Breaking News

मुंबई – नवी मुंबई

एपीएमसी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा देणार!

सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांचे आश्वासन नवी मुंबई : रामप्रहर वृत्त वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती ही आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा देण्याचा मानस असल्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी (दि.29) सांगितले. येथील भाजीपाला संकुलाच्या छत्रपती संभाजी महाराज भाजीपाला आवारातील अतिरिक्त 285 …

Read More »

‘एनएमएमटी’ची उरण, पनवेलकडे धाव

उत्पन्नवाढीसाठी महामुंबई क्षेत्रावर लक्ष नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त ‘एनएमएमटी’ उपक्रमाला उभारी देण्यासाठी प्रशासनाने आता महामुंबई क्षेत्रावर लक्ष देण्याचे ठरविले आहे. पुणे-पिंपरी चिंचवड महापालिकेच्या बससेवेचा दाखला देत त्या धर्तीवर शेजारील पनवेल महापालिका व उरण नगर परिषदेने योग्य ते सहकार्य केल्यास नवी मुंबई परिवहन उपक्रमाचा तोटा भरून निघू शकतो, अशी अपेक्षा …

Read More »

राष्ट्रवादीसह तटकरे कुटुंबाला धक्का; अवधूत तटकरे ‘मातोश्री’वर; लवकरच शिवसेनाप्रवेश

मुंबई ः प्रतिनिधी महाराष्ट्राच्या सर्वच जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व आमदारांचे पक्षांतर सुरू असून आता त्यात राष्ट्रवादीचा गड मानला जाणार्‍या रायगड जिल्ह्याचाही नंबर लागला आहे. जिल्ह्यातील दिग्गज नेते खासदार सुनील तटकरे यांचे पुतणे व श्रीवर्धनचे विद्यमान आमदार अवधूत तटकरे राष्ट्रवादीला रामराम ठोकण्याच्या तयारीत आहेत. त्यांचा शिवसेना प्रवेश जवळपास निश्चित झाला …

Read More »

‘स्वाभिमान’चं विसर्जन! अखेर राणेंचा रविवारी भाजपप्रवेश

मुंबई :  महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे यांना अखेर भाजप प्रवेशाचा मुहूर्त सापडला आहे. विघ्नहर्ता गणेशाच्या आगमनाआधी म्हणजे 1 सप्टेंबरला खा. राणे महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन करून भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजप प्रवेशाच्या वृत्ताला स्वत: राणेंनीच दुजोरा दिला आहे. काही दिवसांपूर्वी नारायण राणे यांनी आपण 10 दिवसांत मोठा …

Read More »

सिडको गृहनिर्माण योजनेची पात्रता यादी जाहीर

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको महागृहनिर्माण योजना 2018 च्या अपील प्रक्रियेमधील पात्र व अपात्र अर्जदारांची अंतिम यादी सिडकोच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. अपात्र अर्जदारांना सिडकोतर्फे अपिल करण्यासाठी 30 जुलै ते 13 ऑगस्ट 2019 अशी 15 दिवसांची अंतिम मुदत देण्यात आली होती. त्यानुसार पात्र व अपात्र अर्जदारांची अंतिम यादी …

Read More »

नवसाला पावण्याचे दावे; गणेश मंडळांवर कारवाईची शक्यता

मुंबई ः प्रतिनिधी भक्तांची गर्दी खेचण्यासाठी मंडळांनी खास ’नवसाचे’ मार्केटिंग फंडे वापरणे नवीन नाही. मात्र, सार्वजनिक गणपतीसाठी ’नवसाला पावणारा’, ’इच्छापूर्ती करणारा’ अशा टॅगलाइन वापरून गणेशभक्तांना आपल्याकडे आकर्षित करण्याचे वेड आता मोठ्या मंडळांसह लहान मंडळांतही झपाट्याने पसरताना दिसत आहे. मंडळांचे हे मार्केटिंग कौशल्य अंधश्रद्धेकडे झुकत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर संबंधित मंडळांवर जादूटोणा …

Read More »

खारघर सब-वेतील कोंडी सुटणार

पनवेल : वार्ताहर खारघर रेल्वे स्थानकासमोरील भुयारी मार्गाची दुरुस्ती करण्यात येणार आहे. या संदर्भात सिडकोने कामाला मंजुरी दिली असून, सुमारे 33 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. सायन-पनवेल महामार्गावर खारघर रेल्वे स्थानकासमोर सिडकोने भुयारी मार्ग बांधला आहे. रेल्वे स्थानकातून बाहेर पडताना सीबीडीकडे जाण्यासाठी याच सब-वेचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. रिक्षा …

Read More »

लाकडी, कापडी मखर बाजारात ; पर्यावरणपूरक साहित्याला मागणी

नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त गणेशोत्सव काही दिवसांवर आला असून मखर, सजावट व पूजेच्या साहित्याने बाजारपेठा फुलल्या आहेत. शनिवार, रविवारी साहित्य खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. थर्माकोल बंदी असल्याने आता कापडी मखरांबरोबर लाकडी मखरही बाजारात आले असून विविध रंगसंगती व नक्षीकामांमुळे ते ग्राहकांना आकर्षित करीत आहेत. घरगुती गणपतींसाठी आकर्षक मूर्तीबरोबर …

Read More »

‘एनएमएमटी’ पंक्चर, तोटा वाढला ; तिकीट दरकपातीचा फटका; प्रशासनाच्या उपाययोजना कागदावरच

नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त आधीच तोट्यात सुरू असलेल्या नवी मुंबई महानगर परिवहन उपक्रमाची चाके दिवसेंदिवस पंक्चर होत आहेत. तोटा भरून काढण्यासाठी आखलेल्या उपाययोजना कागदावरच असून ‘बेस्ट’ तिकीट दरकपातीमुळे दिवसाला सरासरी 3 लाखांचा तोटा सहन करावा लागत असून प्रवासी संख्येतही 20 हजारांची घट झाली आहे. ऑगस्टमध्ये हा तोटा महिनाअखेपर्यंत 1 …

Read More »

प्रत्येक माणसाला आयुषशी जोडणार : केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक

आरोग्यदायी महोत्सवाचे शानदार उद्घाटन नवी मुंबई : प्रतिनिधी आयुष मंत्रालयाचे मागील पाच वर्षांत 100हून अधिक कार्यक्रम झाले. ही पद्धती जगाचे कल्याण करणारी आहे. त्यामुळे पुढील काळात प्रत्येक माणसाला आयुषशी जोडायचे आहे, असे प्रतिपादन केंद्रीय आयुष नाईक यांनी केले. ते वाशी येथे बोलत होते. आयुष मंत्रालय भारत सरकार, राज्य सरकार, महाराष्ट्र …

Read More »