Breaking News

महत्वाच्या बातम्या

हुतात्मा पुण्यतिथीनिमित्त स्वच्छता अभियान

पाली : प्रतिनिधी हुतात्मा नाग्या महादू कातकरी पुण्यतिथीनिमित्त  सिद्धेश्वर आदिवासी वाडीतील महिलांनी स्वच्छता अभियान राबविले. हातात झाडू घेऊन या महिलांनी वाडीवरील सर्व परिसर स्वच्छ केला, तसेच ठिकठिकाणी वाढलेले गवत व झाडीझुडपे कापून टाकली. या वेळी महिलांची चांगली एकजूट पहायला मिळाली. हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांची पुण्यतिथी अशा विधायक प्रकारे साजरी …

Read More »

कर्जत उपजिल्हा रुग्णालय कोरोनाच्या तिसर्या लाटेसाठी सज्ज

कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी कर्जत उपजिल्हा रुग्णालयात 50 खाटा उपलब्ध होत्या. सध्या कोरोनाचे रुग्ण कमी प्रमाणात आढळत असले, तरी संभाव्य तिसर्‍या लाटेची शक्यता लक्षात घेऊन कर्जतच्या उपजिल्हा रुग्णालयाने खबरदारीचा उपाय म्हणून आपली आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवली आहे. मागील वर्षात कोरोना वर मात करण्यासाठी कर्जत उपजिल्हा …

Read More »

मंगेश दळवी यांचा मध्य रेल्वेकडून सन्मान

कर्जत : बातमीदार मध्य रेल्वेच्या मेन लाईनवरील नेरळ-शेलू रेल्वेस्थानकात कमर्शियल सुपरवायझर म्हणून कार्यरत असलेले रेल्वे कर्मचारी मंगेश दळवी यांचा मध्य रेल्वेकडून सन्मान करण्यात आला आहे.  या सन्मानाबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागीय व्यवस्थापक यांच्याकडून मध्य रेल्वेमध्ये काम करणार्‍या कर्मचारी आणि अधिकारीवर्गामधून सर्व विभागात उत्कृट सेवा देणार्‍या कर्मचारी …

Read More »

गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना शिबिरास प्रतिसाद

मुरूड : प्रतिनिधी  रिलायन्स फाऊंडेशन आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज कृषी यांत्रकीकरण योजना, गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना शिबिराचे आयोजन गावागावात करण्यात आले होते. या शिबिरात शेकडो शेतकर्‍यांनी सहभाग नोंदवला. या वेळी सहाय्यक कृषी अधिकारी धनंजय सरदेसाई यांनी शेतकर्‍यांना मार्गदर्शन करताना, शेतकर्‍यांनी कृषी यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देणे व शेतीमधील …

Read More »

माणगाव बसस्थानकातील खड्ड्यांविरोधात भाजपचा रास्ता रोको आंदोलनाचा इशारा

तालुका पत्रकार संघाचा पाठिंबा माणगाव : प्रतिनिधी माणगाव बसस्थानकाची अत्यंत दुरवस्था झाली असून या स्थानकाला कोणीच वाली राहिला नसल्याचे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. या स्थानकात रस्त्यावर जागोजागी मोठमोठे प्रचंड खड्डे पडले असून पावसाळ्यात या खड्ड्यांतून पाणी साचून डबकी तयार झाली आहेत. स्थानकात येणार्‍या बसेस झोला मारत असून अपघात होण्याची …

Read More »

विकासासाठी हवे सर्वसमावेशक कोकण पर्यटन!

कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या संकटकाळात यंदा (27 सप्टेंबर) दुसरा जागतिक पर्यटन दिन साजरा होतो आहे.गेल्या वर्षी कोकणच काय अख्खं जागतिक पर्यटन, ‘वेट अ‍ॅन्ड वॉच’वर थांबलं होतं. अपवाद वगळता आजही यात मोठा फरक पडलेला नाही. सन 2050पर्यंत जगातील 68 टक्के लोकसंख्या शहरी भागात वास्तव्यास असेल असं तज्ज्ञांचं मत आहे. त्यामुळे कोरोनोत्तर काळात …

Read More »

खो खो स्पर्धेत महाराष्ट्राचे दोन्ही संघ अंतिम फेरीत

भुवनेश्वर ः वृत्तसंस्था येथील बिजू पटनाईक इनडोअर स्टेडियमवर सुरू असलेल्या 40व्या कुमार कुमारी राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धेत रविवारी सकाळच्या सत्रात महाराष्ट्रच्या मुलांनी 36व्यांदा अंतिम फेरीत प्रवेश करीत पुन्हा एकदा विजेतेपदाचे प्रबळ दावेदार असल्याचे दाखवून दिले. यापूर्वी कुमारांनी 31 विजेतेपद मिळवली आहेत. उपांत्य फेरीत त्यांनी ओडिशाचा 15-14 असा धुव्वा उडवला. …

Read More »

सायकल रॅलीला पनवेलमध्ये प्रतिसाद; स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त स्वच्छतेचा संदेश

पनवेल ः रामप्रहर वृत्त येथील इन्फिनिटी फाऊंडेशन, पनवेल महानगरपालिका, रायगड जिल्हा परिषद, आदई ग्रुप ग्रामपंचायत आणि नेहरू युवा केंद्र संघटन अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीचे उद्दिष्ट स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि स्वच्छ भारत अभियान हे होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल …

Read More »

दहशतवादाला थारा नाही!

अवघे विश्व गेल्या दीड वर्षापासून कोरोना महामारीशी झुंजत आहे. कोविड-19 विषाणूने प्रचंड उलथापालथ केली. कोरोनारूपी आपत्ती अचानक आलेली आहे, पण दहशतवादाची समस्या गेल्या अनेक वर्षांपासून जगाला भेडसावत आहे. तिचा मुकाबला करण्यासाठी सर्व देशांनी एकत्र येणे काळाची गरज आहे. अफगाणिस्तावर तालिबानी दहशतवाद्यांनी ताबा मिळविलेला असून तेथे आता तालिबानी राजवट आहे. तालिबानी …

Read More »

प्रतीक जुईकर बनला रायगडातील पहिला थेट आयएएस अधिकारी

कर्जत ः बातमीदारकर्जत येथील प्रतिक चंद्रशेखर जुईकर याने रायगड जिल्ह्यातील पहिला थेट आयएएस अधिकारी होण्याचा मान मिळवला आहे. प्रतिकने केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) परीक्षा उत्तीर्ण होत मुलाखतीचा अडथळाही पार केला आहे. या यशानंतर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.प्रतिक जुईकर हा मूळचा अलिबाग तालुक्यातील शहाबाज चौकीचा पाडा येथील राहणारा आहे. कर्जत …

Read More »