मुंबई : प्रतिनिधी महावितरण कंपनीच्या कर्मचार्यांनी विविध मुद्द्यांवर तीन दिवसांचा संप पुकारला होता. त्यामुळे राज्यातील काही ठिकाणी बुधवार (दि. 4)पासून बत्ती गूल झाली होती. राज्यातील जनतेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली. त्याला यश आले असून वीज कर्मचार्यांनी आपला संप मागे घेतला आहे. या संदर्भात …
Read More »नवी मुंबईच्या विकासात सर्वांचे योगदान -आमदार मंदा म्हात्रे
महानगरपालिकेचा वर्धापन दिन जल्लोषात साजरा नवी मुंबई ः बातमीदार नवी मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्या सभागृहाची सदस्य म्हणून काम करताना तेव्हाच्या मोजक्या आर्थिक बजेटमध्ये नागरिकांना उत्तम दर्जाच्या सुविधा पुरविण्याचा वसा 31 वर्ष कायम राखत आज नवी मुंबईला देशातील अग्रमानांकित शहर म्हणून नावाजले जात आहे याचा आनंद व्यक्त करीत बेलापूर विधानसभा सदस्य आमदार …
Read More »राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर
30 जानेवारीला मतदान, तर 2 फेब्रुवारीला मतमोजणी मुंबई : प्रतिनिधी राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. यामध्ये नाशिक व अमरावती विभाग पदवीधर, तर औरंगाबाद, नागपूर व कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. या निवडणुकीसाठी 30 जानेवारी 2023 रोजी मतदान होणार असून 2 फेब्रुवारीला मतमोजणी होणार …
Read More »वाडा-मनोर रस्त्याचे रुंदीकरण करावे; अधिवेशनात लक्षवेधी
नवी मुंबई : बातमीदार वाडा-मनोर रस्त्याचे रुंदीकरण करण्याची लक्षवेधी आमदार गणेश नाईक यांनी अधिवेशनात मांडली. वाडा मनोर हा रस्ता 64 किलोमीटरचा असून या रस्त्यावर अनेक अपघात झाले आहेत, 392 कोटी रुपयांना हा रास्ता बीओटी तत्वावर दिला होता परंतु आज त्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे आणि दुर्घटनेचे प्रमाणदेखील वाढले आहे आमदार …
Read More »नवी मुंबईत दीड टन प्लास्टिकचा साठा जप्त
नवी मुंबई : बातमीदार प्लास्टिकमुक्त नवी मुंबईचे ध्येय नजरेसमोर ठेवून नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्वच विभागांमध्ये प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहिमांना गती प्राप्त झालेली दिसत असून किरकोळ प्लास्टिक विक्रेत्यांप्रमाणेच प्रतिबंधात्मक प्लास्टिकच्या साठ्यांवर धडक कारवाई केली जात आहे. अशाच प्रकारची धडाकेबाज कारवाई तुर्भे एपीएमसी मार्केटमधील दोन दुकानांवर करीत त्या ठिकाणाहून 4 ते 5 ट्रक …
Read More »अमली पदार्थ तस्करीला आळा घालणार -भारंबे
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबईतील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याबरोबरच महिला, ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांसंदर्भातील गुन्हे, सायबर तसेच अमली पदार्थ तस्करीला आळा घालण्यासाठी प्राधान्य देणार असल्याचे मत नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी एका मुलाखतीमध्ये व्यक्त केले आहे. त्याशिवाय पोलीस आणि नागरिक यांच्यातील समन्वय वाढीवर भर देण्याचे …
Read More »गोवर रूबेला लसीकरणाला वेग
नवी मुंबईमध्ये पहिल्या फेरीत 10,568 बालकांना डोस नवी मुंबई : बातमीदार नमुंमपा टास्क फोर्सच्या 30 नोव्हेंबर व 13 डिसेंबरच्या विशेष बैठकीत महापालिका आयुक्तांनी मान्यता दिल्यानुसार शासनाच्या मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने नवीन उद्रेक सुरू झाल्यास नऊ महिने ते ते पाच वर्ष वयाच्या बालकांना गोवर रुबेलो लसीचा एक अतिरिक्त डोस तसेच सहा महिने …
Read More »कामगारांच्या प्रश्नावर शासन सकारात्मक
न्याय मिळेपर्यंत पाठपुरावा सुरूच राहील -आमदार गणेश नाईक नवी मुंबई : बातमीदार सिडको महामंडळाच्या बंद पडलेल्या बीएमटीसी परिवहन सेवेतील 1587 कामगारांना शासनाने मंजूर केल्याप्रमाणे शंभर 100 चौरस फूट क्षेत्रफळाच्या दुकानांच्या गाळ्याचे विनाविलंब तातडीने वितरण करावे, अशी मागणी आमदार गणेश नाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 23 …
Read More »नवी मुंबईत भिकार्यांचे प्रमाण वाढले
कारवाई करण्याची संघटनांकडून मागणी नवी मुंबई : रामप्रहर वृत्त सुनियोजित शहर म्हणून जगभरात प्रसिद्ध असणार्या नवी मुंबई शहरात कोविड काळानंतर अचानक भिकार्यांचे प्रमाण वाढले आहे. विशेष म्हणजे भिकार्यांमध्ये लहान बालकांचा समावेश अधिक असून नवी मुंबई शहरातील रेल्वेस्थानकांवर भीक मागण्याच्या नावाखाली प्रवासी आणि महिलांचा पाठलाग करण्यापर्यंत मजल गेली आहे. त्यामुळे अशा …
Read More »‘मविआ’च्या मोर्चात पैसे देऊन ‘भाडोत्री’ कार्यकर्ते;व्हिडीओ व्हायरल
मुंबई : प्रतिनिधी मुंबईत महाविकास आघाडीकडून शनिवारी (दि. 17) मोर्चा काढण्यात आला होता. ठाकरे गट शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे आघाडीतील मुख्य घटक पक्ष आणि इतर सहकारी पक्षांचा समावेश असलेल्या या मोर्चाला त्या तुलनेत तेवढा प्रतिसाद मिळू शकला नाही. या वेळी गर्दी जमविण्यासाठी पैसे देऊन भाडोत्री कार्यकर्ते आयात करण्यात …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper