Breaking News

महत्वाच्या बातम्या

स्वत:सह परिवाराची काळजी घ्या

पनवेल पालिका आयुक्तांचे अधिकार्‍यांना आवाहन पनवेल : प्रतिनिधी महापालिकेच्या विविध विभागातील कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने सोमवारी (दि .2) झालेल्या विभाग प्रमुखांच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. या वेळी कोरोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर अधिकार्‍यांनी स्वत:ची व स्वत:च्या परिवाराची काळजी घेणे महत्त्वाचे असल्याचे आयुक्तांनी सांगितले. महापौर बंगल्याचे बांधकामाचे काम हाती घेण्याच्या दृष्टीने …

Read More »

सव्वा दोन कोटींची वाहने हस्तगत

दोन जणांच्या मुसक्या आवळल्या पनवेल : वार्ताहर मोटार गाड्यांची फसवणुक व अपहार करणार्‍या दोन आरोपींच्या मुसक्या नेरूळ पोलिसांनी आवळल्या असून त्यांच्या अटकेमुळे सात गुन्ह्यांची उकल करून 31 चार चाकी वाहने (किंमत दोन कोटी दहा लाख रुपये) हस्तगत करण्यात आली आहे. नेरूळ पोलीस ठाण्यात वाहन फसवणुकीसंदर्भात गुन्हा नोंद (गुन्हा नोंद क्रं. …

Read More »

खोटे बोलणारे सरकार

चंद्रकांत पाटील यांची ‘मविआ’वर हल्लाबोल पुणे : प्रतिनिधी स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याच्या नियुक्त्यांबाबत अद्याप राज्य सरकारने निर्णय घेतलेला नाही. यामुळे या विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. या मुद्द्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खोटे बोलणारे सरकार म्हणजे महाविकास आघाडी सरकार, असा हल्लाबोल केला आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या …

Read More »

पुढील दोन महिन्यांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस

मुंबई ः प्रतिनिधी ऑगस्ट ते सप्टेंबरदरम्यान राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाकडून महासंचालक मृत्यूंजय मोहोपात्रा यांनी पत्रकार परिषद घेत हा अंदाज वर्तविलाय. ऑगस्ट महिना पाहता महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस दिसून येतो, मात्र यंदा राज्यासह देशात पुढील दोन महिन्यांचा विचार केला तर पाऊस सरासरीपेक्षा अधिक राहिल, असे …

Read More »

भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्याकडून कर्जतमधील पूरग्रस्त भागाची पाहणी

कर्जत : बातमीदार उल्हास नदीच्या पुराचे पाणी कर्जत शहरात घुसून मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी कर्जतमधील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. कर्जत शहरातील सखल भागात पुराचे पाणी घुसले होते. अचानक आलेल्या पुरामुळे लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा …

Read More »

सावित्री नदीपूल दुर्घटनेची पुन्हा चौकशी करा; हिंदू जनजागृती समितीची मागणी

अलिबाग ः प्रतिनिधी महाड येथील सावित्री नदी पूल दुर्घटनेची पुन्हा चौकशी करण्यात यावी, दोषींवर कारवाई करावी, जिल्ह्यातील जे पूल वाहतुकीस योग्य नाहीत अशा पुलांवरील वाहतूक ताबडतोब बंद करण्यात यावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीचे प्रवक्ता डॉ. उदय धुरी यांनी सोमवारी (दि. 2) येथे पत्रकार परिषदेत केली. 2 ऑगस्ट 2016 रोजी …

Read More »

राज्य शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल आज

मुंबई ः प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल सोमवारी (दि. 3) जाहीर होणार आहे. कोरोनामुळे यंदा ही परीक्षा रद्द करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने देशभरातील सर्व मंडळांना बारावीचा निकाल 31 जुलैपर्यंत जाहीर करण्याचा आदेश दिला होता. मात्र राज्य मंडळाला ही मुदत पाळता आली नव्हती. गेला …

Read More »

भारताची डिजिटल क्रांती; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ‘ई-रूपी’चा शुभारंभ

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था भारतातील नवे डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म ई रूपी सेवेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी (दि. 2) शुभारंभ करण्यात आला. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय)ने वित्तीय सेवा विभाग, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आणि राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या मदतीने विकसित केलेले प्रीपेड ई-व्हाऊचर आहे, जे डिजिटल पेमेंटचे …

Read More »

नगरसेवक नितीन पाटील यांच्याकडून महाडकरांना मदत

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या आवाहनानुसार पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक व जाणीव एक सामाजिक संस्थाचे संस्थापक नितीन जयराम पाटील यांच्याकडून महाड येथील पूरग्रस्तांना तांदूळ, दोन डाळी, तेल, मीठ, साखर, चहा पावडर, अशी शिधासामुग्री देण्यात आली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पनवेल नगरी यांच्या माध्यमातून ही …

Read More »

‘इ स्टोर इंडिया’ची पूरग्रस्तांना मदत

पनवेल : प्रतिनिधी इ स्टोर इंडिया या सुपर बाजारच्या पनवेलच्या मालक व कार्यकर्त्या रेणुका पन्हाळे यांनी महाड येथील पूरग्रस्त बांधवाना  मदतीचा हात दिला आहे. पनवेल शहरातील टपालनाका येथील मोमीनपाडामधील साई सारंग कॉ ऑप. हौ. सोसायटी या ठिकाणी सर्वांना सवलतीच्या दरात जीवनावश्यक साहित्य उपलब्ध व्हावे याकरिता वेदिक आयुरकेअर कंपनीने इ-स्टोर इंडिया …

Read More »