबई : प्रतिनिधी ठाकरे सरकारने आरेमधीलमेट्रो कारशेड कांजूरमार्गमध्ये स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर एमएमआरडीएपे कांजूरमार्गमध्ये कामाला सुरुवात केली. मात्र आता केंद्राने कांजूरमार्गमधील जागेवर दावा सांगितला आहे. तसे पत्र केंद्राच्या उद्योग आणि व्यापार संवर्धन विभागाने (डीपीआयआयटी) राज्य सरकारला पाठवले आहे. यावरून भाजपने ठाकरे सरकारवर टीका केली आहे. प्रकल्प …

Read More »

अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यासाठी ‘मातोश्री’वर मशाल मोर्चा

मुंबई : मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदावरून अशोक चव्हाण यांना हटवा या मागणीसाठी येत्या शनिवारी म्हणजेच 7 नोव्हेंबरला मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हा मशाल मोर्चा शनिवारी संध्याकाळी 6 वाजता वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालय ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्री बंगल्यापर्यंत काढण्यात येणार आहे. या मोर्चाचे आयोजन मराठा …

Read More »