गौरव प्रस्ताव नाकारल्याने राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी मुंबई : प्रतिनिधीराज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बुधवारी (दि. 26) विधिमंडळात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या गौरव प्रस्तावावरून खडाजंगी झाली. सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त राज्य सरकारने त्यांच्या गौरवाचा प्रस्ताव मांडावा, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली होती, मात्र विधानसभा अध्यक्षांनी हा प्रस्ताव नाकारला. त्यामुळे भाजपकडून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात …
Read More »मविआ सरकारकडून फसवणुकीची मालिका
देवेंद्र फडणवीस यांचा सत्ताधार्यांवर हल्लाबोल मुंबई : प्रतिनिधीमहाविकास आघाडी सरकारने दिलेले एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही. शेतकर्यांवर अन्याय आणि महिलांवर अत्याचार सुरूच आहेत, मात्र असंवेदनशील असलेल्या राज्य सरकारकडून फसवणुकीची मालिका सुरूच असून, याबाबत आम्ही सरकारला जाब विचारून अधिवेशनात धारेवर धरणार आहोत, असा निर्धार विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी …
Read More »राज्य सरकारमध्ये विसंवाद; देवेंद्र फडणवीस यांची टीका; चहापानावर विरोधकांचा बहिष्कार
मुंबई : प्रतिनिधी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महाविकास आघाडी सरकारने रविवारी (दि. 23) आयोजिलेल्या चहापानावर विरोधी पक्ष भाजपने बहिष्कार टाकला. ’सध्याच्या सरकारमधील पक्षांमध्ये आपसातच सुसंवाद नाही. ते बोलतात एक आणि करतात एक. त्यामुळे त्यांनी आधी आपसात संवाद साधावा. मग आम्हाला चहापान व सुसंवादासाठी बोलवावे,’ असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस …
Read More »पठाण हे औरंगजेबाचे ’वारिस’ : मुनगंटीवार
मुंबई : प्रतिनिधी देशातील हिंदूंविरोधात मुस्लिमांना चिथावणी देणारे एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण यांच्यावर भाजपचे नेते व माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जोरदार टीका केली आहे. वारिस पठाण हे औरंगजेबाचे ’वारिस’ झाले आहेत, असे मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. कर्नाटकातील गुलबर्गा येथील एका जाहीर सभेत वारिस पठाण यांनी हिंदू-मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण …
Read More »मराठा आरक्षणाबाबत ठाकरे सरकार संवेदनाहीन -दरेकर
मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षणाबाबत महाविकास आघाडी सरकार संवेदनाहीन आहे, अशी टीका भाजपचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. आझाद मैदानात 24 दिवसांपासून आंदोलक आंदोलन करीत असूनही त्यांना न्याय मिळत नाही. भाजपची सत्ता असताना राज्यात कुठेही आंदोलन झाल्यास त्याची त्वरित दखल घेऊन मार्ग काढला जात …
Read More »पवारांनी आयुष्यभर मतांच्या तुष्टीकरणाचे काम केले; सुधीर मुनगंटीवार यांचा घणाघात
मुंबई : प्रतिनिधी अयोध्येतील राम मंदिर ट्रस्टसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यावरून भाजप नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. आयुष्यभर शरद पवार यांनी मतांचे तुष्टीकरण करण्याचे काम केले. खुर्चीसाठी पक्ष फोडले, अशी घणाघाती टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली. तुम्ही तुमच्या पक्षाच्या वतीने …
Read More »ऐरोलीमध्ये शिवसेनेला खिंडार
शिवसेनेच्या जिल्हा संघटक, विभागप्रमुख यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश आमदार गणेश नाईक यांनी केले पक्षात स्वागत नवी मुंबई : बातमीदार : ऐरोली विभागामध्ये शिवसेनेला मोठे भगदाड पडले असून नवी मुंबई जिल्हा संघटक अॅड. संध्या सावंत आणि ऐरोली विभागप्रमुख कैलास सुकाळे यांच्यासह असंख्य शिवसैनिकांनी बुधवारी (दि. 19) आमदार गणेश नाईक यांच्या …
Read More »वृक्ष लागवड ईश्वरी काम; चौकशीस तयार -मुनगंटीवार
मुंबई : प्रतिनिधीदेवेंद्र फडणवीस सरकारच्या काळातील वृक्ष लागवडीची चौकशी करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. त्यावर वृक्ष लागवड हे ईश्वरी काम आहे, असे सांगत माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चौकशीस तयार असल्याचे म्हटले आहे. फडणवीस सरकारच्या काळात वृक्ष लागवड मोहीम हाती घेण्यात आली होती. राज्यातील सरकार बदलल्यानंतर विद्यमान वनमंत्री …
Read More »अनैसर्गिक सरकार टिकणार नाही
जे. पी. नड्डा यांचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल नवी मुंबई : बातमीदारमहाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे महाविकास आघाडी सरकार हे खुर्चीसाठी एकत्र आले आहे, मात्र हे अनैसर्गिक सरकार टिकणार नाही, असे सांगत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी राज्यातील महाविकास आघाडीवर रविवारी (दि. 16) जोरदार हल्लाबोल केला. ते पक्षाच्या …
Read More »भाजपने सांभाळले म्हणून ‘ते’ इथवर पोहोचले; भाजपचे नेते किरीट सोमय्या यांची शिवसेनेवर जहरी टीका
मुंबई : प्रतिनिधी भाजपने शिवसेनेला 35 वर्षे सांभाळलं म्हणून ’ते’ इथपर्यंत पोहचले असल्याची जहरी टीका भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. नवी मुंबईत आयोजित भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश राज्य परिषदेत ते बोलत होते. या वेळी सोमय्या यांनी आपल्या भाषणाची सुरवातच शिवसेनेवर टीका करून केली. तसेच ते पुढे म्हणाले की, …
Read More »