Breaking News

महत्वाच्या बातम्या

ई-पीक अॅपचे शेतकर्यांना प्रशिक्षण

उरण : वार्ताहर उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच ई-पीक पाहणी अ‍ॅपचे प्रशिक्षण तहसीलदार कार्यालयात आयोजित करण्यात आले. शासनाच्या परिपत्रकानुसार शेतकर्‍यांसाठी स्वतःच्या शेतातील पीक पेरा भरण्याच्या कामासाठी त्यांना ई-पिक पाहणी डेमो अ‍ॅपचे प्रशिक्षण शिबिर देण्यात येत आहे. त्याअनुषंगाने उरणमध्येही शेतकर्‍यांना प्रशिक्षण देण्यात आले. तालुक्यातील मंडळ अधिकारी, सर्व तलाठी, सर्व …

Read More »

वीर वाजेकर महाविद्यालयात ग्रंथपाल दिन

उरण : वार्ताहर ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त रयत शिक्षण संस्थेच्या फूंडे येथील वीर वाजेकर महाविद्यालयातील ग्रंथालय विभागाच्या वतीने राष्ट्रीय ग्रंथपाल दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. साहेबराव ओहोळ यांच्या हस्ते रंगनाथन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी …

Read More »

भाजयुमोतर्फे 75 किमी सायकल रॅली

पनवेल : वार्ताहर भारताच्या 75व्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र दिनानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चातर्फे (भाजयुमो) संपूर्ण देशभरात भाजयुमोचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार तेजस्वी सुर्या यांच्या सूचनेनुसार संपूर्ण देशभरामध्ये 75 किलोमीटर मॅरेथॉन किंवा सायकल रॅली अशा युवा संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रात भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली 62 संघटनात्मक जिल्ह्यामध्ये सायकल …

Read More »

पनवेल परिसरात स्वातंत्र्यदिन उत्साहात

भागूबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालय पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील भागूबाई चांगू ठाकूर (बीसीटी) विधी महाविद्यालयात 75वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाच्या प्रांगणात प्रमुख अतिथी अर्चना परेश ठाकूर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जास्त गर्दी होऊ न देण्यासाठी …

Read More »

पोलादपुरात वाकण हद्दीतील घरे, शेतजमिनींना तडे

पोलादपूर : प्रतिनिधी तालुक्यातील वाकण ग्रुपग्रामपंचायतीच्या हद्दीतील धामणेचीवाडी आणि सानेवाडी येथील जमिनीला आणि घरांना भेगा पडल्या असून, तेथील ग्रामस्थांना कापडे येथील तात्याबा साने यांच्या घरी स्थलांतरित करण्यात आले आहे. या ग्रामस्थांच्या चाळीसहून अधिक म्हशी, गाय, बैल, वासरू या पशुधनासाठी मोकळ्या जमिनीवर कोंडवाडा बांधण्यात आला असून, तेथे त्यांना ठेवण्यात आले आहे. …

Read More »

…अन्यथा महाराष्ट्रातील रस्त्यांची कामे थांबवावी लागतील -नितीन गडकरी

मुंबई : प्रतिनिधी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. राज्यातील रस्ते बांधणीच्या कामात शिवसैनिकांकडून अडथळे निर्माण केले जात असून हे असेच सुरू राहिल्यास महाराष्ट्रातील कामे थांबवावी लागतील, असा इशारा गडकरी यांनी दिला आहे. महाराष्ट्राचे नुकसान होऊ नये म्हणून आपण …

Read More »

कर्नाळा बँकेचा परवाना आरबीआयकडून रद्द

पनवेल : रामप्रहर वृत्त कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या 529 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) कर्नाळा बँकेचा परवाना अखेर रद्द केला आहे. गुंतवणूकदारांना 95 टक्के रक्कम परत मिळणार आहे, असे आश्वासन आरबीआयने दिले आहे. या प्रकरणाचा पाठपुरावा भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आरबीआय आणि केंद्रीय पातळीवरील …

Read More »

पनवेलमध्ये राष्ट्रीय स्वास्थ स्वयंसेवक अभियान कार्यशाळा

आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप वैद्यकीय सेलच्या वतीने देशभरात ‘राष्ट्रीय स्वास्थ स्वयंसेवक अभियान कार्यशाळा’ 14 ते 16 ऑगस्ट दरम्यान आयोजीथ करण्यात येत आहे. त्याअंतर्गत श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात भाजप उत्तर रायगडच्या वतीने या कार्यशाळेचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत भाजप …

Read More »

‘दिबां’च्या नावासाठी वाढता पाठींबा

माणगावात आगरी समाजाकडून नायब तहसीलदारांना निवेदन माणगाव : प्रतिनिधी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी आगरी समाज माणगाव विभाग शैक्षणिक व सामाजिक विकास मंडळ यांच्याकडून माणगाव तालुका निवासी नायब तहसीलदार भाबड यांना निवेदन देण्यात आले. दि. बा. पाटील यांनी आपले सर्व आयुष्य सामाजिक कार्यासाठी …

Read More »

नवी मुंबई विमानतळ ‘काम बंद आदोलन’ तूर्त स्थगित

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दिलेल्या आश्वासनानंतर कृती समितीची घोषणा पनवेल : प्रतिनिधीकेंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दिलेल्या सकारात्मक आश्वासनानंतर सोमवार (दि. 16 ऑगस्ट) पासून सुरू होणारे नवी मुंबई विमानतळ काम बंद आंदोलन तूर्त स्थगित करण्यात येत आहे, अशी माहिती लोकनेतेदि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती …

Read More »