मुंबई : प्रतिनिधी मोदी सरकारने आपल्या 100 दिवसांच्या कार्यकाळात अनेक महत्त्वाचे आणि मोठे निर्णय घेतले. तीन तलाक आणि कलम 370 अशा मोठ्या निर्णयांचा यामध्ये समावेश आहे. या निर्णयांमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मजबूत नेतृत्वाची झलक पाहायला मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 100 दिवसांच्या कार्यकाळानंतर एबीपी न्यूज आणि सी वोटरने एका …
Read More »वंचित बहुजन आघाडीत फूट; एमआयएम स्वबळावर लढणार
मुंबई ः रामप्रहर वृत्त वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएममध्ये अखेर फूट पडली असून एमआयएमकडून विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा करण्यात आली आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी ही घोषणा केली. लोकसभा निवडणुकीत एमआयएमबरोबर हातमिळवणी केल्यानंतरही मुस्लीम मते वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांना मिळाली नव्हती. त्यामुळे या पक्षांत काडीमोड होण्याची शक्यता आहे.
Read More »असंरक्षित किल्ल्यांचा विकास; सरकारचे स्पष्टीकरण; शिवरायांच्या किल्ल्यांना हात लावणार नाही
मुंबई : प्रतिनिधी लग्नसमारंभ, हॉटेलिंग यासाठी राज्यातील गडकिल्ले 60 ते 90 वर्षांच्या भाडेतत्त्वावर देण्याचा सरकारचा मानस आहे. पर्यटन क्षेत्रात खाजगी गुंतवणूक वाढावी, यासाठी राज्य सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती एका वृत्तपत्राने दिली होती, मात्र किल्ले लग्नासाठी, समारंभांसाठी भाड्याने देणार नाही, अशी माहिती पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी दिली आहे. …
Read More »रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक नाही
गणेशभक्तांना मोठा दिलासा मुंबई : प्रतिनिधी सात दिवसांच्या गौरी-गणपतींचे विसर्जन होणार असल्याने येत्या रविवारी (दि. 8) पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वेमार्गावरील मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे. गणेशभक्तांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे, तसेच गणेश दर्शनासाठी मुंबईत जाणार्या प्रवाशांसाठी आणि भक्तांसाठी रात्री उशिरा विशेष लोकल सोडण्यात येणार …
Read More »‘नव्या विचारांनी नवा भारत जोडा’
मुंबई ः प्रतिनिधी ‘अशिक्षितपणा, असंस्कार, अनाचार सोडा आणि नव्या विचारांनी नवा भारत जोडा,’ असा नवा मंत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तरुणाईला दिला. सध्या जागतिक स्तरावर आर्थिक मंदी असली तरी देशांतर्गत परिस्थिती उत्तम असून येत्या तीन ते सहा महिन्यांत देश आर्थिक प्रगतीत पुन्हा आघाडी घेईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. सुमारे …
Read More »राष्ट्रवादीला आणखी एक झटका; आ. अवधूत तटकरेंचा राजीनामा
मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते एकामागून एक पक्षातून बाहेर पडत असताना पक्षाला आणखी एक झटका बसला आहे. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार सुनील तटकरे यांचे पुतणे आणि श्रीवर्धनचे आमदार अवधूत तटकरे यांनी गुरुवारी (दि. 5) आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे त्यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा सोपवला. …
Read More »कोकण विभागीय लोकशाही दिन
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोकण विभागीय स्तरावरील लोकशाही दिन सोमवारी (दि. 9) सकाळी 10 वाजता विभागीय आयुक्त कार्यालय (महसूल) समिती सभागृह, पहिला मजला, कोकण भवन येथे आयोजित केला आहे. लोकशाही दिनी विभागीय आयुक्त व विभागीय स्तरावरील शासकीय अधिकारी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत जनतेच्या तक्रारी, गार्हाणी, अडचणींबाबत अर्ज, …
Read More »सिलिंडर स्फोटात एकाचा मृत्यू
मुंबई : प्रतिनिधी मुंबईच्या मालाड परिसरात भिंत कोसळून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मालाड पूर्वेला असलेल्या एका चाळीतील घरात गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्यानंतर या चाळीची भिंत कोसळल्याचे समजते. या घटनेत चार जण जखमी असून, एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. …
Read More »कोकणात 1,854 एसटी बसेस रवाना
मुंबई ः प्रतिनिधी गणरायाच्या आगमनाची तयारी पूर्ण झाल्यानंतर शहरातील चाकरमान्यांनी कोकणाकडे धाव घेतली. शनिवारी मुंबई, ठाणे, पालघर एसटी आगारातून 1854 एसटी बसे कोकणासाठी रवाना करण्यात आल्या, तसेच शेकडो नियमित आणि विशेष मेल-एक्स्प्रेस आणि हजारो खाजगी बसेस कोकणासाठी मार्गस्थ झाल्या. खाजगी बसचालकांच्या मनमानी कारभाराला आळा घालण्यात परिवहन विभागाला पूर्णपणे अपयश आले …
Read More »नवी मुंबई ते मुंबई हावरक्रॉप्ट सेवा जूनपासून; सिडकोकडून सर्वेक्षण सुरू
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कामगारांच्या अंतर्गत वादामुळे 20 वर्षांपूर्वी बंद पडलेली वाशी व बेलापूर ते गेटवे ऑफ इंडियापर्यंतची हावरक्रॉप्ट सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी सिडकोच्या वतीने सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली आहे. 1998 मध्ये सुरू झालेली ही सेवा त्या वेळी मुंबई-नवी मुंबईदरम्यान प्रवास करणार्या प्रवाशांच्या आकर्षणाचे केंद्र होते. जवळपास 180 रुपये …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper