Breaking News

मुंबई – नवी मुंबई

नवी मुंबईमध्ये कोरोना चाचण्यांत वाढ

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त दिवाळीनंतर नवी मुंबईतही कोरोना रुग्णसंख्या पुन्हा वाढली आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी रुग्ण दुपटीचा कालावधी 352 दिवसांवर गेला होता. तो कमी झाला असून आता 265 दिवसांवर आला आहे. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणांवर लक्ष केंद्रीत करीत पालिका प्रशासनाने कोरोना चाचण्यांत वाढ केली आहे. दिवाळीपूर्वी शहरात करोना रुग्ण दुपटीचा कालावधी …

Read More »

चार राज्यांतून महाराष्ट्रात येणार्‍यांना ‘आरटी-पीसीआर’ अनिवार्य

मुंबई : वाढत्या कोरोना संक्रमित रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने मिशन बिगीन अगेन अंतर्गत नवे निर्देश जारी केले आहेत. त्यानुसार दिल्ली, राजस्थान, गुजरात व गोव्यातून येणार्‍या प्रवाशांना निगेटिव्ह आरटी-पीसीआर चाचणी अहवाल अनिवार्य करण्यात आले आहे. रस्ते महामार्गाने येणार्‍या प्रवाशांचा 96 तास आधी, तर विमानाने येणार्‍या प्रवाशांचा 72 तासांपूर्वी अहवाल निगेटिव्ह येणे …

Read More »

सानपाडा येथे बसला आग; एक जखमी; 35 प्रवासी बचावले

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त – पुण्याहून मुंबईला जाणार्‍या खासगी बसला आग लागल्याची घटना सानपाडा येथे घडली. कुरियरच्या कार्यालयासमोर बस थांबलेली असताना ही दुर्घटना घडली. यामध्ये एक जण जखमी झाला असून 35 प्रवासी थोडक्यात बचावले आहेत. सायन-पनवेल मार्गावर शनिवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास आकांक्षा टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्सची बस मुंबईच्या दिशेने …

Read More »

राज्यात पुन्हा निर्बंध?

आरोग्यमंत्र्यांचे संकेत मुंबई : प्रतिनिधीदिवाळीपूर्वी कमी झालेला कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढताना दिसत आहे. दिवसागणिक रुग्णसंख्या वाढत असून, दुसरी लाट येण्याची भीती गडद होत चालली आहे. मागील आठवड्यात राज्यातील रुग्णसंख्येने पाच हजारांच्या सरासरीने उसळी घेतल्याने राज्यात पुन्हा निर्बंध लागू करण्यात येण्याची शक्यता आहे. तसे संकेत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी …

Read More »

मराठा मोर्चाचा सरकारविरोधात एल्गार

नवी मुंबईतील चौकसभा, रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद नवी मुंबई ः बातमीदार  युती सरकारच्या काळात मराठा समाजाला मिळालेले आरक्षण सुप्रीम कोर्टात न टिकल्याने अखेर रद्द झाले आहे. त्याची झळ मराठा समाजातील तरुणांना बसणार आहे. विद्यमान मविआ सरकारला हे आरक्षण टिकवता न आल्याने मराठा समाजात असंतोष पसरला असून, सरकारविरोधातील रोष व्यक्त होत आहे. …

Read More »

आमदार रोहित पवारांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक

मुंबई ः प्रतिनिधीगेल्या काही वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने सौरऊर्जा, इथेनॉल यांसारख्या क्षेत्रांत केलेले काम  निश्चितच उल्लेखनीय आहे, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारचे कौतुक केले आहे.रोहित पवार यांनी या संदर्भात ट्विट केले आहे. ते म्हणाले की, गेल्या काही वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या …

Read More »

सोमवारपासून राज्यातील शाळा होणार सुरू; अनेक शिक्षकांना कोरोनाची लागण

मुंबई ः प्रतिनिधीमुंबईसह काही महापालिका वगळता राज्यातील शाळा सोमवार (दि. 23)पासून सुरू होणार आहेत. शाळा सुरू करण्यापूर्वी प्रत्येक जिल्ह्यामध्ये शिक्षकांच्या कोविड-19 चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये अनेक शिक्षकांना कोरोनाची लागणझाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे शाळा सुरू करण्याचा राज्य सरकारचा निर्णय कितपत योग्य असेल, असा सवाल पालक आणि विद्यार्थ्यांकडून विचारला जात …

Read More »

ज्वेल ऑफ नवी मुंबईत स्वच्छता मोहीम

नवी मुंबई ः बातमीदार नवी मुंबई महानगरपालिका स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिका, इनव्हरमेंट लाइफ संस्था, रॉबिन हूड आर्मी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ज्वेल ऑफ नवी मुंबई परिसरात रविवारी (दि. 22) स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या वेळी संस्थेचे सदस्य उपस्थित होते. या वेळी अनेक गोण्या कचरा गोळा करण्यात आला. …

Read More »

अवैध वाहनांवर नवी मुंबई आरटीओची कारवाई

नवी मुंबई : प्रतिनिधी वाशी उपप्रादेशिक कार्यालय क्षेत्रात अवैध प्रवासी वाहतूक करणार्‍या छोट्या वाहनांवर कारवाईचा बडगा उगारत 25 वाहनांवर कारवाई करण्यात आली. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सलग दोन दिवस ही कारवाई करण्यात आली. अवैध प्रवासी वाहतुकीमुळे एनएमएमटी व एसटी प्रशासनाला दररोज हजारो रुपयांचे नुकसान होत होते. महापे …

Read More »

मुख्यमंत्र्यांना बॉलीवूडची, तर चिरंजीवांना पब-बारची चिंता

भाजप नेते आशिष शेलारांचा निशाणा पुणे : प्रतिनिधीराज्यात अनलॉकच्या प्राधान्यक्रमावरून भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी शनिवारी (दि. 21) ठाकरे सरकारवर सडकून टीका केली. मुख्यमंत्र्यांना बॉलीवूड, तर त्यांच्या चिरंजीवांना पब-बारची चिंता जास्त आहे, असा आरोप शेलार यांनी केला.विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीच्या निमित्ताने आमदार शेलार पुण्यात आले होते. त्या …

Read More »