मुंबई ः प्रतिनिधी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) पनवेल येथील कर्नाळा नागरी सहकारी बँकेतील घोटाळा, भ्रष्टाचारप्रकरणी बँकेचे विद्यमान अध्यक्ष आणि शेकापचे माजी आमदार विवेकानंद शंकर पाटील यांच्याविरोधात गुरुवारी (दि. 12) आरोपपत्र दाखल केले. सध्या पाटील हे तळोजा जेलमध्ये आहेत. कर्नाळा नागरी सहकारी बँक गैरव्यवहारप्रकरणी विवेक पाटील यांच्यासह बँकेचे तत्कालीन व विद्यमान संचालक …
Read More »केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या जनआशीर्वाद यात्रेचा सोमवारपासून झंझावात; 16 ऑगस्टला ठाणे, 17 रोजी रायगड दौरा
पनवेल ः रामप्रहर वृत्तदेशाचा कारभार लोकाभिमुख असावा या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील 16 ते 20 ऑगस्टदरम्यान ठाणे व रायगड जिल्ह्यात झंझावाती जनआशीर्वाद यात्रा काढणार आहेत. या यात्रेत जिल्हास्तरीय व स्थानिक नेतेही सहभागी होत असल्याने संपूर्ण वातावरण भाजपमय होणार आहे. ठाणे जिल्ह्यातून …
Read More »पनवेलमध्ये महिनाभर स्वच्छता मोहीम; कोळीवाड्यापासून शुभारंभ
पनवेल : रामप्रहर वृत्त नारळी पौर्णिमा तसेच गणेशोस्तव हा सण येत्या काही दिवसांमध्ये साजरा होणार आहे. या सणांच्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 19मध्ये आमदार प्रशांत ठाकूर आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली महिनाभर स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. त्याअंतर्गत शुक्रवारी या मोहिमेचा प्ररंभ पनवेल कोळीवाडा येथून झाला. स्वच्छता …
Read More »तासगाव आदिवासीवाडीतील विद्यार्थ्यांना पुस्तक संच भेट
माणगाव : प्रतिनिधी अविष्कार फाऊंडेशनच्या रायगड शाखेच्या वतीने माणगाव तालुक्यातील तासगाव आदिवासीवाडीमधील विद्यार्थ्यांना पुस्तक संच भेट देण्यात आले. कोरोना काळात रोजगार गमावलेल्या आदिवासी बांधवांच्या पाल्यांना सहाय्यभूत व्हावे, यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. फाऊंडेशनेचे रायगड जिल्हाध्यक्ष संदिप नागे, कार्याध्यक्ष शंकर शिंदे यांच्या प्रयत्नातून सदर पुस्तक संच वाटप करण्यात आले. या वेळी …
Read More »रोहा तालुक्यात 33,231 नागरिकांचे कोरोना लसीकरण
रोहे : प्रतिनिधी येथील उपजिल्हा रुग्णालयासह तालुक्यातील 11 प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात येत असून, मंगळवार (दि. 10)पर्यंत रोहा तालुक्यतील 33हजार 231 नागरिकांना कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन लस देण्यात आली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अभय ससाने यांनी दिली. रोहा तालुक्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू …
Read More »दिघी बंदराच्या विकासाला वेग
दिघी पोर्ट लिमिटेड कंपनीचा ताबा आता अदानी ग्रुपकडे आल्याने सुमारे 3500 कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या दिघी बंदर विकासाच्या कामाला आता खर्या अर्थाने वेग प्राप्त झाला आहे. जेऐनपीटीच्या धर्तीवर दिघी बंदर विकसित केले जाणार आहे. दिघी बंदरासाठी आगरदांडा व दिघी परिसरातील सुमारे 1600 एकर जमीन संपादित करण्यात आली आहे. या बंदराचा …
Read More »नेरळ, कर्जतमध्ये आज मध्यरात्री ध्वजारोहण
कर्जत : बातमीदार तालुक्यातील नेरळ येथील हुतात्मा चौकात मध्यरात्री तिरंगा झेंडा फडकवून भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा केला जाणार आहे. वांगणी रेल्वे स्थानकात लहान मुलीचे प्राण वाचविणार्या मयूर शेळके यांच्या हस्ते मध्यरात्री 12 वाजून एक मिनिटांनी भारताचा झेंडा फडकवला जाणार आहे. नेरळच्या हुतात्मा चौकात गेली 16 वर्षे मध्यरात्री स्वतंत्रता दिन साजरा केला …
Read More »शिवरायांचे विचार आणि कार्य आजही देशाला प्रेरणादायी; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे उद्गार
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि कार्य आजही आपल्या देशाला प्रेरणा देत आहे. इतकेच नव्हे तर शिवरायांशिवाय आपल्या देशाचा विचारही करता येणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. पंतप्रधान मोदींनी शुक्रवारी (दि. 13) शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना शंभराव्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. पुण्यातील शिवसृष्टीमध्ये बाबासाहेबांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित …
Read More »खालापुरातील जैविक कचरा प्रक्रिया कारखान्याची जनसुनावणी रद्द
एसएमएस कंपनीविरोधात लढा सुरूच ठेवणार, ग्रामस्थांचा इशारा खोपोली, खालापूर : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील आत्करगाव येथे जैविक कचर्यावर प्रक्रिया करणारा (एसएमएस) कारखाना येवू घातला आहे. त्यासंबंधीची जनसुनावणी जिल्हाधिकार्यांकडून शुक्रवारी (दि. 13) घेण्यात येणार होती, मात्र ग्रामस्थांचा तीव्र विरोध पाहून ही जनसुनावणी रद्द करण्यात आली. त्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केला आहे. मात्र …
Read More »रायगडातील एसटी कर्मचार्यांचे वेतन थकले
मुरूड : प्रतिनिधी एसटीच्या रायगड विभागातील सर्व कर्मचार्यांचे पगार न झाल्यामुळे ते चिंताग्रस्त झाले आहेत. प्रत्येक महिन्याच्या 7 तारखेला एसटी कर्मचार्यांचे वेतन होतात. मात्र ऑगस्ट महिन्याची 13 तारीख उलटून गेली तरी एसटी कर्मचार्यांना वेतन मिळालेले नाही. शनिवार, रविवारी बँकांना सुट्टी असल्याने आता 15 ऑगस्ट नंतरच पगार होणार असल्याने कर्मचार्यांतून नाराजी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper