Breaking News

मुंबई – नवी मुंबई

आ. मंदा म्हात्रेंच्या प्रयत्नाने उभारण्यात आलेल्या दिवाळेतील फगवाले जेट्टीचे लोकार्पण

नवी मुंबई : बातमीदार बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या प्रयत्नाने आमदार निधीतून उभारण्यात आलेल्या दिवाळे गावातील फगवाले जेट्टीचा उद्घाटन सोहळा भारतीय जनता पक्षाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांच्या हस्ते बुधवारी (दि. 11) झाला. या वेळी जेट्टीच्या कामास 65 लाख रुपये इतका खर्च झाला असून पुढील रेलिंगच्या कामांसही …

Read More »

बँड आणि बँजो पथकांची उपासमार; नवी मुंबईतील वाजंत्र्यांचे आठ महिन्यांत 10 कोटींचे नुकसान

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त जगभरात सुरू असलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावाने अनेक गोष्टींना आळा बसला आहे. लग्न, उत्सव, वाढदिवस, स्नेहसंमेलन आदी कार्यक्रमांना वाद्य वाजविण्यास सरकारने अद्याप परवानगी न दिल्यामुळे नवी मुंबईतील 23 बँड पथके आणि 70 बँजो पथकांवर उपासमारीची वेळ आली आहे. गेल्या आठ महिन्यांत त्यांचे आठ ते 10 कोटी रुपयांचे …

Read More »

फटाके विक्रीस तूर्त मोकळीक; नवी मुंबईतील गर्दीवर मात्र दक्षता पथकांची नजर

नवी मुंबई ः प्रतिनिधी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने फटाके फोडण्यास मज्जाव केला असला तरी नवी मुंबईत अद्याप अशा प्रकारचा कोणताही निर्णय झाला नाही, मात्र बंदी नसली तरी प्रदूषण टाळण्यासाठी पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. कोरोनाचा आजार श्वसनाशी संबंधित असल्यामुळे अशा रुग्णांना फटाक्यांच्या प्रदूषणाचा त्रास …

Read More »

…तर रस्त्यावरील लढाई तीव्र करू!

ओबीसी गोलमेज परिषदेचा राज्य सरकारला इशारा मुंबई : प्रतिनिधीमराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये या प्रमुख मागणीसह अन्य मुद्द्यांवर मुंबईतील मराठी पत्रकार संघात मंगळवारी (दि. 10) गोलमेज परिषद झाली. या परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी पत्र लिहिणार्‍या आमदार संजय शिंदे यांचा …

Read More »

सिडकोच्या पोलीस गृहनिर्माण योजनेची आज सोडत

नवी मुंबई ः सिडको वृत्तसेवा – सिडको महामंडळातर्फे पोलीस कर्मचार्‍यांकरिता विशेष गृहनिर्माण योजनेंतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेल्या 4,466 घरांची संगणकीय सोडत मंगळवारी (दि. 10) सिडको सभागृह येथे दुपारी 12 वाजता काढण्यात येणार आहे. सिडको महामंडळातर्फे पोलीस कर्मचार्‍यांकरिता एका विशेष गृहनिर्माण योजनेचा प्रारंभ 27 जुलै रोजी करण्यात येऊन त्या अंतर्गत 4,466 …

Read More »

ऐरोलीतील तरुणांना मिळाले हक्काचे मैदान

नवी मुंबई ः बातमीदार – गेल्या काही दिवसांपासून सेक्टर 20मधील खेळाडूंना शनी मंदिरासमोर हायटेन्शन खाली मोकळ्या भूखंडाचा एकमेव आधार असून या मैदानावर खेळण्यासाठी अनेक जण येतात, मात्र काही दिवसांपासून या मैदानावर गवत वाढल्याने खेळाडूंना खेळता येत नव्हते. गवत वाढल्याने सरपटणार्‍या प्राण्यांचा वावर असण्याची शक्यता निर्माण झाली होती. ही बाब नागरिकांनी …

Read More »

कोरोना काळात सुरक्षित दिवाळी साजरी करा -माजी खासदार संजीव नाईक

नवी मुंबई : बातमीदार – सध्या कोरोनाची महामारी सुरू असल्याने नागरिकांनी ही दिवाळी सुरक्षा बाळगून व स्वतःची काळजी घेऊनच साजरी करावी, असे आवाहन माजी खासदार संजीव नाईक यांनी केले आहे. भाजप व शिवराजे मित्र मंडळाचे अध्यक्ष परशुराम ठाकूर व समाजसेवक केशव ठाकूर यांच्याकडून दिवाळीनिमित्त स्वस्त दरात दिवाळी फराळ साहित्याचे वाटप …

Read More »

आचारसंहिता लागेपर्यंत नागरी कामांसाठी कटिबद्ध

आमदार गणेश नाईक यांची ग्वाही नवी मुंबई ः बातमीदार – महापालिकेकडून बेलापूर येथील माताबाल रुग्णालयात कोविड रुग्णालय सुरू करण्यात येणार असल्याचे समजते, परंतु सदर रुग्णालयात कोविड रुग्णालय सुरू केल्यास त्या ठिकाणी उपचार घेणार्‍या नागरिकांना अडचणीचे होईल. सोयीसुविधा नसल्यामुळे त्या ठिकाणी कोविड रुग्णालय सुरू करणे उचित होणार नाही. बेलापूर येथील माताबाल …

Read More »

मुख्यमंत्र्यांच्या पुन्हा ‘वाफा फ्रॉम होम’

भाजपचे अतुल भातखळकर यांचा टोला मुंबई : प्रतिनिधी कोणाचंही नाव न घेता महाराष्ट्र द्वेष्ट्यांचा कट उधळून लावला, अशी शेखी मुख्यमंत्र्यांनी मिरवणे म्हणजे शिखंडीच्या मागे लपून टीका करण्यासारखे आहे. अशा शब्दांमध्ये भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच, मुख्यमंत्र्यांच्या पुन्हा ‘वाफा फ्रॉम होम’ फुकटच्या टीमक्या.. …

Read More »

महाविकास आघाडीचे सरकार म्हणजे चलती का नाम गाडी; ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची टीका

मुंबई ः प्रतिनिधी महाविकास आघाडीचे सरकार म्हणजे चलती का नाम गाडी, थांबला तर खटारा, अशी टीका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली आहे. एका वृत्तवाहिनीशी ते बोलत होते. या वेळी त्यांनी आपल्या पुढील वाटचालीबद्दल माहिती दिली. अण्णा हजारे म्हणाले की, लोकपालनंतर लोकायुक्त कायदा तयार करायचा आहे. या कायद्याचा मसुदाही तयार …

Read More »