नवी मुंबई : रामप्रहर वृत्त केंद्रीय आयुष मंत्रालय, राज्य सरकार, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, भारतीय केंद्रीय चिकित्सा परिषद, एमसीआयएम, सिडको, नवी मुंबई महानगरपालिका, डॉ. डी. जी. पोळ फाऊंडेशन, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने 22 ते 25 ऑगस्टपर्यंत वर्ल्ड आयुष एक्स्पो आणि आरोग्य 2019 व योगदौड या जागतिक …
Read More »ट्रान्स हार्बर मार्गावर लोकलचे दोन डबे घसरले
नवी मुंबई : ठाणे-वाशीदरम्यान ऐरोलीजवळ रविवारी (दि. 11) लोकलचे दोन डबे रुळावरून घसरले. त्यामुळे ट्रान्स हार्बर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. सुदैवाने लोकलमधील सर्व प्रवासी सुखरूप आहेत. मध्य रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार ठाणे-वाशी लोकलचे दोन डबे रविवारी सायंकाळी ऐरोलीजवळ गणपती पाडा येथे रुळावरून घसरले. यामुळे ट्रान्स हार्बर मार्गावरील अप आणि डाऊन …
Read More »विराटकडून बॉटल कॅप चॅलेंज पूर्ण
मुंबई : प्रतिनिधी गेल्या महिन्यापासून सोशल मीडियावर बॉटल कॅप चॅलेंजची खूप चर्चा आहे. सर्वसामान्य लोक आणि अनेक कलाकारांनी हे चॅलेंज स्वीकारून त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आता भारताचा कर्णधार विराट कोहलीनेही हे चॅलेंज पूर्ण करीत त्याचा व्हिडीओही ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओत विराटने हातातील बॅटने रिव्हर्स शॉट …
Read More »पूरस्थितीचे राजकारण करू नका : मुख्यमंत्री
सांगली : प्रतिनिधी पूरस्थितीत कुणीही राजकारण करू नये. सर्वांनी एकत्र येऊन लोकांना मदत करायला हवी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना केले आहे. सांगलीतील पूरस्थिती, मदत आणि बचावकार्याचा आढावा घेतल्यानंतर शनिवारी (दि. 10) घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी शनिवारी सांगलीतील पूर परिस्थितीचा आढावा घेतला, तसेच …
Read More »तिन्ही आरोपी डॉक्टरांना जामीन मंजूर
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण मुंबई : प्रतिनिधी डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील तिन्ही आरोपी महिला डॉक्टरांना मुंबई उच्च न्यायालयाने आज जामीन मंजूर केला. दोन लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली असून, मुंबईबाहेर जाण्यास मनाई केली आहे. पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षात शिकणार्या डॉ. पायल तडवी हिने 22 …
Read More »सिडकोचे वार्षिक स्नेहसंमेलन वाशी येथे उत्साहात
पनवेल ः रामप्रहर वृत्त सिडकोचे वार्षिक स्नेहसंमेलन हे सिडकोतील कर्मचारी-अधिकार्यांच्या कला गुणांस वाव देणार व आपणा सर्वांना एकत्र आणणारे व्यासपीठ आहे, असे उद्गार लोकेश चंद्र, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांनी सिडको स्नेहसंमेलन 2019 निमित्त कर्मचार्यांना संबोधित करताना काढले. दि. 09 ऑगस्ट, 2019 रोजी सिडको प्रदर्शन केंद्र, वाशी, नवी मुंबई येथे …
Read More »बोट उलटली; 9 जणांचा मृत्यू
सांगलीत बचावकार्यावेळी दुर्घटना सांगली : प्रतिनिधी पुराच्या पाण्यातून लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू असताना येथील ब्रह्मनाळ गावात गुरुवारी (दि. 8) 32 जणांना घेऊन येणारी बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात लहान मुलांचाही समावेश आहे, बेपत्ता झालेल्या पाच जणांचा शोध सुरू आहे. सर्व नागरिक ब्रह्मनाळचे रहिवासी आहेत. …
Read More »कर्नाटकमधून भाजीपाल्याची आवक वाढल्याने भाव उतरले
नवी मुंबई : प्रतिनिधी महापुरामुळे बाहेर गावावरून होणारी भाजीपाल्याची आवक थंडावल्यामुळे नवी मुंबई मधील मुंबई कृषी उत्पन्न बाजरापेठेत गेल्या दोन दिवसापासून भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडले होते.परंतु गेल्या दोन दिवसात पावसाचा जोर कमी झाल्याने बाहेर गावावरून भाजीपाला आल्याने गुरुवारी मुंबई कृषी उत्पन्न बाजार पेठेत भाज्यांचे भाव 20 ते 30 टक्क्यांनी कमी …
Read More »रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचा स्थापना दिन उत्साहात
खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचा दहावा स्थापना दिन बुधवारी अत्यंत उत्साहात, तसेच विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. या वेळी संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या कार्यक्रमाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी विविध कलाकृती सादर करून उपस्थितांची दाद मिळविली. …
Read More »राज्यात अनेक भागांमध्ये पूरस्थिती; शाळांना सुटी जाहीर
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे राज्यात दाणादाण उडाली आहे. मुंबई, रायगड जिल्ह्यासह कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली असून, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. ठाणे जिल्ह्यातील खडवली येथे आणि पालघर जिल्ह्याच्या वसईतील मिठागर परिसरात अनेक कुटुंब पुराच्या पाण्यात अडकली होती. त्यांच्या बचावकार्यासाठी हेलिकॉप्टरची मदत …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper